-
Out of stock
Out of stock
Sale! Read more'बेळगावसारख्या छोटया गावातला हुशार पण हूड मुलगा ते भारतीय नौसेनेचे सरसेनापती - सरखेल! आपल्या नेतृत्वगुणांच्या बळावर हे शिखर गाठणारा मराठी दर्यासारंग. आजच्या तरुणाईच्या महत्त्वाकांक्षेला, कर्तृत्वाला वाव देणारे अथांग क्षेत्र म्हणजे सेनादलातील सहभाग. या सहभागासाठी आवाहन करणारे प्रेरणादायी चरित्र ॲडमिरल भास्कर सोमण नौसेनेचे सरखेल'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAdmiral Bhaskar Soman-Nouseneche Sarkhel | अॅडमिरल भास्कर सोमण- नौसेनेचे सरखेल
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cartस्वामी विवेकानंदांचे नाव आणि ढोबळमानाने त्यांचे चरित्र आपल्याला माहीत असते; पण संन्यास घेतल्यानंतरही स्वामीजींनी संवेदनशीलता जपली होती, जन्मदात्या आईसाठी कौटुंबिक भाऊबंदकीत लक्ष घालणे त्यांना भाग पडले होते, अगदी कोर्टकचे-याही कराव्या लागल्या होत्या... हा असा तपशील मात्र आपल्याला ठाऊक नसतो. त्यांच्या चरित्रातील अशा अज्ञात पैलूंवर प्रकाशझोत टाकणारे हे पुस्तक. स्वामीजींचे पाककौशल्य, त्यांच्या खानपानातल्या आवडीनिवडी, त्यांनी परदेशांत वेदांताप्रमाणेच बिर्याणीचाही केलेला प्रसार, त्यांचे चहावरचे कमालीचे प्रेम, त्यांना जडलेले त-हेत-हेचे आजार आणि त्यांच्या आरोग्यामध्ये सतत होत राहिलेले चढउतार, पशुपक्ष्यांबद्दलचे त्यांचे प्रेम, आपला अंतकाळ जवळ आल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी केलेली कौटुंबिक निरवानिरव, त्यांनी सतत जवळ बाळगलेली गंगाजलाची कुपी... आणि सर्वांनाच चटका लावून गेलेले त्यांचे महानिर्वाण... हे आणि असे असंख्य अज्ञात पैलू उजेडात यावेत, या हेतूने 'शंकर' या टोपणनावाने प्रसिध्द असणा-या बंगाली साहित्यिकांनी विवेकानंदविषयक देशीविदेशी साहित्याचा धांडोळा घेऊन तयार केलेले हे पुस्तक बंगालमध्ये विक्रमी लोकप्रियता कमावणारे ठरले. आता ते थेट बंगालीतून मराठीत अवतरले आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAdnyat Vivekanand | अज्ञात विवेकानंद
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cartऋग्वेदातील ऋचा रचल्या गेल्या त्या अफगाणिस्तानातील अमू नदीच्या काठी. पारश्यांचा धर्मग्रंथ अवेस्ता हा देखील झरतुष्ट्राने इथेच लिहिला. त्यानंतर इथल्या पर्वतपहाडांच्या द-याखो-यांतून बुद्धं सरणं गच्छामि चे सुर निनादले. आज त्याच प्रदेशात अल काईदाचे वेगळ्याच प्रकारचे साहित्य सापडले आहे - सर्व त-हेची विध्वंसक कृत्ये करण्याचे पद्धतशीर शिक्षण देणारे साहित्य. मुळात हा प्रदेश होता अश्र्वगणस्थान. काळाच्या ओघात तो झाला अफगाणिस्तान. १९७९ च्या अखेरीस रशियन सैन्य अफगाणिस्तानात घुसले तेव्हा संतापलेल्या सर्वसामान्य अफगाणांनी चिडून म्हटले होते, आज आमचे अफगाणिस्तान मेले. आता आमच्या देशाचे नाव ठेवायसा हवे. शोहखीस्तान . त्यानंतर २४ वर्षांच्या युद्धामुळे पूर्णपणाने पिळवटून निघालेले, भांबावलेले, संतापलेले सर्वसामान्य अफगाण भविष्याकडे आशेने नजर लावून बसले आहेत. पण तिथे सरकार स्थिर राहू नये, शांतता नांदू नये म्हणून प्रयत्न करणा-या, आपले स्वार्थ जपणा-या अंतर्गत शक्ति आहेत, बाहेरच्या शक्तिही आहेतच. जर तिथे शांतता स्थापन झाली नाही, तर पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडणार आहे. एका बाजूला जगातील इस्लामेतर शक्ति आणि सत्तांचा विध्वंस करायला सज्ज झालेला दहशतवाद आहे; तर दुस-या बाजूला जगावर निरंकुश सत्ता गाजवायला सिद्घ झालेल्या पाश्चात्य साम्राज्यवादाचा म्होरक्या बलिष्ट अमेरिका आहे. या जात्यात आज अफगाणिस्तान भरडून निघाला आहे, तर इतर देश सुपात आहेत. इतिहासाच्या या स्तिमित करणा-या वाटचालीचा वेध घेणारे पुस्तक.
