इतिहास
-
Sale! Add to cartनाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते ? हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल.
इतिहासNazi Bhasmasuracha Udayast | नाझी भस्मासुराचा उदयास्त
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cart'जवाहरलाल नेहरू. गरीब, अर्धशिक्षित, धर्मपरायण देशाचे धनाढय, उच्चविद्याविभूषित, निरीश्वरवादी पंतप्रधान. नेहरू म्हणजे एक विलक्षण रसायन. आधुनिकतेची आस, परंपरांबद्दल आस्था. मायभूमीवर निस्सीम प्रेम, इतर राष्ट्रांच्याही भल्याची आच. भावुक अन् उमदे. कविमनाचे अन् साहित्यिक पिंडाचे. बुध्दिप्रामाण्यवादी अन् वैज्ञानिक प्रगतीची ओढ असलेले. अलिप्त राष्ट्रांची चळवळ, पंचशील तत्त्वे, सुनियोजित विकासप्रकल्प, औद्योगिकीकरणाचा मजबूत पाया असे भरीव कार्य करणारे नेहरू; पण त्यांनी काश्मीर-प्रश्न राष्ट्रसंघात नेऊन देशाला एक भळभळती जखम करून ठेवली. चीनवर भाबडा विश्वास टाकून देश युध्दाच्या खाईत लोटला. नेहरूंवर अलोट प्रेम करणारी जनताही त्यांच्या या चुका नजरेआड करू शकत नाही. अनेक रसायनांच्या मिश्रणाने बनलेल्या या नवभारताच्या शिल्पकाराचे एम. जे. अकबर लिखित चरित्र आता मराठीत.
इतिहासNehru : Navbharatache Shilpakar | नेहरू : नवभारताचे शिल्पकार
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cart'नेहरू जेवढे लोकप्रिय, तेवढेच माणूसवेल्हाळ. त्यांच्या स्वभावाची ही दोन लोभस वैशिष्टये त्यांच्या सुरक्षा-अधिकाऱ्यांसाठी मात्र त्रासदायक होती. सुरक्षा-यंत्रणा झुगारून देत नेहरू विराट गर्दीत घुसत. उघडया टपाच्या गाडीतून प्रवास करत. कधी गाडीच्या बॉनेटवर बसून सफरचंद खात खात जमावाशी संवाद साधत. मधेच मागच्या-पुढच्या मोटारींचा ताफा थोपवून रस्त्याकडेचा वाहता नळ बंद करायला धावत. नेहरू लहरी होते, रागीट होते, अवखळ होते, प्रेमळ होते आणि रुसकेसुध्दा होते. नेहरूंचे सुरक्षा-अधिकारी केएफ रुस्तमजी यांनी आपल्या रोजनिशीमध्ये पंडितजींची अशी अनेक रूपे टिपून ठेवली आहेत. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवणारी त्या रोजनिशीतील काही निवडक पाने.
इतिहासNehrunchi Savli – Kf Rustamji Yanchya Rojnishitun | नेहरूंची सावली – केएफ रुस्तमजी यांच्या रोजनिशीतून (नेहरुंचे मुख्य सुरक्षा अधिकारी)
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartभारताचा कडवा द्वेष किंवा इस्लामबद्दलचे कर्मठ प्रेम यापैकी कशाभोवतीही पाकिस्तानचे राष्ट्रजीवन धड उभे राहू शकलेले नाही. आपल्या अस्तित्वाचा मूलाधार काय असायला हवा, याचे उत्तर त्या देशाला साठ-बासष्ट वर्षांनंतरही सापडू शकलेले नाही. अराजकाच्या भोव-यात सापडलेल्या आपल्या शेजा-याची ही शोकात्म फजिती किती धोकादायक ठरू शकते, हे सप्रमाण दाखवून देणारे लक्षवेधी पुस्तक.
इतिहासPakisthan …. Asmitechya Shodhat | पाकिस्तान… अस्मितेच्या शोधात
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartपाऊणशे वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतरही एखाद्या देशाला आपल्या अस्तित्वाच्या अर्थाचा प्रश्न पडावा का? पण, पाकिस्तानला तो पडतोय. पाकिस्तान का मतलब क्या?' हा प्रश्न आजही तेथे विचारला जातो; उत्तरासाठी इस्लामचा आधार घेतला जातो; मात्र तेथेही उत्तर मिळत नसल्याने कडवा भारतविरोध जोपासला जातो. धर्म आणि भारतविरोध यांच्या चौकटीतच आपले अस्तित्व टिकविण्याच्या नादात पाकिस्तानची फसगत झालीय. धार्मिक ओळख कमी करावी, तर वेगळेपण काय राहील याची भीती आणि भारतविरोधाची धार सौम्य करावी, तर मग भारतापासून वेगळे का झालो हा प्रश्न. आपल्या अस्तित्वाला या दोन घटकांभोवती केंद्रीत करण्याच्या नादात पाकिस्तान एका चक्रव्यूहात फसला आहे. अस्मितेच्या वावटळीत फसलेल्या देशाच्या आजवरच्या प्रवासाचा वेध.
All BooksPakisthan Ka Matlab Kya ? | पाकिस्तान का मतलब क्या?
