-
Sale! Add to cart'बाई. या दोन अक्षरांनी मराठी रंगभूमीचं अर्धशतक स्वत:त सामावून घेतलं आहे. ह्या पन्नास वर्षांत अनेक नाटककार, कलावंत नि तंत्रज्ञ बाईंच्या जगाशी एकरूप झाले. ती दुनिया या पुस्तकात लखलखते आहे. रंगभूमी हा माणसांनी, माणसांसाठी नि माणसांव्दारा रचलेला अद्भुत खेळ आहे, हे विजयाबाईंना पक्कं ठाऊक आहे. मराठी रसिकांना त्यांच्या अविस्मरणीय नाटयकृतींची जबरदस्त मोहिनी पडली हे तर खरंच; परंतु विजयाबाईंनी मराठी रंगभूमीला ग्लोबल थिएटरशी विचारविनिमय करण्याचं बळ दिलं, प्रतिष्ठा दिली; हे निश्चितच त्यांचं मोठेपण. विजयाबाईंच्या कलाकिर्दीला रेनसाँची भव्यता लाभली आहे. त्यांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा आणि समृद्ध जाणिवांचा तटस्थ आणि सहृदय विचार, ही या पुस्तकाची प्रधान प्रेरणा आहे. विजयाबाईंनी अनेकांना मोठं केलं; अनेक लेखक-कलावंत घडवले. त्यांच्या शिष्यांची, सहकाऱ्यांची हृद्य मनोगतं हे या पुस्तकाचं लोभस वैशिष्टय. पु. ल. देशपांडे, श्री. पु. भागवत, दामू केंकरे, भक्ती बर्वे, डॉ. श्रीराम लागू, मोहन तोंडवळकर अशांच्या अल्पाक्षरी, रसरशीत शैलीत बाईंनी लिहिलेल्या शब्दचित्रांमुळे पुस्तकाचं मोल वाढलं आहे. बाई वाचकांना दीर्घकाळ आनंद देईल, हे निर्विवाद ! झिम्मा हे बाईंचं आत्मचरित्र. बाई हे एका रंगपर्वाचं चरित्र.
संवादBai- Eka Rangparvacha Manohar Pravas | बाई – एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartसमान मानव माना स्त्रीला असे कुसुमाग्रज एका कवितेत म्हणतात. वास्तवात मात्र किमान मानव माना स्त्रीला अशी विनवणी करावी लागते. Man is a rational being. माणूस सुज्ञ, तर्कनिष्ठ असतो असे अँरिस्टॉटलने म्हणून ठेवले आहे. परंतु स्त्रीविषयी विचार करताना, तिच्याशी वागताना मात्र तो तसा राहत नाही. म्हणून तर मानवी हक्कांची सनद लिहिली गेली, तेव्हा त्यात स्त्रीला कुठलेच हक्क दिले गेले नाहीत. कालांतराने स्त्रियांनीच सुज्ञ होऊन, तर्कनिष्ठ राहून आपणसुध्दा आधी मानव आहोत हे सांगण्यास सुरुवात केली. त्यांचे हे सांगणे म्हणजेच स्त्रीमुक्तिवाद. किमान तो तरी सुज्ञपणे आणि तकनिष्ठ राहून समजून घ्यावा यासाठी हा पुस्तक प्रपंच.
समाजकारण / राजकारणBaimanus | बाईमाणूस
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartहैद्राबाद मुक्तिसंग्राम हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान. या मुक्तिलढ्यातील गोवर्धन सराळा च्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा तरुण - शिवाजीराव गऊळकर. अदम्य धाडस, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण हे शिवाजीरावांचे स्वभावपैलू स्वातंत्र्यसैनिक म्हणून झळाळून उठले. साहित्यिक वृत्तीच्या गऊळकरांनी आपल्या आठवणींमधून केवळ स्वत:चे आयुष्य मांडले नाही; तर तो काळ, त्या काळातील विलक्षण माणसे अक्षरश: जिवंत केली आहेत. सत्ता या घटकाकडे आवर्जून पाठ फिरवलेल्या पिढीतील एका बहुआयामी पण काहीशा दुर्लक्षित व्यक्तिमत्त्वाची प्रेरक कहाणी.
All BooksBakhar Anamikachi | बखर अनामिकाची
₹330.00Original price was: ₹330.00.₹248.00Current price is: ₹248.00. Save ₹82 Add to cart -
Sale! Add to cartभारतावर गेली दीडशे वर्षे राज्य करणा-या इन्कमटॅक्स कायद्याची कुळकथा आहे. पण हा प्राप्तिकर कायद्याचा रटाळ इतिहास नाही. एक कायदा कसा मोठा होत गेला, त्याची ही गोष्ट आहे. जेम्स विल्सन, जेरेमी रैसमान, सी. डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, मनमोहन सिंग, प्रणब मुखर्जी यांच्यासारखे प्रतिभावंत अर्थमंत्री या कहाणीचे नायक असल्याने ही कहाणी विलक्षण रोचक बनली आहे. ही केवळ प्राप्तिकराचीच बखर नाही. प्राप्तिकर घडवला जात असताना त्याच्या आसपास सांडलेल्या राजकारणाचीही ही रोमांचकारी गाथा आहे.
