-
Sale! Add to cartआपल्या मेंदूवर अवलंबून असते आपले वर्तन आणि आपल्या वर्तनाने आपला मेंदूही बदलू शकतो. मानवी वर्तन अनेक चलपदांवर (variables) आधारित असते. त्यातील सर्वांत महत्त्वाची चलपदे म्हणजे भावभावना. या अमूर्त भावभावना कोट्यवधी वर्षे उत्क्रांत झाल्या आहेत. अशा अमूर्त गोष्टींचा शोधविचार तत्त्वज्ञान, धर्म, ईश्वरशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य, कला या सर्वांनी केला आहे आणि करतही आहेत. अलीकडच्या काळात प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून मानवी वर्तनावर प्रकाश टाकण्याचे काम विज्ञानानेही अंगावर घेतले आहे. विज्ञानाच्या या शाखेला वर्तनविज्ञान (Ethology) म्हणतात. जसजसा मेंदूविज्ञानाचा आणि त्याला पूरक व पोषक जैवतंत्रज्ञानाचा विकास होत गेला, तसतसा संशोधनाचा दिशाकोन बदलत गेला. मानवी भावभावनांची आणि पर्यायाने मानवी वर्तनाची पाळेमुळे मेंदूत असली पाहिजेत, या विज्ञानाच्या विचारधारेला बळकटी आली. मेंदूविज्ञानाबद्दल कुतूहल जागृत करणारे आपले वर्तन आपला मेंदू
All BooksApale Vartan-Apala Mendoo | आपला वर्तन आपला मेंदू
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cart'सवंग सुख ही संस्कृती, अधिकाधिक सत्ता हे साध्य, नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन अशा कोलाहलाने भरलेल्या वर्तमानात वैचारिकतेचा संकोच होतोय. मुक्त विचारांशी शत्रुत्व म्हणजे हुकूमशाहीला अन् झुंडशाहीला आमंत्रण. ही वेळ आहे विचारांचे जागरण करण्याची. म्हणून वेद-उपनिषदांपासून फुले-आगरकरांपर्यंत, सॉक्रेटिस-प्लेटोपासून चॉम्स्की-डेरिडापर्यंत पूर्व-पश्चिमेतील प्रमुख विचारवंतांचा अन् त्यांनी मांडलेल्या विचारधारांचा वेध. '
समाजकारण / राजकारणApale Vichar Vishva | आपले विचारविश्व
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cart'समलैंगिकता ही माझी अगदी व्यक्तिगत, वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापासून प्रत्येक क्षणी अनुभवलेली जाणीव. तिला समाजमान्यता नसल्याने, तिची सतत विचित्र म्हणून हेटाळणी होत असल्याने ती अनुभवताना अनेक विचारचक्रे माझ्या डोक्यात कायम चालू असायचाr, अजूनही असतात. माझे हे अनुभव आणि त्यावरचे विचारमंथन कधी मला खूप समृध्द करून गेले, तर कधी पराकोटीचे अस्वस्थ ! 'समाजमान्यता हा शिक्का बरेचदा निष्ठूर, दुराग्रही आणि अज्ञानमूलक असतो हे अनुभवून झाले़. मी समलैंगिक आहे हे सांगण्याचा निर्णय अंमलात आणायला पंचवीस वर्षे लागली आणि त्यातून साकार झाले आपुले आपण '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेApule Apan | आपुले आपण
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartआर्मी जनरलंच व्हायचंय ! हे डॉ. श्रीराम गीत यांनी लिहिलेले पुस्तक सहज नजर फिरवावी म्हणून हाती घेतले. पण सुरूवात केल्यावर संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवूच नये असे वाटले. मी एक पुस्तक वाचतो आहे की माझ्या जुन्या डायरीची पाने ? हेच कळत नव्हते. अगदी आय्. एम्. ए. मधील सोनेरी दिवस पुन्हा:पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले. सैन्यदलात अधिकारी होण्याची इच्छा अनेक तरूणांमधे असते. पण आर्मी ऑफिसर होण्यासाठी किती खडतर प्रवास करावा लागतो याची यथायोग्य जाणीव हे पुस्तक वाचून होते. आर्मी ऑफिसर नेमके काय करतो ? याबाबत सुटसुटीत, सखोल व सुयोग्य मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. मुलांना आणि त्याच्या पालकांना अतिशय उपयुक्त ठरेल, असे हे पुस्तक आहे. वाय.डी. सहस्त्रबुद्धे (रिटायर्ड लेफ्टनंट जनरल.)
