WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!

Sulbha Pishvikar | सुलभा पिशवीकर

सुलभा पिशवीकर
सुलभा शरद पिशवीकर (माहेरच्या गोडबोले) या एक शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिका असून संगीत विषयावर लिहिणाऱ्या लेखिका आहेत.
सुलभा पिशवीकर या एस.एस.सी. च्या परीक्षेत महाराष्ट्र बोर्डात आठव्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांना बोर्डाचे 'चॅटफील्ड पारितोषिक' आणि मराठीचे 'पद्मसेना बाबूराव जोशी पारितोषिक' मिळाले होते.
पुणे विद्यापीठाच्या बी.ए. परीक्षेत अर्थ शास्त्राचे 'कोल्हटकर पारितोषिक'
एम. ए. (अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र )
१९६७ ते २००१ या काळात राज्यशास्त्रचे महाविद्यालयीन अध्यापन.
श्यामराव बेंद्रे, पं. प्रभूदेव सरदार, सरदारबाई कारगदेकर, गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण.
पुणे विद्यापीठ युवक महोत्सवात दोन वेळा शास्त्रीय संगीताचे, 'नाट्याचार्य काखादिलकर पारितोषिक'.
आकाशवाणी आणि दूरदर्शनची अर्हताप्राप्त कलाकार.
महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर प्रतिष्ठित संगीतमंडळे आणि संगीत-संमेलनात गायन.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">