WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!

Shobha Bhagwat | शोभा भागवत

शोभा भागवत (२९ ऑगस्ट, १९४७ - ८ डिसेंबर, २०२३)
या बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका आणि प्रामुख्याने मुलांसंबंधी पुस्तके लिहिणाऱ्या लेखिका होत्या. त्या पुण्यातील गरवारे बालभवनच्या संचालिका होत्या.
पुस्तके
आपली मुलं (मार्गदर्शनपर)
गंमतजत्रा (बालसाहित्य)
गारांचा पाऊस (मार्गदर्शनपर)
बहुरूप गांधी (अनुवादित बालसाहित्य, मूळ इंग्रजी लेखक - अनु बंदोपाध्याय) . या पुस्तकाला जवाहरलाल नेहरूंची प्रस्तावना आहे.
मूल नावाचं सुंदर कोडं (मुलांच्या बोलांचे संकलन)
विश्व आपलं कुटुंब (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - कृष्णकुमार). - मार्गदर्शनपर.
सारं काही मुलांसाठी (मार्गदर्शनपर)
पती अनिल भागवत यांच्यासोबत त्यांनी स्थापन केलेल्या 'विवाह अभ्यास मंडळा'चंही काही पिढ्यांना मोठं आकर्षण होतं.
गरवारे बालभवनाच्या मोक्याच्या जागेवर काही राजकारणी मंडळींचा डोळा होता. मुलांच्या हक्काची जागा जाऊ नये, म्हणून शोभाताईंसोबत पुण्यातील अनेक पालक उभे राहिले आणि त्यांनी अखेर ही जागा वाचविली.
शोभाताईंचं सगळं आयुष्यच मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी समर्पित होतं. त्यांनी मुलांसाठी व पालकांसाठी ४० हून अधिक पुस्तकं लिहिली. हजारो व्याख्यानं दिली.
पुण्यातील अनेक शाळांच्या नियामक मंडळांवर त्यांनी काम केलं.
पुणे महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">