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Army Generalch Vahychay ! | आर्मी जनरलच व्हायचंय!
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartस्वस्थ कोण ? जो स्व मध्ये स्थित आहे, तो स्वस्थ म्हणजेच निरोगी. याचा अर्थ आरोग्य स्वत:वर अवलंबून असते. जो स्वत:मध्ये स्थित नाही, तो अ-स्वस्थ म्हणजेच आजारी. रोगी दुसर् यांवर अवलंबून असतो. स्वस्थ शब्दामध्ये परावलंबनापासून स्वातंत्र्य हा अर्थ गर्भित आहे. स्वराज्य म्हणजे स्वत:चे राज्य नसून स्व वर राज्य, स्वत:चे नियंत्रण. स्वस्थ व स्वराज्य दोन्ही मिळून नवी संकल्पना तयार होते आरोग्य-स्वराज्य ! म्हणजेच आपल्या आरोग्यावर आपली सत्ता. व्यक्ती, कुटुंब, गाव व देश यांनी आरोग्य-स्वराज्य या मार्गावर वाटचाल कशी करायची ? सांगत आहेत, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. अभय बंग.
All BooksArogya-Swarajya | आरोग्य-स्वराज्य
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartस्वयंपाकघर असो अथवा वास्तुशास्त्र. विद्यार्थी असोत अथवा पोलीस. प्रतिकारशक्तीचे वर्धन असो वा अवयवदान. वंध्यत्व असो वा गर्भारपण. विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कितीतरी व्यक्ती. त्यांच्या कार्यपद्धतीचा, जीवनशैलीचा सम्यक विचार डोळ्यांपुढे ठेवून आहार-व्यायाम-विश्रांती-विचार या महत्त्वपूर्ण बाबींवर सोप्या पण अत्यावश्यक टिप्स देणारा आरोग्य संवाद
All BooksArogyasamvad | आरोग्य संवाद
₹320.00Original price was: ₹320.00.₹240.00Current price is: ₹240.00. Save ₹80 Add to cart -
Sale! Add to cartआमच्या संसारवेलीवरचे पहिले फूल. पण ते कधीच पूर्ण फुलणार नाही, हे समजले, आणि सुरु झाली तिच्या संगोपनाची बिकट वाट. तीच पुढे झाली वहिवाट, नित्य नवी आव्हाने, रोज नवे खाचखळगे, सततची अनिश्चितता, चिंता आणि आशा-निराशेचे हिंदोळे. या वाटेने अनेकदा दमवले, थकवले, हरवले, पण खूप काही शिकवलेसुध्दा. प्राप्त परिस्थितीचा स्वीकार, आणि झुंजण्याचा निर्धार.. माणसे वाचण्याचे कसब, आणि त्यांच्या वागणुकीमागचा विचार. आरोहीच्या जन्मापासून सुरू झालेले हे शिक्षण, आजही सुरूच आहे.
All BooksArohi-Vishesh Phul Phultana | आरोही
₹360.00Original price was: ₹360.00.₹270.00Current price is: ₹270.00. Save ₹90 Add to cart -
Sale! Add to cart'जी. ए. कुलकर्णी म्हणजे एक अरभाट साहित्यिक! अवघ्या सत्त्याण्णव कथांमधून जीवनाचा भला मोठा पैस कवेत घेणारे कथाकार. जितके प्रतिभेच्या तेजाने तळपणारे, तितकेच गूढतेचे धूसर वलय बाळगणारे. ना कोणात मिसळणारे, ना कुणाला भेटणारे. ना सभासमारंभात मिरवणारे, ना कुणाला सामोरे जाणारे. कसा शोध घ्यायचा या लेखकाच्या मनातल्या अंत:प्रवाहाचा? वाचकाला थक्क करणारी त्यांच्या कथासृष्टीतली पात्रे, परिसर, कथानक आले तरी कोठून? जी. एं. च्या वैशिष्टयपूर्ण अर्पणपत्रिकांनी वि. गो. वडेर यांना साद घातली. आणि त्यातून ते शोधत गेले - जी. एं. च्या आयुष्यातील व्यक्ती आणि कथांतील पात्रे. या प्रयासातून उभे राहिलेले हे पुस्तक !
