WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Prakash Gole | प्रकाश गोळे

Prakash Gole | प्रकाश गोळे

डॉ. प्रकाश गोळे
• जन्म : इ.स. १९३८
• निधन : पुणे, २७ नोव्हेंबर २०१३
• व्यवसाय : मराठी पर्यावरणतज्ज्ञ, पक्षितज्ज्ञ आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक.
पूर्वायुष्य आणि शिक्षण
• प्रकाश गोळे यांचे घराणे हे पेशवेकालीन सरदार घराणे होते. पुण्याच्या शनिवार पेठेतील गोळे वाड्यात ते राहत.
• त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण स. प. महाविद्यालयातून झाले. मूळचे ते कला शाखेचे विद्यार्थी. अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि इतिहास हे विषय घेऊन बी.ए. आणि नंतर अर्थशास्त्र विषयाची एम.ए. पदवी त्यांनी संपादन केली.
• विशेष म्हणजे त्याच काळात त्यांनी ‘इतिहास’ विषयावर एक पुस्तक लिहिले होते.
• कॉलेजच्या दिवसांपासूनच प्रकाश गोळे यांना प्राणी आणि पक्षी यांच्याबद्दल प्रेम वाटू लागले. पुढे त्यांना पक्षिशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
• डॉ. प्रकाश गोळे यांनी पुण्यात १९८२ साली ‘इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’ स्थापन केली. सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी नैसर्गिक पुनर्जीवनाचे असंख्य प्रयोग केले.
• त्यांच्या या संस्थेने निसर्ग संवर्धनावरील पदव्युत्तर पदविकेचा एक वर्षाचा अभ्यासक्रम विकसित केला आहे. हा मूलस्रोताच्या व्यवस्थापनाचा अभ्यास पुढे सरकारमान्य झाला.
• गोळे यांचा पर्यावरणीय अर्थशास्त्राचा विचार प्रस्थापित सरकारच्या गळी उतरवण्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी राजकीय पक्षांसाठी ‘पर्यावरण प्रश्नांचा जाहीरनामा’ काढला होता.
• डॉ. प्रकाश गोळे यांचे अतिशय महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी सकारात्मक काम करणारे असंख्य तरुण कार्यकर्ते निर्माण केले.
• डॉ. गोळे यांच्या संस्थेने सारस क्रौंच आणि पट्टे कादंब हंस (Bar Headed Gull) या पक्ष्यांचा अभ्यास केला. माळढोक पक्ष्यांवरही संशोधन केले.
• डॉ. प्रकाश गोळे यांनी पुण्याजवळच्या पानशेत धरणाच्या मागील पडीक जमिनीचे नैसर्गिक पद्धतीने पुनर्जीवन केले. तेथे आता ५० चौरस किलोमीटरचे जंगल आहे.
• चासकमान धरणातील मासेमारीचे प्रारूप सिद्ध केले.
• सातारा जिल्ह्यातील विंचुर्णी गावातील गवताळ कुरणाच्या संवर्धनासाठी त्यांनी यशस्वी प्रयोग केले.
• पुण्यातील बंडगार्डनजवळ नदीकिनारी एका खासगी जागेत पक्षी अभयारण्य उभारले.
• महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांत ‘निर्मल गंगा’ नावाच्या अभियानाद्वारे अनेक नैसर्गिक झऱ्यांचे व ओढ्यांचे गावकऱ्यांच्या साहाय्याने पुनरुज्जीवन केले.
• ‘जर्नल ऑफ इकॉलॉजिकल सोसायटी’द्वारे अनेक शोधनिबंध प्रकाशित केले.
• अरुणाचल प्रदेशातील क्रौंच पक्ष्याच्या पहिल्या अभयारण्याच्या उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केले.
लेखन
• अंडरस्टॅन्डिंग रिॲलिटी — इंग्रजी
• कथा कोकण किनाऱ्याची
• निसर्गाच्या अशा वाटा
• पर्यावरणीय अर्थशास्त्राची अत्यंत शास्त्रशुद्ध मांडणी करणारी अनेक इंग्रजी-मराठी पुस्तके.
• रानवा
• रिस्टोरेशन ऑफ नेचर — इंग्रजी
पुरस्कार आणि सन्मान
• सहाव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोळे यांना ‘वसुंधरा जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (२३-२-२०१२)
• पानशेत धरणाच्या मागील जमिनीच्या केलेल्या विकासाबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्कार.
• आंतरराष्ट्रीय क्रौंच फाउंडेशनचे सभासदत्व.
• जगातल्या पहिल्या वेटलॅंड मॅनेजमेंट कमिटीचे सभासदत्व.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">