समाजकारण / राजकारणAfgan Dairy : Kal Aani Aaj | अफगाण डायरी : काल आणि आज
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartआफ्रिकेत रंगला नृत्य मेळा भारतातल्या निवडक पक्ष्यांना आफ्रिकेतल्या नृत्यमहोत्सवाचे निमंत्रण आले. तिथे कोण कोण गेले आणि महोत्सव कसा पार पडला ? चला, वाचू या, या पुस्तकात !
All BooksAfriket Rangla Nrutya Mela | आफ्रिकेत रंगला नृत्य मेळा
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartएका हातात पिस्तुलाची जळती आग दुस-या हातात स्फोटक निखारा. वेदनांच्या अन् यातनांच्या, जळत्या लाव्हातून हे अग्निपुत्र सशस्त्र क्रांतीची वाट चालले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केल. अवघ्या अडीच वर्षांत ब्रिटीश साम्राज्याला विजचा तडाखा देणा-या हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा तेजस्वी इतिहास.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAganiputra | अग्निपुत्र
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडयाच्या पोटी 1931मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे.'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAgnipankh | अग्निपंख
₹395.00Original price was: ₹395.00.₹296.00Current price is: ₹296.00. Save ₹99 Add to cart -
Sale! Add to cartमी नास्तिक आहे. संदेहवाद्यांसारखा अर्घवट नास्तिक नव्हे, तर संपूर्ण नास्तिक. तरीही मी अश्रद्ध नाही. माझी विठ्ठलावर आणि वारकरी संतांवर अपार श्रद्धा आहे. मी त्यांचा आणि केवळ त्यांचाच अनन्यभक्त आहे. त्यांच्या केवळ स्मरणानेही कंठात गहिवर दाटतो, डोळ्यांत पाणी साचते. या वारकरी संतांच्या साहित्यातून मला विठ्ठलाचे जे दर्शन घडले ते शब्दरूपाने साकार करणे, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट. जगात असा दुसरा देव नाही !
तत्वज्ञान / व / धर्मAisa Vithevar Dev Kothe | ऐसा विठेवर देव कोठे
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartगणितातली आकडेमोड अनेकाना भांबावून सोडत असली, तरी संख्यांचे काह्रे विश्व मुलीच भीतिदायक नाही. अंकांच्या परिघापलीकडचे गूढ रहस्य एकदा उलगडले की, मग विविध कूटप्रश्न खेळातल्या सवंगड्यांसारखे जवळचे वाटू लागतात. त्यांच्याशी सलगी करावीशी वाटते. समीकरणे जुळवण्याचा आणि सोडवण्याचा छंद जडतो. गणितासारख्या किचकट वाटणा-या विषयातली अनेक प्रेमेये हसतखेळत उलगडून दाखवणारे हे पुस्तक सर्वसामान्य वाचकालाही सहज समजू शकेल, अशा सुबोध शैलीत लिहिलेले आहे. गणिताच्या अभ्यासकांनाही ते उपयुक्त वाटेल, इतके स्खोइल आणि साधार आहे. अशा दुहेरी वैशिष्ट्यांनी सजलेले हे पुस्तक वाचकांना ऐतिहासिक सफर घडवीत थेट सध्याच्या संगणकप्रधान युगातील गणितापर्यंत घेऊन पोचते आणि आपल्याला पूर्वी जे सहज समजत नव्हते, ते आता समजू लागले आहे. अशी आनंददायी जाणीव वाचकाला होते.
संकीर्णAisi Prameye Rasike | ऐसी प्रमेये रसिके
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cart... गप्पांच्या ओघात एकदा दुर्गाबाई मला म्हणाल्या, "मला जगण्याचं सुख वाटतं बघ." बाईंच्या या बोलांचा मला अपार विस्मय वाटला. त्यांचं हे विधान मला थोडंसं धाष्टर्याचंही वाटलं. कारण आपण माणसं नेहमी कशा ना कशासाठी सतत कुरकुरत असतो. तर मनाला, बुध्दीला व्यग्रता असता, काही ना काही सतत दुखतखुपत असता ही एकोणनव्वद वर्षांची बाई म्हणते, "मला जगण्याचं सुख वाटतं बघ." यामागचं रहस्य कशात आहे ? ते आहे बाईंच्या जीवनोत्साहात. त्यांच्या वृत्तींमध्ये नित्य ताजेपणा आहे. त्यांना जगाबद्दल, जगण्याबद्दल अपार उत्सुकता आहे. ज्ञानाची परमकोटीची ओढ आहे. आपलं आयुष्य म्हणजे ईश्वरानं दिलेली देणगी आहे, अशा भावनेनं त्यांची जीवनावर, जीवनमूल्यांवर अम्लान, अव्यभिचारी निष्ठा आहे. त्यामुळेच रोजचा दिवस त्यांना नवी उमेद देतो. त्यांना जग, जगणं शिळं वाटत नाही. म्हणूनच त्यांना म्हातारपणाची अडचण वाटत नाही, की मृत्यूचं भय वाटत नाही. जगण्याचं सुख वाटतं...
संवादAispais Gappa Durgabainshi | ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart
">
Skip to content