Dr. Rajendra Malose | डॉ. राजेंद्र मलोसे
शिक्षण : एम.बी.बी.एस., शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
महात्मा गांधी आणि बाबा आमटे ह्यांच्या प्रेरणेने चांदवड ह्या दुष्काळी, ग्रामीण भागात १९७९ पासून आजतागायत अत्यल्प सुविधांमध्ये, अत्यल्प दरात रुग्णसेवा. ह्या सेवेची दखल घेत इंडियन मेडिकल असोसिएशन (नाशिक) तर्फे 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित.
वंचित समाजघटकांसाठी काम करणाऱ्या जागतिक पातळीवर नावाजलेल्या 'स्नेहालय' (अहमदनगर) या संस्थेतर्फे सातत्यपूर्ण रुग्णसेवेसाठी २०२३ साली 'बापू पुरस्कार'.
दिवसातील पंधरा ते सोळा तास, शिवाय रात्रीअपरात्रीही रुग्णसेवा देत असताना आणि वैद्यकीय व्यवसायातील दैनंदिन ताण-तणावांना तोंड देत देत लेखन हे त्यांनी एक व्रत आणि एक निष्ठा म्हणून स्वीकारलेले आहे. त्यांचे आजवरचे लेखन हे पूर्णपणे रुग्ण तपासणी दालनात आणि दोन रुग्णांच्या मधल्या वेळेत झालेले आहे,
डॉ. राजेंद्र मलोसे हे उत्तम वक्तेही असून आरोग्यपूर्ण सवयी व इतर प्रबोधनपर विषयांवर विशेषतः कुमार आणि तरुण मुला-मुलींशी आपल्या सोप्या आणि मिश्कील शैलीत संवाद साधायला त्यांना खूप आवडते

">
Skip to content