तत्वज्ञान / व / धर्म
-
Sale! Add to cartजगात या ग्रंथाच्या रोज हजारो प्रती विकल्या जातात... 'ऑल टाइम बेस्टसेलर' म्हणून ओळखला जाणारा हा ग्रंथ! जगात या ग्रंथाचा हजाराहून अधिक भाषांमध्ये अनुवाद केला गेला आहे; आपल्या भारतातच तब्बल दोनशे बोलीभाषांमध्ये या ग्रंथाचा अनुवाद उपलब्ध आहे... महात्मा गांधी, लिओ टॉलस्टॉय, पंडिता रमाबाई, साधू सुंदरसिंग, मदर तेरेसा, विनोबा भावे, अल्बर्ट श्वाइट्झर... या आणि यांच्यासारख्या असंख्य लोकांनी या ग्रंथातून प्रेरणा घेतली, असे इतिहास सांगतो. हे सारे खरे असले, तरीदेखील सर्वसामान्य मराठी वाचकांना बायबलची पुरेशी माहिती असत नाही. ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ किंवा येशूचे चरित्र एवढीच जुजबी ओळख असते. अनेकांना नवा करार (न्यू टेस्टमेंट) ऐकून माहीत असतो, काहीजणांना चार गॉस्पेल्स म्हणजेच संपूर्ण बायबल वाटत असते. जुना करार (ओल्ड टेस्टमेंट) आणि नवा करार (न्यू टेस्टॅमेंट) मिळून होणारा बायबल म्हणजे एकच एक ग्रंथ नसून अनेक पुस्तकांचा संग्रह आहे, हे बहुतेकांना ठाऊक नसते. जिज्ञासेपोटी वाचू इच्छिणा-यांना अपरिचित धार्मिक परिभाषेचा आणि परकीय सांस्कृतिक वर्णनांचा अडसर हमखास कंटाळा आणणारा ठरतो. क्वचितप्रसंगी समज-गैरसमजांना वाव मिळतो. वास्तवाची ही दोन टोके लक्षात घेऊन सांस्कृतिक सेतू उभारण्याचा अभिनव प्रयत्न म्हणजे बायबलची ही नवी आवृत्ती... जुना आणि नवा दोन्ही करार पूर्णार्थाने सामावून घेणारी... आधुनिक ललितरम्य शैलीत भावानुवादाच्या रूपात अवतरणारी... तपशीलवार, विस्तृत टिपांमुळे ख-या अर्थाने सुबोध ठरणारी... नामांकित चित्रकारांच्या असंख्य चित्रांमुळे संग्राह्य झालेली... मराठीतील धार्मिक साहित्याच्या दालनात लक्षणीय भर घालणारी...! बायबलची नवी आवृत्ती!
तत्वज्ञान / व / धर्मSubodh Bible – Juna Karar, Nava Karar | सुबोध बायबल – जुना करार, नवा करार Set
₹1,500.00Original price was: ₹1,500.00.₹1,125.00Current price is: ₹1,125.00. Save ₹375 Add to cart -
Sale! Add to cartज्या संस्कृतीत लहानपणापासून 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे' असे घोटून गिरवले जाते, तेथे दु:खाचे उदात्तीकरण होणे व सुखाला तुच्छ लेखले जाणे स्वाभाविकच आहे. सुखाची आकांक्षा ठेवण्यात काहीतरी आत्मिक व नैतिक अवनती आहे, असे सतत मनावर बिंबवले जात असल्यामुळे दु:खी माणूस उगाचच सुखी माणसाला कमी लेखतो. The Conquest of Happiness या पुस्तकातून थोर तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल पटवून देतात की, दु:खी राहण्यात निसर्गत: काहीही श्रेष्ठत्व दडलेले नाही. प्राप्त परिस्थितीत जो जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, तो खरा सुज्ञ. हे पुस्तक एक आश्वासन देते की, सात्त्विक सुख अप्राप्य नाही. दंतकथेत सांगतात, तेवढा सुखी माणसाचा सदरा दुर्मिळ नाही. हाती आलेल्या धाग्यांमधून प्रत्येक माणूस असा सदरा विणू शकतो. पण तो स्वत:चा स्वत:ला विणावा लागतो. विणकरात, हंसाचा नीर-क्षीर विवेक व गवळण पक्ष्याची जिद्द मात्र हवी.
