WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Prof. Dr. Nitin Karmalkar | प्रा. डॉ. नितीन करमळकर

Prof. Dr. Nitin Karmalkar | प्रा. डॉ. नितीन करमळकर

प्रा. डॉ. नितीन करमळकर
* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू (२०१७–२०२२) असलेले प्रा. डॉ. नितीन रघुनाथ करमळकर हे शिक्षणक्षेत्रातील बहुपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
* पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. आणि पीएच.डी. (१९८८) या पदव्या संपादन केल्यानंतर त्यांनी भूगर्भशास्त्र व पर्यावरणशास्त्र या विषयांत दीर्घकाळ अध्यापन आणि संशोधन केले.
* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र आणि भूगर्भशास्त्र विभागांचे प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले.
* संशोधनातील गुणवत्तेसाठी मिनरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, म्हैसूर यांच्यातर्फे प्रा. सी. नागण्णा सुवर्णपदकाने त्यांचा गौरव करण्यात आला.
* त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संपादन केली.
* जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस अशा अनेक नामवंत संस्थांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.
* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अध्यापन आणि संशोधनाबरोबरच त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या.
* १८ मे २०१७ रोजी त्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली.
* त्यांच्या नेतृत्वाखाली श्रेयांक पद्धती (क्रेडिट सिस्टम) विकसित करण्यात आली.
* संशोधनासाठी आवश्यक यंत्रणा, विद्यापीठाची उपकेंद्रे आणि कौशल्य विकास केंद्र यांचे बळकटीकरण करण्यात आले.
* त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात पोस्टडॉक्टोरल फेलोशिप प्रोग्रॅम सुरू झाला.
* एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन आणि रिसर्च पार्क फाउंडेशनची स्थापना त्यांच्या नेतृत्वाखाली झाली.
* त्यांच्या कुलगुरूपदाच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सन्मान मिळवले.
* याच काळात त्यांनी सोलापूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या प्रभारी कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभारही काही काळ सांभाळला.
* कन्सॉर्शियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशनच्या नियामक मंडळाचे सदस्य म्हणून ते तीन वर्षे कार्यरत होते.
* फ्रान्स आणि महाराष्ट्र यांच्यातील द्विपक्षीय शैक्षणिक संबंध विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांची सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.
* इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर), दिल्लीचे सदस्य म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले.
* केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओसायन्सेस, लखनऊचे अध्यक्ष म्हणून त्यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली.
* महाराष्ट्र विज्ञानवर्धिनीचे ते उपाध्यक्ष आहेत.
* महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने त्यांची सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली असून ते या जबाबदारीचे कार्यक्षमतेने पालन करत आहेत.
मंगला गोडबोले
जन्म: २ फेब्रुवारी १९४९
शिक्षण:
* बी.ए. (मराठी/मानसशास्त्र), एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई – १९६८
* एम.ए. (मराठी/भाषाशास्त्र), मुंबई विद्यापीठ – १९७०
* एम.ए. परीक्षेत प्रथम क्रमांक.
* नॅशनल स्कॉलरशिप आणि दक्षिणा फेलोशिप प्राप्त.
* न. चिं. केळकर सुवर्णपदक प्राप्त.
कार्यभार:
* महिला महाविद्यालय, विलेपार्ले येथे अध्यापन – १९७०–७१
* ‘स्त्री’ मासिकात संपादन साहाय्य – १९८०–८४
* ‘माहेर’ मासिकात संपादन साहाय्य – १९८८–२०१०
महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार:
* वयात येताना – १९८६–८७
* अल्बम – १९९९–२०००
* अशी घरं... अशी माणसं – २००१–२००२
* काय तुझ्या मनात? – २००४–२००५
* पर्स हरवलेली बाई – २००५–२००६
* पण बोलणार आहे – २००९–२०१०
* सही रे सही – २०१०–२०११
* ऋतू हिरवट – २०१४
* सती ते सरोगसी – २०१८
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार:
* पुन्हा झुळूक – चिं. वि. जोशी पुरस्कार, उत्कृष्ट विनोदी पुस्तक – १९८९
* ‘निरोप’ (लेख) – अनंत काणेकर पुरस्कार, उत्कृष्ट ललित गद्य – १९९०
* सौ. शांताबाई शिरोळे पुरस्कार, लक्षणीय लेखिका – २००१
* सही रे सही – वि. वि. बोकील पुरस्कार, बालसाहित्य – २०१०
इतर पुरस्कार:
* वर्धापनदिन पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालय – १९९८
* सु. ल. गद्रे मातोश्री पुरस्कार – १९९९
* यशोदाबाई शिरुडे पुरस्कार, कोथरूड उपनगर साहित्य संमेलन – २०००
* आडवळण – सार्वजनिक वाचनालय, नाशिक, वि. मा. दी. पटवर्धन पुरस्कार – २००१
* दिवा – उत्कृष्ट लेखिका पुरस्कार – २००४
* ब्रह्मवाक्य – मॅजेस्टिक प्रकाशनाचा जयवंत दळवी पुरस्कार – २००४
* साहित्य क्षेत्राचा जीवनगौरव पुरस्कार, वनिता समाज, दादर – २००९
* पण बोलणार आहे – अभिरुची गौरव पुरस्कार, मराठी वाङ्मय परिषद, बडोदे – २०११
* साहित्यिक कामगिरीचा जीवनगौरव पुरस्कार, अ‍ॅड. डी. आर. नगरकर फाउंडेशन, पुणे – २०१४
* पुणे महानगरपालिका साहित्य पुरस्कार – २०१८
* पुणे मराठी ग्रंथालयाचे कै. सरोजिनी शारंगपाणी पारितोषिक – २०१९
* साहित्य प्रतिष्ठानचा कथादीप पुरस्कार – २०२२
* साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ – २०२२
* जीवनगौरव पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय, कल्याण – २०२४
इतर साहित्यिक कार्य:
* आकाशवाणीवर विपुल लेखन केले.
* नभोनाट्यांच्या अखिल भारतीय स्पर्धेत त्यांच्या दोन नभोनाट्यांची निवड झाली.
* त्यांच्या लेखनाचे सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
* काही लेखनाचे हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि कन्नड भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
* त्यांच्या लेखनाचा समावेश बालभारतीच्या मराठी गद्य-पद्यसंग्रहात करण्यात आला आहे.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">