कादंबरी
-
Sale! Add to cart'१८८४ साली प्रकाशित झालेली ही आहे मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी. समकालीन वास्तवाचे वर्णन करणारी काल्पनिक कथा. तत्कालीन समाजातील सर्वसाधारण स्तरावर वावरणारी पात्रे. साधी, सोपी, निरलंकार तरीही सुंदर भाषा. ठाशीव व्यक्तिवर्णने अन् रेखीव व्यक्तिचित्रणे. सहज घडणारी तरी खटकेबाज संभाषणे. लौकिक आणि व्यावहारिक पातळीवरचेच, पण नाटयपूर्ण प्रसंग. अशा विविध वैशिष्टयांनी नटलेली ही कादंबरी म्हणजे जणू आजच्या कितीतरी लोकप्रिय कलाकृतींच्या मूळ छटा दाखवणारी साहित्यकृती. रसिक वाचकाला रिझवणारी, व्यासंगी अभ्यासकाची जिज्ञासा पुरी करणारी, एकोणिसाव्या शतकातील गाजलेली कादंबरी.
कादंबरीNarayanrav Aani Godavari | नारायणराव आणि गोदावरी
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartअनेकदा गुंतागुंतीची परिस्थिती समोर ठाकते माणसाच्या आयुष्यात. ही गुंतागुंत मांडणं हे लेखक म्हणून मी माझं प्रथम कर्तव्य मानलं आहे. या परिस्थितीत माणसं कशी वागतात हे मी पाहते आहे. यातलं चूक बरोबर ठरवणं हे मीच नव्हे, तर कुणीच ते पाहताना तरी करू नये, असं मला वाटतं. कारण आधीच एखादी भूमिका घेतली, तर ही अभूतपूर्व परिस्थिती, आहे त्या नितळ स्वरूपात आपल्याला दिसणार नाही. अगदी नेमक्या याच परिस्थितीत आपण जर त्या माणसाचं जन्मापासूनचं संचित घेऊन उभे ठाकलो, तर आपण काय करू ? हा प्रश्न खूप कळीचा आहे. कदाचित आपण तेच करू जे त्यानं केलं. ज्या माणसांना आपण असं असं कधीच वागणार नाही, अशी खात्री वाटते त्यांचा मला हेवा वाटतो. आयुष्यातल्या अतर्क्य शक्यतांबद्दलची त्यांची कल्पना तोकडी पडतेय असं तर नसेल ?
कादंबरीNaticharami | नातिचरामि
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartपृथ्वीवरच्या वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण असतं वीस टक्के. हे प्रमाण कायम राखण्यात वनस्पतींचा वाटा महत्त्वाचा. हे प्रमाण घसरू लागलं ! दहा टक्क्यांहूनही खाली घसरलं ! आणि जगात एकच हाहाकार माजला. या समस्येवरचा तोडगा काय ? तो शोधताना जगातील राष्ट्र दोन गटांत विभागली गेली. पंचेचाळीस प्रगत राष्ट्रांचा तोडगा होता झाडांविना जीवन. तर वृक्षसंपदेचं रक्षण करणारा राष्ट्रसमूह म्हणत होता, 'झाडांच्या सहवासात जीवन.' या झगड्यात भारताचं धोरण काय होतं ? जागतिक पातळीवर नव्याने स्थापन झालेल्या 'श्वास मंत्रालया'तर्फे पॉडच्या माध्यमातून बंदिस्त परिसंस्थेची निर्मिती करण्याची योजन नेमकी काय होती ही योजना ? 'ग्रीन ड्रीम' संघटनेचा या योजनेला विरोध का होता ? एव्हरेस्टची वाढणारी उंची अन् ऑक्सिजनच्या पातळीतील घट यांचा एकमेकांशी,पर्यावरणबदलाशी काय संबंध ? आजची काल्पनिका उद्याचे वास्तव ठरल्याची अनेक उदाहरणे विज्ञानाच्या क्षेत्रात सापडतात. या कादंबरीतून मांडलेली कल्पनाही भविष्यातील भयकारी वास्तव ठरेल का ? पर्यावरणाच्या व्यामिश्र समस्येशी थेट भिडणारी भविष्यवेधी ही कादंबरी!