रसग्रहण / समीक्षाArpanpatrikatun G.A. Darshan | अर्पणपत्रिकांतून जी.ए. दर्शन
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreअर्थशास्त्राच्या सिध्दांतांचा आणि धोरणांचा अत्युत्कृष्ट, चित्तवेधक इतिहास आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्रं म्हणजेच 'अर्थात'! अतिशय अचूकपणे आणि रसाळ शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचकांना अतिशय उपयोगी ठरेल. डॉ. भालचंद्र मुणगेकर माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ माजी सदस्य, प्लॅनिंग कमिशन, भारत सरकार अर्थशास्त्राच्या उगमापासून सद्य:स्थितीपर्यंतचा विषय मांडणारं 'अर्थात' एक इनसाइटफुल पुस्तक. मराठीत अशा पुस्तकाची अत्यंत गरज असताना हे पुस्तक मराठीत यावं, ही फारच चांगली गोष्ट आहे. लेखकाची शैली प्रवाही, खिळवून टाकणारी आहे. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांतून सांगण्याची हातोटी लाभली आहे. विद्यार्थी आणि संशोधक दोघांनीही जरूर वाचावे. डॉ. डी. एम. नाचणे डायरेक्टर, इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च, मुंबइ सर्वसमावेशी, बहुआयामी आकलनातून अर्थशास्त्राकडे पाहणारं हे पुस्तक. यात संकल्पना, तात्त्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वच बाबींची सखोल मीमांसा आहे. अच्युत गोडबोल्यांची जादुई लेखणी एका रुक्ष विषयाचं आणि एका 'कंटाळवाण्या' भकास शास्त्राचं मजेदार आनंदी साहसयात्रेत रूपांतर करून टाकते! डॉ. अभय पेठे डायरेक्टर आणि चेअर प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग, माजी डीन, फॅकल्टी ऑफ आर्ट्स, मुंबई विद्यापीठ अर्थक्षेत्रातील नामवंतांनी गौरवलेली विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक आणि सा-यांसाठीच गुंतागुंतीचे अर्थशास्त्र सोपे करून सांगणारी, अर्थशास्त्रातील इतिहास, सिध्दांत अन् चरित्रांचा वेध घेणारी एक रंजक सफर मराठीत प्रथमच
कायदाविषयक - अर्थव्यवहारArthat | अर्थात
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'अर्थशास्त्राच्या सिध्दांतांचा आणि धोरणांचा अत्युत्कृष्ट, चित्तवेधक इतिहास आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्रं म्हणजेच अर्थात! अतिशय अचूकपणे आणि रसाळ शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचकांना अतिशय उपयोगी ठरेल. डॉ. भालचंद्र मुणगेकर माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ माजी सदस्य, प्लॅनिंग कमिशन, भारत सरकार अर्थशास्त्राच्या उगमापासून सद्य:स्थितीपर्यंतचा विषय मांडणारं अर्थात एक इनसाइटफुल पुस्तक. मराठीत अशा पुस्तकाची अत्यंत गरज असताना हे पुस्तक मराठीत यावं, ही फारच चांगली गोष्ट आहे. लेखकाची शैली प्रवाही, खिळवून टाकणारी आहे. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांतून सांगण्याची हातोटी लाभली आहे. विद्यार्थी आणि संशोधक दोघांनीही जरूर वाचावे. डॉ. डी. एम. नाचणे डायरेक्टर, इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च, मुंबई सर्वसमावेशी, बहुआयामी आकलनातून अर्थशास्त्राकडे पाहणारं हे पुस्तक. यात संकल्पना, तात्त्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वच बाबींची सखोल मीमांसा आहे. अच्युत गोडबोल्यांची जादुई लेखणी एका रुक्ष विषयाचं आणि एका कंटाळवाण्या भकास शास्त्राचं मजेदार आनंदी साहसयात्रेत रूपांतर करून टाकते! डॉ. अभय पेठे डायरेक्टर आणि चेअर प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग, माजी डीन, फॅकल्टी ऑफ आर्ट्स, मुंबई विद्यापीठ अर्थक्षेत्रातील नामवंतांनी गौरवलेली विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक आणि सा-यांसाठीच गुंतागुंतीचे अर्थशास्त्र सोपे करून सांगणारी, अर्थशास्त्रातील इतिहास, सिध्दांत अन् चरित्रांचा वेध घेणारी एक रंजक सफर मराठीत प्रथमच '
कायदाविषयक - अर्थव्यवहारArthat | अर्थात (सायकॉम)
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Read more
">
Skip to content