WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Dr. Anurag Lavekar | डॉ. अनुराग लव्हेकर

Dr. Anurag Lavekar | डॉ. अनुराग लव्हेकर

डॅा.अनुराग श्रीकांत लव्हेकर
एम् बी बी एस्. , एम् डी. (मेडिसीन),
डी. एम् (गॅस्ट्रोएंटेरॅालॅाजी व हिपॅटॅालॅाजी)
त्रिवेणी हॅास्पिटल, कैलासनगर, नांदेड.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, येथून पदवी प्राप्त. एन के पी सीम्स, नागपूर व जे एस एस वैद्यकीय महाविद्यालय, मैसूर येथून पदव्युत्तर शिक्षण.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड, सेंट जॅान्स हॅास्पिटल बेंगलोर, केअर हॅास्पिटल रायपूर, गॅलॅक्सी हॅास्पिटल, नांदेड, सागर हॅास्पिटल बेंगलोर येथे पदव्युत्तर कामाचा अनुभव.
सध्या अपोलो हॅास्पिटल्स बेंगलोर येथे कार्यरत.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या परिषदांमधून व नियतकालिकांमधून अनेक शोधनिबंधांचे सादरीकरण व प्रकाशन.
निनाद फाउंडेशन, नांदेड’ या आरोग्य व शिक्षणक्षेत्रात कार्यरत समाजसेवी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष.
अवयवरोपण क्षेत्रातील कार्याबद्दल सह्याद्री हॅास्पिटल, पुणेतर्फे सन्मान. ‘
सेवार्थ क्लिनीक’ हा धर्मार्थ दवाखाना नांदेड येथे कार्यरत.
सर्पदंश प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दर वर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला गम बूटांचे वाटप व तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन.शेकडो शेतकऱ्यांना लाभ.
अनेक रक्तदान शिबिरे व आरोग्य शिबिरांचे आयोजन. अनेक कॅन्सरग्रस्त रूग्णांना सर्जरी व केमोथेरपीकरता थेट सहाय्य.
आरोग्यविषयक प्रश्नांवर जनजागृतीसाठी ‘ Ninad Foundation ‘ हे मराठी यू ट्यूब चॅनल. सियाचीन येथे सैन्यासाठी नागरिकांतर्फे उभारल्या जाणाऱ्या ॲाक्सिजन प्लॅंटकरिता ‘सिर्फ’फाऊंडेशनशी संलग्नता आणि योगदान.
भटक्या व विमुक्त समाजातील सर्वार्थाने निराधार मुलांसाठीची गोंदिया येथील ‘पालावरची शाळा’ संस्थेतर्फे दत्तक.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ईयत्ता नववी व दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे दर वर्षी वाटप केले जाते. शेकडो लाभार्थी.
ग्रामीण भागातील आरोग्य व शिक्षण सेवा सुधारण्यासाठी संस्थेतर्फे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
वाचन, प्रवास, भटकंती,लेखनाची आवड. इतिहास आणि भूगोल ही विशेष आवडीची क्षेत्रे.
जागतिक घडामोडी व राजकारण व त्यांची भारताच्या प्राचीन परंपरा, संस्कृती, आस्था, लोकजीवन, मध्ययुगीन इतिहास व सद्य परिस्थिती यांच्यांशी सांगड घालण्याच्या प्रयत्नातून ‘वसुंधरेचे शोधयात्री‘ हा साहसी दर्यावर्द्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा पहिला ग्रंथ यावर्षी राजहंस प्रकाशन संस्था, पुणेतर्फे प्रकाशित.
या ग्रंथाला प्रसाद बन राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार मार्च २०२४ मध्ये मिळालेला आहे.
तसेच उत्कृष्ट साहित्यासाठी दिला जाणारा कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचा ‘ क.रा.म.सा.प .कल्याणरत्न’ पुस्कार एप्रिल २०२४मध्ये मिळालेला आहे.
अश्वमेध ग्रंथालय, सातारातर्फे दिला जाणारा ‘ अक्षरगौरव’ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार ॲागस्ट २०२४मध्ये प्राप्त झाला.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व धृपद एंटरटेनमेंट ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ साहित्यवलय’ राज्यस्तरीय पुरस्कार ॲाक्टोबर २०२४ .
जीवनविकास ग्रंथालय व वाचनालय, छत्रपती संभाजीनगरतर्फे देण्यात येणारा कै.सावित्रीबाई जोशी पुरस्कार डिसेंबर २०२४
नवी दिल्ली येथे झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित वक्ता.
‘माझी मराठी’ या महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिकांच्या त्रैमासिकासाठी नियमित लेखन.
समाजमाध्यमांवर स्फुट लेखन व पुस्तक परिचय.
महाराष्ट्राबाहेर मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार,संवर्धनासाठी प्रयत्नशील.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">