WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Priya Tendulkar | प्रिया तेंडुलकर

Priya Tendulkar | प्रिया तेंडुलकर

प्रिया तेंडुलकर (ऑक्टोबर १९, इ.स. १९५४ – सप्टेंबर १९, इ.स. २००२) ह्या मराठी ललितलेखन करणाऱ्या अभिनेत्री होत्या. नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.
प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून त्यांनी नाट्यसृष्टीमध्ये प्रवेश केला.
त्यांनी गिधाडे, ती फुलराणी आणि एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले.
त्यांचा पहिला चित्रपट दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा १९७३ साली आलेला अंकुर हा हिंदी चित्रपट होता.
याशिवाय त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यांसारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले.
प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात.
त्यांची रजनी ही मालिका खूपच गाजली.
त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, जिम्मेदार कौन, किस्से मियॉं बीवी के, हम पांच या हिंदी मालिकांचा, तसेच दामिनी या मराठी मालिकेचा समावेश होतो.
त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत.
त्यांचे ज्याचा त्याचा प्रश्न हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
चित्रपट/चित्रवाणी कारकीर्द
१९७४ – अंकुर
१९७८ – देवता
१९८३ – माहेरची माणसे, राणीने डाव जिंकला
१९८४ – गोंधळात गोंधळ
१९८५ – मुंबईचा फौजदार, रजनी (दूरचित्रवाणी मालिका)
१९८७ – कालचक्र
१९८८ – किस्से मियॉं बीवी के (दूरचित्रवाणी मालिका)
१९८९ – एक शून्य शून्य (दूरचित्रवाणी मालिका)
१९९० – घर (दूरचित्रवाणी मालिका)
१९९४ – मोहरा
१९९५ – त्रिमूर्ती
१९९६ – प्रिया तेंडुलकर टॉक शो (दूरचित्रवाणी मालिका)
१९९७ – और प्यार हो गया, जिम्मेदार कौन (दूरचित्रवाणी मालिका), गुप्त, हम पांच (दूरचित्रवाणी मालिका)
२००० – राजा को रानी से प्यार हो गया
२००१ – प्यार इश्क और मोहोब्बत
२००२ – देवता
अभिनय केलेली नाटके
एक हट्टी मुलगी
गिधाडे
ती फुलराणी
आत्मचरित्र
फर्स्ट पर्सन – पॉप्युलर प्रकाशन
अन्य पुस्तके
असंही – ललित निबंध संग्रह
जन्मलेल्या प्रत्येकाला – कथासंग्रह
जावे तिच्या वंशा – कथासंग्रह
ज्याचा त्याचा प्रश्न – कथासंग्रह
तिहार – असंग्रहित कथांचा संग्रह, प्रकाशन सन २०१५
पंचतारांकित – स्वतःविषयी असलेले अनुभवप्रधान लेखन, २००६, पहिली आवृत्ती डिंपल प्रकाशन; चौथी आवृत्ती राजहंस प्रकाशन, पुणे

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">