- You cannot add "...Aani Mi | ... आणि मी" to the cart because the product is out of stock.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Sale! Add to cart'हमरस्ता नाकारायचाच, असं काही ठरवलं नव्हतं. पण स्वत: स्वतःची साक्ष काढत पुढे जाताना पिढ्यानपिढ्या तुडवून तुडवून गुळगुळीत झालेली वाट मागे पडली खरी. घेतलेली वाट बिकट होती, अनपेक्षित वळणांची होती, तशीच मधूनच सुखावणाऱ्या हिरवाईचीही होती. खूपसं चालून गेल्यावर मागे वळून पहावंसं वाटलं. भूतकाळच्या मुसक्या बांधून विस्मरणाच्या दरीत फेकून देण्यापेक्षा त्याच्याशी दोस्ती करावीशी वाटली. आपली मुळं शोधावीशी वाटली. नदीचं मूळ कधी शोधू नये म्हणतात - पण करू नये ते केलं. हा शोध घेता घेता मला माझ्यात दडलेली माझी आई गवसली, आजी सापडली. भूतकाळाशी दोस्ती करताना त्यातल्या माणसांबरोबर पुन्हा जगले... मला स्त्रीत्वाचं भान देणाऱ्या पुरुषांकडे प्रौढपणाच्या चष्म्यातून नीट न्याहाळलं. त्यावेळी भावनांच्या धुक्यात बुडालेले तिढे आज लक्षात आले. नात्यांचे निखळलेले सांधे जुळवताना वाटलं की, निखळ मी अशी नाहीच. अनेक माणसांनी- त्यांच्या राग, लोभ, प्रेम, असूया, मैत्र अशा अनेक भावनांनी भारलेल्या नात्यांनी मला घडवलं आहे. गोष्ट माझीच नाही, तर त्या सर्वांची आहे. या गोष्टींशी जैवपणे जुळलेल्या काळाची ही गोष्ट आहे.'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेHamarasta Nakartana | हमरस्ता नाकारताना
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Harman Maynor | हर्मन मायनर
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreएखादा किंवा दोन्ही हात किंवा पाय आयुष्याच्या गणितातून वजा केले तरी शिल्लक राहणारे आयुष्यसुद्धा किती उत्साही, किती चैतन्यपूर्ण, किती अर्थपूर्ण असू शकते! एखाद्या कल्पित कथेहूनही अदभुत वाटेल अशी ही सत्यकथा... एका अफलातून माणसाची आणि त्याच्या तशाच जिगरबाज सहका-यांची !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेHat Na Pasru Kadhi | हात ना पसरू कधी
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Read more -
Sale! Add to cart'चार दशकांपूर्वी भारतातल्या धूळवाटांतून येऊन अमेरिकेतल्या गगनमहालाला गवसणी घालणा-या मराठी माणसाचे हे प्रांजळ आत्मकथन. वास्तुरचनेतून मानवी आयुष्य सुंदर, उन्नत करण्याचा निदिध्यास, कौटुंबिक एकात्मतेवर प्रगाढ विश्र्वास, स्वत:शीच चाललेला निरंतर संघर्ष, अविरत विश्र्वभ्रमण, उत्कट कलासक्ति, उदंड कर्तृत्व, दातृत्व यांची प्रतिबिंबं यात दिसतील. नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यमान वास्तुरचनाकारांच्या मालिकेत अग्रभागी विराजमान झालेले अनिवासी भारतीय सुधीर जांभेकर. मराठी माणसाला अभिमान वाटावी, तरूणाईला प्रेरक ठरावी अशी एका मनस्वी वास्तुरचनाकाराची ही आगळीवेगळी कहाणी. वैयक्तिकतेकडून वैश्र्विकतेचा रोमहर्षक प्रवास....