All BooksOxygen | ऑक्सिजन
₹360.00Original price was: ₹360.00.₹270.00Current price is: ₹270.00. Save ₹90 Add to cart -
Sale! Add to cartउद्ध्वस्त खेडी, वैराण राने पाण्याचा गैरवापर, दुष्काळाचे शापित गाणे टपो-या कणसांसारखी मातीतली माणसे आधुनिकीकरण, सहकार अन् 'लोकशाय'चा फेरा गावच्या काळया - पांढरीचे एका तपाचे तीन-तेरा हाच पांगिराचा लोकविलक्षण पसारा !
कादंबरीPangira | पांगिरा
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cart'असंगत नाटकांमधून वसलेलं विसंगत गाव. पण ते वसवताना वापरलेलं असतं वास्तव जीवनातलं सुसंगत साहित्य. आपला सामाजिक भवताल, आपलं राजकीय वर्तमान ठसे अन् खुणा उमटवत असतात या गावामधून. महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे अशा अनवट नाटकांनी मराठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीला वेगळं वळण देणारे प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांनी आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीचा आणि आपल्या नाट्यकृतींचा उलगडलेला अनोखा प्रवास गगनिका
कादंबरीPanipat | पानिपत
₹550.00Original price was: ₹550.00.₹413.00Current price is: ₹413.00. Save ₹137 Add to cart -
Sale! Add to cartटिळक, आगरकर, गांधी-नेहरू जन्मालाच यावे लागतात, कॉम्रेड कनू ! परिस्थितीची एक गरज म्हणून काळच असे महापुरुष वेळोवेळी जन्माला घालत असतो. आणि त्यांचीच जीवनचरित्रं अखेर इतिहासाच्या पुस्तकांची पानं व्यापून टाकत असतात. खालच्या फळीतली मोजकी मध्यमवर्गीय माणसंही आपापल्या परीनं समाजासाठी काही करण्यच्या प्रयत्नात असतात. ती इतिहासाच्या पुस्तकात नसलं, तरी परिशिष्टात निश्चितच स्थान मिळवतात. बाकी कोट्यवधी जनसामान्यांची तर इतिहास दखलही घेत नसतो ! इतिहासाच्या परिशिष्टात समावेश होऊ शकणा-या व त्याबाहेरही असणा-या अनेकांची विश्लेषणात्मक जीवनकहाणी...
कादंबरीParishisht | परिशिष्ट
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
Sale! Add to cartदक्षिणगंगा गोदावरी. तिच्यावर बांधलेलं गंगापूर धरण. या धरणाची भिंत फोडण्याचा दहशतवादी कट शिजला. नाशिक शहर पूर्णपणे उद्ध्वस्त करू पाहणारं हे भयानक कारस्थान. कोण होते हे दहशतवादी? कसं विणलं त्यांनी हे कुटिल जाळं? त्यांचा छडा लागला का? की आजही त्यांची छुपी कारवाई चालूच आहे? नाशिकवरची ही टांगती तलवार हटली की नाही? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देणारं - वेगवान नाट्यमय घटनाप्रवाहात वाचकाला खेचून नेणारं - अनपुटडाउनेबल थ्रिलर!
