WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Lakshmikant Deshmukh | लक्ष्मीकांत देशमुख

Lakshmikant Deshmukh | लक्ष्मीकांत देशमुख

जन्मतारीख: ५ सप्टेंबर
शिक्षण: IAS Officer
लक्ष्मीकांत देशमुख यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातले मुरूम.
* मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रातील एम.एस्‌सी ही पदवी व कोल्हापूर विद्यापीठातून मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए. ही पदवी घेतली.
* त्यानंतर त्यांनी बंगलोरमधून एम.बी.ए केले. अमेरिकेतून त्यांनी इंटरनॅशनल पॉलिसी या विषयावर एक अभ्यासक्रमही पूर्ण केला.
* भारतीय प्रशासन अधिकारी म्हणून काम करून ते निवृत्त झाले.
* प्रशासकीय अधिकारी असताना प्रत्येक प्रश्न त्यांनी संवेदनशीलतेने आणि न्यायबुद्धीने सोडवला त्यातूनच त्यांच्या साहित्यकृती आकार घेत गेल्या.
* बालमजुरीसंदर्भातील 'हरवलेले बालपण' ही कादंबरी
* स्त्रीभ्रूणहत्या विषयांसंदर्भातील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह लक्ष्मीकांत देशमुख यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडवतो.
* 'इन्किलाब आणि जिहाद' या कादंबरीतून समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले आहे.
* सहा कादंबऱ्या, आठ कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुख यांच्या नावावर आहे. त्यांची अजून नऊ पुस्तके प्रकाशनाधीन आहेत.
लक्ष्मीकांत देशमुख हे 'अक्षर अयान' या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक आहेत
लक्ष्मीकांत देशमुख यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
* गाडगीळ प्रतिष्ठानचा काकासाहेब गाडगीळ पुरस्कार (२५-१-२०१८)
* २०१० साली पुण्यात भरलेल्या दुसऱ्या शासकीय कर्मचारी साहित्य संमेलानचे अध्यक्षपद
* नागपूर येथे झालेल्या तिसऱ्या ३८वे मराठवाडा साहित्य संमेलनस्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
* सांगली येथे झालेल्या पहिल्या लोकजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
* नांदेड येथे झालेल्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
* बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* 'पाणी!! पाणी!!' आणि 'सावित्रीच्या गर्भातमारलेल्या लेकी' या पुस्तकांना मराठवाडा साहित्य पुरस्कार.
महाराष्ट्र साहित्य पुरस्कार
* महाराष्ट् फाऊंडेशन पुरस्कार
* टाइम्स ऑफ इंडिया सोशल ऑनर ॲवॉर्ड
* महाराष्ट्र सरकारचा आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">