-
Sale! Add to cartवेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्... अशा पवित्र वंदे मातरम् च्या जयघोषात पुण्यवंतांनी केला पराकोटीचा त्याग, तेव्हा कुठे दीडशे वर्षांनंतर उगवली स्वातंत्र्याची पहाट ! आता ७५ वर्षांनंतर, काय आहे चित्र आपल्या देशाचं नि समाजाचं? गर्वानं ऊर भरून यावा असं काही घडलं का? वेदनांचा पूर यावा इतकं काही बिघडलं का? हुतात्म्यांचा त्याग लागला का सार्थकी? केली का आपण पायाभरणी एका बलाढ्य राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यकाळाची? आपले सैनिक, शिक्षक, शेतकरी, आपले शास्त्रज्ञ, राज्यकर्तेही आपलेच आणि अधिकारीही आपणच... आणि आपण सारेच नागरिक? केली का आपण आपापल्या क्षेत्रात कर्तव्यपूर्ती? उद्दिष्टप्राप्ती? शेतकीपासून शिक्षणापर्यंत, अवकाश मोहिमेपासून अणुकरारापर्यंत, हरितक्रांती, दुग्धक्रांती, माहिती तंत्रज्ञानामधली क्रांती, दूरसंचारातली प्रगती, अन्नसुरक्षा, ऊर्जानिर्मिती, आर्थिक विकास, दारिद्र्याशी दोन हात, दहशतवादावरती मात... नानाविध क्षेत्रांत जगातल्या इतर कुठल्याही नवस्वतंत्र राष्ट्रापेक्षा खूप काही जास्त साध्य केलं आपल्या भारत देशानं... पुरावे हवेत? तर हा घ्या आपल्या अमृतमहोत्सवी कामगिरीचा आलेख. काय कमावलं, कसं मिळवलं यांचा धावता लेखाजोखा मांडणारं हे पुस्तक ७५ सोनेरी पाने स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षणचित्रे अविनाश धर्माधिकारी यांच्या सिद्धहस्त लेखणीनं प्रभावी भाषाशैलीत घेतलेला हा ओघवता, वस्तुनिष्ठ आढावा, आपल्या संग्रही हवाच...
All Books75 Soneri Paane | ७५ सोनेरी पाने
₹1,000.00Original price was: ₹1,000.00.₹750.00Current price is: ₹750.00. Save ₹250 Add to cart -
Sale! Add to cartWhy does the Sun shine ? What makes the planets go back and forth in the sky ? What are eclipses ? Questions like these presented challenges to human intellect... some of them took centuries to solve.... But there is no end to this cosmic quest ! When a few outstanding mysteries are resolved, Nature comes out with more. Stars, galaxies, clusters of galaxies, superclusters,.... Black holes, pulsars the timekeepers, the powerful yet compact quasars.... what are these objects ? And of course the expanding universe... did it start with a big bang ? How are today s scientists facing these challenges ? Here is a chance to view and savour the universe in this COSMIC ADVENTURE.
इंग्रजी पुस्तकेA Cosmic Adventure | अ कॉस्मिक अॅडव्हेंचर
₹1,500.00Original price was: ₹1,500.00.₹1,125.00Current price is: ₹1,125.00. Save ₹375 Add to cart -
Sale! Add to cart'समग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे स्थान लेखक म्हणून अढळ व अनन्यसाधारण आहे. नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका, ललितगद्य व पटकथा - संवाद अशा सर्व लिखित व दृक् - श्राव्य माध्यमांवर तेंडुलकरांनी आपल्या अम्लान प्रतिभेची लखलखीत मुद्रा उमटवली. समकालीनता व सार्वकालीनता समर्थपणे अभिव्यक्त करणाऱ्या तेंडुलकरांच्या साहित्याचे अर्थनिर्णयन व पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न एकूण सोळा लेखकांनी अंत:स्फूर्तता आणि वैचारिकता यांचा मेळ घालत येथे केला आहे. कारण कटू सत्याचे प्रयोग करणारे तें तथा तेंडुलकर अ-जून, आजही प्रस्तुत ठरतात.
रसग्रहण / समीक्षाA-Jun Tendulkar | अ-जून तेंडुलकर
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartजागतिक चित्रपटांच्या इतिहासात चिरस्थायी लेणी बनलेले गॉन विथ द विंड / द गॉडफादर / कॅसाब्लांका / सायको / लॉरेन्स ऑफ अरेबिया / २००१ : अ स्पेस ओडिसी हे हॉलीवुडचे सहा चित्रपट. पावलोपावली संघर्ष, अडथळे, कोंडी, आणि वैफल्य अशा भोवंडून टाकणा-या क्षणांनी नाटयपूर्ण बनलेल्या या त्यांच्या निर्मिती कथा.