कायदाविषयक - अर्थव्यवहारBakhar Bharatiya Praptikarachi | बखर भारतीय प्राप्तिकराची
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cartही बखर कुण्या एका राजाची वा त्याच्या एखाद्या वीर शिलेदाराची नाही. ही आहे भारतीय शास्त्रज्ञांच्या अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील पराक्रमाची बखर. इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. आज नावारूपाला आलेल्या या संस्थेची ही कथा. तिच्या पंखांखाली वावरणा-या जिद्दी आणि देशाभिमानी शास्त्रज्ञांची. त्यांनी उभारलेल्या अग्निबाणांची आणि ते अंतराळात सोडण्यासाठी लागणा-या वाहनांची. प्रयोगांच्या यशापयशाची, शास्त्रज्ञांमध्ये दडलेल्या माणसांमधील संघर्षाची. व्यक्तिगत मानापमानाची आणि सामूहिक सुखदुःखांचीसुध्दा !
इतिहासBakhar Isrochya Agnibananchi | बखर ‘इस्त्रो’च्या अग्निबाणांची
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'स्वातंत्र्यपूर्व काळच्या हिंदुस्थानातील संस्थाने आणि संस्थानिक म्हणजे ब्रिटीशराजच्या इतिहासातील बहुरंगी पाने. कुणाचा इंग्रजांना टोकाचा विरोध, तर कुणी इंग्रजांचे पराकोटीचे लांगूलचालन करणारे. या संस्थानिकांच्या एकमेकांमधील स्पर्धा, त्यांचे विक्षिप्त छंद, विलासी आयुष्य, विचित्र सवयी या साऱ्यांच्या कहाण्या, आख्यायिका अन् दंतकथा बनल्या. एका टोकाला फंदफितुरी, कटकारस्थाने; तर दुसऱ्या टोकाला कला-क्रीडा-साहित्य यांना उदार आश्रय. एकीकडे प्रजेचा पुत्रवत सांभाळ करणारे प्रजाहितदक्ष राज्यकर्ते, दुसरीकडे प्रजेची पिळवणूक करणारे लहरी कुशासक. अशा अनेकविध रंगांनी रंगलेली, महत्त्वपूर्ण संस्थानांच्या वस्तुनिष्ठ इतिहासाचा वेध घेणारी, तरीही कथा-कादंबरीसारखी रंजक असणारी बखर संस्थानांची
इतिहासBakhar Sansthanachi | बखर संस्थानाची
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cart'शिक्षकांनी, पालकांनी वाचले पाहिजे, असा उपदेश सारेच करतात; पण नेमके काय वाचावे, हे सांगितले जात नाही. सुदैवाने मराठीत केवळ शिक्षणासंबंधी आणि शिक्षकांना प्रेरणा देतील अशी किती तरी पुस्तके आहेत. त्यातली अनेक परभाषेतून अनुवादित झाली आहेत. मात्र अशा पुस्तकांची केवळ नावे सांगितल्याने ती वाचावीशी वाटत नाहीत; त्या पुस्तकात काय आहे हे समजले, तर मूळ पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. पिक्चरचा ट्रेलर बघितला की, पूर्ण पिक्चर बघावासा वाटतो ना, अगदी तसे. मराठीतल्या शिक्षणविषयक निवडक पुस्तकांचा ओघवत्या शैलीत परिचय करून देणारे हे पुस्तकांविषयीचे पुस्तक ! केवळ शिक्षकांनीच नव्हे, तर पालकांनीही वाचावे असे. शिक्षणविषयक जाणीव समृद्ध करणारे '
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Bakhar Shikshanachi | बखर शिक्षणाची
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Read more‘आई होणं सोपं नाही गं बाई !’ अनादि अनंत काळापासून चालत आलेलं ‘मातृत्त्व’ आणि तेवढेच पुरातन असे हे शब्द ! म्हणूनच या विषयावर पुष्कळ काही उपलब्ध आहे. मग या पुस्तकाचा असा विशेष कोणता ? तर, माहितीच्या या जंजाळातून नेमकं काय घ्यावं याची आजची गरज ओळखून, ती काळजीपूर्वक तुमच्यापर्यंत पोचवणारा हा लेखाजोखा. सोदाहरण शास्त्रोक्त माहितीपासून,नवनवी उपकरणं, बाळंतपणाचे प्रकार, सर्व प्रकारची लक्षणं, धोके, घ्यायच्या काळज्या, समज-गैरसमज,आहार ते योगासनांर्यंत. नावासकट आत सर्वकाही असणारं -
-
Sale! Add to cart' आज तुमच्यासाठी एक फर्मास भेट आणली आहे. दिलीप प्रभावळकर काकांनी लिहिलेल्या नाटिकांच्या आणि एकपात्रिकांच्या पुस्तकाची. अगदी बालनयापासून त्यांनी अभिनयाचा, लेखनाचा छंद जोपासला. म्हणूनच ते आज नामवंत कलाकार, लेखक होऊ शकले. छोट्या दोस्तांनो ! तुम्हीही तुमच्यामधील कलागुण वाढवा आणि खूप मोठ्ठे मोठ्ठे व्हा. आमचे तुम्हाला शुभाशीर्वाद !
मुलांसाठीBalnatika Ani Ekapatrika | बालनाटिका आणि एकपात्रिका
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart
">
Skip to content