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेHe Vishwache Angan Vasturachanakarachi Kahani | हे विश्र्वाचे अंगण वास्तुरचनाकाराची कहाणी
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart`हिरवी पोर्ट्रेट्स' हा ललित लेखसंग्रह म्हणजे कोकणच्या अंत:स्पंदनांची रम्य स्मरणयात्रा. बेर्डेंमधला लेखक - दिग्दर्शक - चित्रकार - नेपथ्यकार - पार्श्वसंगीतकार - जाहिरात कलाकार - वाद्यवृंदकार कसा घडत गेला, नावारूपाला आला, याचीही प्रेरणादायक कहाणी या ललित गद्यामधून आपल्याला कळते. कोकणची भूमी अनेक कलावंतांची जन्मदात्री आहे. संगीत, नृत्य, अभिनय, दिग्दर्शन, चित्र, शिल्प अशा अनेकविध क्षेत्रांत कोकणपुत्रांनी व कोकणकन्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. स्वतंत्र प्रज्ञा, जिद्द, उद्यमशीलता, साहसीपणा, एखादं काम अत्यंत चिकाटीने पूर्णत्वास नेण्याची आकांक्षा, श्रद्धाशीलता या गुणांमुळे आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा राष्ट्रीय स्तरावर उमटविणारे अनेक गुणीजन कोकणभूमीत निर्माण झाले. आपले भूमिसंस्कार घेऊन स्वत: वाढत राहिले. राष्ट्र, समाज, संस्कृती, धर्म, विविध कला, क्रीडा, शिक्षण, संशोधन, राजकारण, व्यापार-उद्योग अशा विविध क्षेत्रांत या कर्तृत्ववान माणसांनी जे योगदान दिले; त्याचे `हिरवी पोर्ट्रेट्स'मधून अंशत: दर्शन घडते. हे लेखन केवळ `कोकण प्रशंसापुराण' नाही. त्यातील आत्मचिकित्सा, समाजचिकित्सा, अंतर्मुखता, वास्तव निरीक्षणे आणि समकाळाशी जोडून घेण्याची सकारात्मकता लक्षणीय आहे. `हिरवी पोर्ट्रेट्स'मधल्या व्यक्तिचित्रांना पुरुषोत्तम बेर्डे यांच्या सर्वस्पर्शी कलाभानामुळे दृश्यमानता लाभली आहे. `पोर्ट्रेट'मध्ये Location, Lighting, Composition, Emotion, Technical Settings हे पाच घटक महत्त्वाचे असतात. बेर्डे यांनी यात ध्वनी (Sound) हा आणखी एक घटक मिसळवून या सगळ्याचे एकजीव रसायन केले आहे आणि त्यामुळे ही व्यक्तिचित्रे जिवंत वाटतात. ही सगळी जमिनीशी जोडलेली माणसे आहेत. कोकणभूमीशी घट्ट नातेसंबंध असलेली आहेत. त्यांचे यथार्थ चित्रांकन करताना बेर्डे यांनी जे सामाजिक आणि सांस्कृतिक भान ठेवले आहे, त्यामुळे या ललित लेख / व्यक्तिचित्र संग्रहाची मूल्यात्मकता वाढलेली आहे. डॉ. महेश केळुसकर
All BooksHiravee Portrets | हिरवी पोर्ट्रेटस
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cartसनावली व घटनांच्या जंत्रीतून मांडलेला हा इतिहास नाही. भारताच्या इतिहासावर आपली ठसठशीत मुद्रा उमटवणा-या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अखेरच्या कालखंडाचा साक्षीदार असलेल्या लेखकानं झगमगत्या पर्वाचं घडवलेलं हे दर्शन आहे. पंतप्रधानांचे प्रमुख सचिव म्हणून काम करताना डॉ. पी.सी.अलेक्झांडर यांना इंदिराजींचे कितीतरी करारी व कोमल पैलू पाहायला मिळाले. नातवंडांत रमणा-या, गंमतशीर किस्से सांगणा-या, परदेश दौ-यात तळपणा-या, पंजाब प्रश्नानं सचिंत झालेल्या, राष्ट्रपतींच्या संबंधातील ताणतणाव सांभाळणा-या, मंत्रीमंडळ फेररचना अत्यंत गुप्तता बाळगणा-या व सहका-यांना सहसा न दुखावणा-या पंतप्रधान अशी त्यांची नाना रूपं इथं भेटतात. एकदा तर पंतप्रधापदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती असं अज्ञात असलेलं सत्य इथं सामोरं येतं. गंभीर-हस-या,पोलादी-प्रेमळ, मुत्सद्दी-मिश्किल अशा इंदिराजींच्या कितीतरी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. १९८० ते १९८४ या काळातील पडद्यामागील घडामोडींचा हा अस्सल, वस्तुनिष्ठ आलेख. जितका ऐतिहासिक तितकाच चकित करणारा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेIndira : Antim Parva | इंदिरा : अंतिम पर्व