कलाविचारA-Purva Chitraleni | अ-पूर्व चित्रलेणी
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreविख्यात अणुशास्त्रज्ञ, स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार, डी.आर.डी.ओ.चे संचालक या नात्याने जनसामान्यांना सुपरिचित असणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आता भारताचे राष्ट्रपती झाले आहेत. त्यांच्याबाबत, त्यांच्या कार्याबाबत त्यांच्या लोकप्रियतेला साजेसे विपुल लेखन झाले असले तरीही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू पुरेसे प्रकाशात आलेले नाहीत. एक मनस्वी, वृक्षप्रेमी पर्यावरणवादी...जिवाभावाचे सख्य जोडणारा एक वडीलधारा... ज्याचे जे श्रेय ते त्याला जाहीरपणे देऊ करणारा दिलदार संघनायक... आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावून जाताना नोकरशाहीची कुंपणे ओलांडणारा मानवतावादी... कार्यासक्ती हा आपला गुण इतरांच्याही अंगी बाणावा यासाठी धडपडणारा एक हाडाचा शिक्षक...अशा विविध पैलूंवर त्यांच्या निकटवर्तीयांनी आठवणींच्या रूपाने टाकलेला हा प्रकाशझोत. डॉ. कलामांचे व्यक्तिमत्व त्यामुळे अधिकच झळाळून उठले, तर आश्चर्य वाटायला नको. इस्त्रोमधल्या त्यांच्याच एका जिवलग मित्राने डॉ. कलामाच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला वेध त्यांच्याबद्दलच्या आदरभावात भर घालतो, हेच त्याचे वैशिष्ट आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेA.P.J Abdul Kalam Ek Vyaktivedh | ए.पी.जे. अब्दुल कलाम एक व्यक्तिवेध
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cartमुलांमध्ये वाचनाची गोडी वाढावी, म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक अभिनव उपक्रम राबविणाऱ्या एका शिक्षकाने लिहिलेल्या या कथा ! ग्रामीण मुलांचं भावविश्व उलगडताना त्यांची स्वप्नं, जिद्द आणि आकांक्षा यांचं उत्कट दर्शन या पुस्तकात घडतं. स्थानिक बोली अन् ग्रामीण मातीचा गंध असलेल्या या कथा ग्रामीण आयुष्याचे अनेक पदर ठळकपणे वाचकांसमोर आणणाऱ्या आहेत.
All BooksAabali | आबली
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartमाझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आईबाबा, ताईदादा, आजीआजोबा, मित्रमैत्रिणी अन् इतर कितीतरी मोठ्या माणसांशी दिवसरात्र गप्पा मारता. पण आपल्याच घरात न बोलणारे कितीतरी जण आपल्या अवतीभोवती वावरत असतात. ह्या आहेत घरातल्याच अशा न बोलणा ऱ्यांच्या बोलक्या गोष्टी ! या गोष्टी वाचता वाचता तुम्हाला अबोल वस्तूंच्या धमाल गोष्टी ऐकू येऊ लागतील...
मुलांसाठीAadavi Tour Ani Itar Katha | आडवी टूर आणि इतर कथा
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cart'आई... भाषेतला सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द जीवनातलं सर्वात जास्त गौरवलं जाणारं नातं. आई... कोणाला दिसतो तिच्यात ईश्र्वराचा अंश काहींना आढळतो तिच्यात माणसाच्या संस्कृतीचा सारांश. एकूणच आईविषयी खूप काही सांगता येतं तरीही काही ना काही बाकी राहिल्याचं जाणवून जातं. असं हे आईविषयी, आईपणाविषयी आजवर सांगून झालेलं आणि अजूनही सांगायचं राहिलेलं...'
ललित लेखनAai Tuzyach Thai | आई, तुझ्याच ठायी
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
मार्गदर्शनपर
Aajchya Thalak Batmya | आजच्या ठळक बातम्या
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartनेहाची आजी काही म्हणून वाया घालवायची नाही. आपल्या जुन्या साडीचा तिने काय काय उपयोग केला, ते नेहासोबत आपणही पाहूया.
All BooksAajeechya Yuktya | आजीच्या युक्त्या
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart
">
Skip to content
