WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Namdev C. Kamble | नामदेव चं. कांबळे

Namdev C. Kamble | नामदेव चं. कांबळे

नामदेव चंद्रभान कांबळे
• नामदेव चंद्रभान कांबळे (जन्म : शिरपूर-वाशीम, १ जानेवारी १९४८[२] - ) हे मराठी लेखक, पत्रकार व शिक्षक आहेत. त्यांना राघव वेळ या कादंबरीसाठी इ.स. १९९५मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
• विदर्भातील वाशीमच्या चपराशीपुऱ्यात राहणाऱ्या कांबळे यांच्या झोपडीला कुडाच्या भिंती होत्या. वीज किंवा नळ नव्हते. येथेच त्यांना अकादमी पुरस्कार मिळाला आणि २५ वर्षांनी पद्मश्री.
• नामदेव कांबळे यांच्या आठ कादंबऱ्या, चार कवितासंग्रह, दोन कथासंग्रह आणि दोन ललित संग्रहांखेरीज चरित्र, वैचारिक ग्रंथ अशी त्यांची एकवीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवाय अन्य पुस्तकांची अनेक हस्तलिखिते त्यांच्याजवळ आहेत.
कांबळे यांनी लिहिलेली पुस्तके
• अकल्पित (कविता संग्रह)
• अस्पर्श (कादंबरी)
• आपले दादा- दादासाहेब हावरे (चरित्र)
• ऊन सावली (कादंबरी) - राघववेळचा विस्तार
• कृष्णार्पण (कादंबरी)
• गहिवर (कविता संग्रह)
• गांधी उद्यासाठी (वैचारिक)(+सहलेखक)
• झाकोळ (कादंबरी)
• तो:ती:अन्वयार्थ (कविता संग्रह)
• परतीबंद (कथा संग्रह)
• प्रत्यय (कविता संग्रह)
• बळी (कथासंग्रह)
• महात्मा गांधी आणि डाॅ.आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय (वैचारिक)[३]
• मोराचे पाय (कादंबरी)
• राघव वेळ (कादंबरी)
• शब्दांच्या गावा जावे (भाषणे)
• समरसता साहित्य- स्वरूप व समिक्षा(समिक्षा)
• सांजरंग (कादंबरी)
• सेलझाडा (कादंबरी)
• सिद्धार्थ (ललित-लेख)
• स्मरण विस्मरण (लेख संग्रह)
पुरस्कार
• पद्मश्री पुरस्कार - २०२१
• साहित्य अकादमी पुरस्कार १९९५ - 'राघव वेळ' साठी
• ह.ना. आपटे पारितोषिक - 'राघव वेळ' साठी
• बा.सी. मर्ढेकर पारितोषिक - 'राघव वेळ' साठी
• ग.त्र्यं. माडखोलकर पारितोषिक - 'राघव वेळ' साठी
• वि.स. खांडेकर पारितोषिक १९९८ - 'ऊन सावली'साठी
विविध संस्थांचे पुरस्कार
• 'राघव वेळ','ऊन सावली','सांजरंग', 'मोराचे पाय', 'कृष्णार्पण'
• राघव वेळचा बंगाली अनुवाद- 'रघबेर दिनरात'(२००९)मध्ये प्रकाशित -तिला २०११-१२चा साहित्य अकादमी
• राज्य पुरस्कार 'राघव वेळ'(१९९४) ,'ऊन सावली'(१९९६)
वैयक्तिक पुरस्कार
• संत गाडगे बाबा समरसता पुरस्कार,मुंबई,
• सामाजिक एकता पुरस्कार, मुंबई,
• अण्णा भाऊ साठे पुरस्कार-महा.राज्य, मुंबई,
• समाज भूषण पुरस्कार, नांदेड,
• जीवन गौरव पुरस्कार, औरंगाबाद विद्यापीठ,
• रायटर्स रेसिडेेन्स फेलोशिप-'साहित्य अकादमी '(२००९)

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">