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartआपल्या उपसंहारात शेजवलकर लिहितात मग मराठे पानिपतावर कशासाठी लढले म्हणायचे ? अशासाठी की, दिल्लीची पातशाही राखण्याचे जे कार्य त्यांनी करार करून अंगावर घेतले होते, ते पार पाडण्यासाठी आणि अब्दालीसुध्दा एका उच्च व त्याच्या दृष्टीने न्याय्य कर्तव्यासाठीच लढला. हे कर्तव्य हिंदुस्थानातील इस्लामचे रक्षण हेच होय. आणि पुढे लिहितात, मराठ्यांनी अनेक चुका केल्या असतील, पण त्यांनी पाचशे वर्षांच्या इस्लामी वरवंट्याखाली चुरडलेल्या हिंदु प्रजेस आपल्या वर्तनाने ताठ उभे राहण्यास उदाहरण घालून दिले होते. मराठ्यांनी मुसलमानी राज्ययंत्र इतके खिळखिळे केले होते की, कोणत्याही प्रदेशात तेथील प्रजेने बंड करून उठून मुसलमान सुभेदारास हाकून द्यावे व स्वत:चे राज्य स्थापावे. या कामात त्यांस मराठ्यांची मदत आपोआप मिळाली असती आणि हीच शिवछत्रपतीनिर्मित मराठी राज्याची इतिकर्तव्यता होती ! इतर प्रांतांतील लोकांत हे लोण पोहोचू शकले नाही, हीच मराठ्यांच्या इतिहासातील खरीखुरी शोकांतिका होय, पानिपताचा पराभव नव्हे !
इतिहासPanipat 1761 | पानिपत १७६१
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartतो खरा कोण होता ? रिकार्डो क्लेमन्ट की अडॉल्फ आईषमान ? अेक निष्पाप, साधा-सरळ अर्जेंटाइन नागरिक ? की साठ लाख ज्यूंच्या सामूहिक संहाराला हॉलोकास्ट ला जबाबदार असणारा नाझी नरपशू ? दुस-या महायुद्धानंतर तब्बल अठरा वर्षे अज्ञातवासात असलेल्या एका बड्या युद्धगुन्हेगाराचा माग काढून त्याला न्यायदेवतेपुढे खेचणा-या इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेची चित्तथरारक, रोमांचकारी सत्यकथा.
इतिहासParadh | पारध
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
Sale! Add to cart१९४७ हिंदुस्थानची फाळणी झाली, पाकिस्तानची स्थापना झाली. १९७१ पाकिस्तानची फाळणी झाली. बांगलादेशाचा उदय झाला. अवघ्या पंचवीस वर्षांमध्ये घडलेल्या या दोन्ही उलथापालथी प्रचंड रक्तपातामुळे वादग्रस्त ठरल्या. इतिहासाला निर्णायक कलाटणी देणा-या त्या दोन्ही लक्षवेधी घटनांची मर्मभेदी कारणमीमांसा करणारे विचारवर्तक पुस्तक.
इतिहासPhalanee Te Phalanee | फाळणी ते फाळणी
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartपुण्याचे पेशवे हा अठराव्या शतकातील भारताच्या इतिहासाचा धावता आढावा आहे. अठरावे शतक हे मराठ्यांचे शतक होते आणि उपखंडातील राजकारणाची सूत्रे दीर्घकाल पर्यंत पुण्याहून हलवली जात होती. शाहू कालखंडात सातारा ही मराठ्यांची राजधानी होती, पण पेशव्यांनी राजकीय हालचालींच्या दृष्टीने पुणे हे आपले निवासस्थान पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत बनवले आणि शनिवारवाडा देशाच्या राजकारणाचा मध्यबिंदू बनला. या शनिवारवाड्याचे निवासी पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ वगळला, तर इतर सहा पेशव्यांची जीवनचरित्रे इथेच घडली, म्हणून महाराष्ट्र राज्याचे पेशवे पुण्याचे पेशवे म्हणून इतिहासात ओळखले जाऊ लागले. त्या पुण्याच्या पेशव्यांच्या आयुष्यातील चढउतार ऐतिहासिक साधनांच्या मर्यादेत राहून, सोप्या भाषेत, थोडक्यात निवेदन करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून केला आहे. 'पुणे तेथे काय उणे असे म्हटले जाते. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊन पुण्याने महाराष्ट्राला गती कशी दिली, हे समजावून घेण्याचा प्रयत्न शेवटी केला आहे.
इतिहासPunyache Peshve | पुण्याचे पेशवे
₹230.00Original price was: ₹230.00.₹173.00Current price is: ₹173.00. Save ₹57 Add to cart -
Sale! Add to cart'राजीव गांधी आणि सोनिया गांधी. अचानक उद्भवलेल्या दु:खद परिस्थितीच्या दबावामुळे वेगवेगळया वेळी भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी ढकलल्या गेलेल्या या पतिपत्नींची कथा आहे ही. एका उच्च, कर्तबगार सनदी अधिकाऱ्याने सांगितलेली... राजीव आणि सोनिया या दोघांच्याही आतल्या वर्तुळात वावरायची संधी मिळालेल्या राम प्रधान यांनी सांगितलेल्या या आठवणी... राष्ट्रीय राजकारणातल्या अनेक प्रसंगांमागच्या गुंतागुंतीच्या ऐतिहासिक घडामोडींची तपशीलवार नोंद घेणारे हे आत्मकथन राजीव-सोनियांबद्दलही बरेच काही सांगून जाते.
इतिहासRajiv Aani Soniya Yanchya Sahvasat | राजीव आणि सोनिया यांच्या सहवासात…
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart
">
Skip to content