Dr. Vaishali Jundre| डॉ. वैशाली जुंदरे
* डॉ. वैशाली सध्या ‘सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’ इथे ‘हेड-स्टुडन्ट अफेअर्स’ या पदावर कार्यरत आहेत. त्यापूर्वी १४ वर्षे त्या ‘इंग्लिश लँग्वेज टीचिंग इन्स्टिट्यूट ऑफ सिंबायोसिस’ (एल्टिस) या संस्थेच्या उपसंचालकपदी कार्यरत होत्या. त्यांच्या त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अध्यापन व शैक्षणिक व्यवस्थापनाबरोबर शिक्षक प्रशिक्षक म्हणूनही काम केले. या दरम्यान दोन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण प्रकल्पांच्या समन्वयक आणि शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करताना त्यांनी लाटविया आणि इटली या दोन देशांमधील संबंधित विद्यापीठांना भेटी दिल्या.
* तसेच पुण्यासह चंडीगढ आणि उडुपी येथील शिक्षकांना प्रशिक्षण दिले. त्या उत्तम शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम गायिका आहेत. ‘आकाशवाणी पुणे केंद्रा’च्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. त्यांनी संगीत नाटकांमधून प्रमुख भूमिका करून ‘महाराष्ट्र राज्य नाट्य परिषदे’चे बक्षीसही मिळवले आहे. अनेक व्यासपीठांवर त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत.
* त्यांची दोन अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी ‘शुभ विलास’ यांचे इंग्रजी पुस्तक, ‘हनुमान - एक महानायक’ या शीर्षकाने मराठीमध्ये अनुवादित केले आहे. तसेच, डॉ. संजीवनी मुजुमदार यांच्या ‘विश्वात्मक सहजीवन’या पुस्तकाचा त्यांनी केलेला इंग्रजी अनुवाद, ‘युनिव्हर्सल सिंबायोसिस’ या शीर्षकाने प्रसिद्ध झाला आहे.

">
Skip to content