All BooksPhulpakharu | फुलपाखरू
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cart'एकाएकी नवनाथच्या डोळ्यांतून पाणी आलेलं. किती साधं असतं या लोकांचं जगणं. किती साधी आणि सोपी मागणी. मरणाची भीती नाही. जन्माला आलेले सारेच जाणार आहेत. कितीतरी मोठे आले आणि गेले. आम्ही तर साधी माणसं. पोटापुरतं मागणारी. धरणीमातेला मृत्यू थांबव, हे त्यांचं मागणं नाही; तर फक्त जीवन अमर ठेव. किती साधी प्रांजळ मागणी. नवनाथ थरारून गेला. काय बोलावं, हे त्याला कळेना. या सरकारी नोकरीमुळं जगण्याचे कितीतरी स्तर आपण जवळून पाहतोय. यापूर्वी आपण करत असलेल्या मास्तरकीत हे सारं पाहता आलं असतं ? खरी निखळ माणसं आपल्या भोवतालच्या भेडसावणाNया गर्दीपासून, गळेकापू स्पर्धांपासून कितीतरी दूर असतात. लांबलांब पसरलेल्या डोंगररांगांच्या एखाद्या खोल घळीत वाढणाNया एखाद्या अज्ञात झाडासारखी. जगाच्या कल्याणाची आणि जीवनाच्या अमरत्वाची मागणी करणारे असे कितीतरी तुकोबा, ज्ञानोबा खेड्यापाड्यांतून, आदिवासी वस्त्या, लमाण तांड्यांतून भेटतील. त्यांच्या या निरागस प्रार्थनेमुळंच तर हे जग जिवंत नाही ना?
कादंबरीPidhijat | पिढीजात
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Add to cart -
Sale! Add to cartसतराव्या शतकात युरोपमध्ये घडलेली एक विचित्र सत्यकथा आहे ही... वैज्ञानिक संशोधनातून नव्या संकल्पना पुढे येत होत्या. त्या जुन्या धार्मिक समजुतींना आव्हान देत होत्या. या दोन्ही शक्तींमधील संघर्षाला धार चढत होती, ती राजदरबारातील लहरी माणसांच्या कटकारस्थानांमुळे. अशाच एका कारस्थानाच्या पार्श्वभूमीवरची ही कथा... केपलर नावाच्या एका महान संशोधकाच्या म्हाता-या आईला चेटकीण ठरवून जिवंत जाळायचा कट आखला गेला. त्या खटल्यातून आपल्या निष्पाप आईला कसं वाचवायचं, या विवंचनेनं ग्रासलेल्या केपलरना कोणत्या मानसिक ताणतणावातून जावं लागलं, याचं भावस्पर्शी चित्रण करणा-या मूळ जर्मन कादंबरीचा हा सरस मराठी अनुवाद...
कादंबरीPutra Chetkinicha | पुत्र चेटकिणीचा
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartसुधीर नांदगावकर यांचे हे पुस्तक म्हणजे गुरुदत्तवरील त्यांच्या प्रेमाचा एक उत्कट आविष्कार ! गुरुदत्तच्या मृत्यूनंतर लगेचच त्याच्या घरी पोहोचलेल्या मोजक्या पत्रकारांत नांदगावकरही होते. त्यावेळी झालेल्या चर्चा, पत्रकार म्हणून कळलेल्या काही आतल्या गोष्टी आणि गुरुदत्तविषयीचा अपार आदर यांमुळे गुरुदत्तने आत्महत्या केली यावर नांदगावकरांचा विश्वास कधीच बसला नव्हता... सुधीर नांदगावकर यांनी या पुस्तकाच्या लेखनासाठी विशेष प्रयत्नांनी माहिती गोळा केली आहे. चरित्र-कादंबरी-जीवनप्रवास असा एक संमिश्र घाट स्वीकारला आहे. गुरुदत्तच्या आयुष्यातल्या एरवी फार लिहिल्या-बोलल्या न गेलेल्या घटनांचे तपशील, त्याच्या जगण्याचे, चित्रपटनिर्मितीचे, विचारप्रकियेचे काही नवे पैलू आपल्याला कळतात. आपल्या ओळखीचे चित्रपट, गाणी यांचा जन्म कसा झाला, या माहितीत आपण गुंतत जातो आणि अनेकदा तर त्या घटनांचे आपण जणू प्रत्यक्ष साक्षीदार आहोत, असे आपल्याला वाटत राहते... श्रीकांत बोजेवार
All BooksPyaass | प्यासा
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart
">
Skip to content