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartबालपणापासुन ती होती अबोल, एकाकी. आईची आर्त व्याकुळता नि पित्याची तेजस्वी भव्यता यांचा नाद तिच्या मनात घुमत राहिला. स्वत:च्या घरी देशाचा घडत असलेला इतिहास ती लहानपणापासून पहात होती आणि पहाता पहाता तिनंही इतिहास घडविला. बांगला देश स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेळी लखलखत्या दुर्गेचा अवतार धारण करून इतिहासाचं सोनेरी पर्व घडविणा-या इंदिरेनंच आणीबाणीचा काळाकुट्ट अध्यायही लिहिला. स्वयंभू,कठोर, खंबीर, प्रसंगी वादळ उठवणारी नि झेलणारी इंदिरा पुढे मात्र हळवी, परावलंबी, अंधश्रध्दाळू बनली. तिच्या मनातील आंदोलनाचा, स्वप्नांच्या उदयास्ताचा, तिच्या कोंडलेल्या श्र्वासाचा, खाजगी जीवनातील अज्ञात घटनांचा भारावून टाकणारा प्रवास.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेIndira Gandhi | इंदिरा गांधी
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Add to cart -
Sale! Add to cart'जगाच्या पाठीवर' हे कै. सुधीर फडके तथा बाबूजी यांनी लिहिलेलं आत्मचरित्र संपूर्ण नाही, अर्धंदेखील नाही. त्यांच्या आयुष्याच्या अगदी प्रारंभी लहरी नियतीनं त्यांना जी वणवण भटकंती करायला भाग पाडलं, त्या भंडावून सोडणा-या प्रवासाचा फक्त एका भल्यामोठया टप्प्यापर्यंतचा हा वृत्तांत आहे. हे असं अपुरं आत्मचरित्र हुरहुर लावणारं तर आहेच, पण दैन्याचे दशावतार अनुभवत असतानाच त्यांनी संगीतसाधना कशी केली, याचं विलक्षण दर्शन घडवणारंही आहे. या ओघवत्या आत्मकथनात बाबूजींच्या सश्रद्घ, सुसंस्कारित मनाचं स्वच्छ प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसतं आणि ठार वेडं होण्याच्या स्थितीत किंवा आत्महत्या करण्याच्या विचारात असतानादेखील त्यांनी जिवापाड जपलेला स्वाभिमानी स्वरही आपल्याला ऐकू येतो... बाबूजींचं यश आणि त्यांची लोकप्रियता अनेकांना ठाऊक आहे, पण त्या यशामागे दडलेलं अपयश आणि लोकप्रियतेमागची खडतर कलासाधना समजून घेण्यासाठी हे आत्मचरित्र वाचायलाच हवं.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJagachya Pathivar | जगाच्या पाठीवर
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartएकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतात आधुनिक विज्ञानाची पहाट उगवली. त्यापूर्वीच्या शतकानुशतकांच्या तमोयुगाला छेद देणारा पहिला विज्ञान-रश्मी बसू हा होता ! भरतभूच्या कुशीत निपजलेला तो पहिला आणि जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ. बसूंनी पदार्थविज्ञान आणि वनस्पतिशास्त्र या क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक म्हणून केलेलं कार्य हे जितकं उत्कंठावर्धक आहे, तितकंच त्यांचं ॠषितुल्य असं संपूर्ण जीवनही. त्या जीवन आणि कार्याचा हा आलेख.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJagdishchandra Basu | जगदीशचंद्र बसू
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartसमुद्र पिऊन टाकणा-या अगस्ती ऋषींच्या जिद्दीनं सहा सागरांना जिंकणारी एवढीशी पोर ! रौंद्र लाटांत, जीवघेण्या थंडीत मासोळी होऊन समुद्र पार करणारी ही सागरकन्या ! तिची आणि तिच्या आईवडलांच्या खडतर तपश्चर्येची ही अजब कहाणी.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJal Aakramile | जल आक्रमिले
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart
">
Skip to content