तत्वज्ञान / व / धर्मSukhi Mansacha Sadara | सुखी माणसाचा सदरा
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartतुकोबांची गाथा म्हणजे मराठी सारस्वताचे वैभव. तुकोबांचे संतत्व, त्यांचा रोकडा उपदेश, काळाच्या कसोटीवर उतरलेले त्यांचे अभंग, रात्रंदिन युद्धाचा प्रसंग असे त्यांचे जीवन या सा-यांचे तीन शतकांहून अधिक काळ मराठी मनावर गारूड आहे. तुकोबांच्या उक्ती म्हणजे जणू मराठी भाषेची अंगभूत कवचकुंडले. आपल्याला अद्वितीय वाटणा-या तुकोबांच्या साहित्याला आधुनिक साहित्यशास्त्राच्या कसोटया लावल्या तर ? डॉ. दिलीप धोंडगे यांनी हाच प्रयत्न केला. शैलीविज्ञान या महत्त्वपूर्ण आधुनिक ज्ञानशाखेच्या निकषांवर तुकोबांच्या अभंगांचा अनोखा शोध घेतला. डॉ.रा.गो.भांडारकर, पु.मं.लाड, वा.सी.बेंद्रे, दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे, म.सु.पाटील, किशोर सानप अशा मान्यवर अभ्यासकांच्या तुकोबांविषयीच्या विवेचनात मोलाची भर टाकणारा आगळावेगळा ग्रंथ तुकोबांच्या अभंगांची शैलीमीमांसा
तत्वज्ञान / व / धर्मTukobanchya Abhanganchi Shailimimansa | तुकोबांच्या अभंगांची शैलीमीमांसा
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart'हा विलक्षण प्रवास सुरू झाला एका मध्यमवर्गीय मराठी घरातून. रंग, रेषा, कविता, गाणं यांच्यासह अनुभवांच्या अन् जीवनाच्या विविध रंगांत न्हाऊन निघालेलं त्याचं लोभस रूप आता एका प्रशांत पडावावर विसावलं आहे. सुखदु:खांच्या घटना, हर्षामर्षाचे प्रसंग, कृतार्थतेचे अन् वैफल्याचे क्षण, एका पारड्यात तर्क तर दुसऱ्यात अध्यात्म अशा विविधरंगी वाटचालीत सोबत चालणाऱ्या कितीक व्यक्ती. जीवनाच्या स्वप्नवास्तवाला वेढणाऱ्या आभाळाएवढ्या चैतन्याचं एका संवेदनशील मनात उमटलेलं नितळ प्रतिबिंब म्हणजेच शिंपेतले आकाश
तत्वज्ञान / व / धर्मVardhman Te vartaman | वर्धमान ते वर्तमान
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartमानवी संस्कृतीतील तत्त्वज्ञानाच्या वाटचालीचा इतिहास म्हणजे विवेक आणि अविवेक यांच्यातील संघर्षाचा इतिहास. हा इतिहास आहे अनेक चढ-उतारांचा, खाचखळग्यांचा. ही वाटचाल आहे काटेरी रस्त्यांची, वादळवाऱ्याची, संघर्षाची, जय-पराजयाची, कधी दिशाहीन, तर कधी उलट दिशेची. अंधाराची पर्वा न करता ठामपणे पावले टाकत ही वाट चालणारे तत्त्वज्ञ म्हणजे मानवाच्या उन्नयनासाठी झटणारे, ही वाट उजळून टाकणारे दीपस्तंभच ! पाश्चात्त्य आणि पौर्वात्य तत्त्वज्ञांची आयुष्ये, त्यांची जडणघडण, विश्वाची, निसर्गाची, मानवी मनाची रहस्ये शोधण्याची त्यांनी केलेली अविश्रांत धडपड या साऱ्याचा वेधक धांडोळा.
All BooksVivekayatree: | विवेकयात्री
₹1,100.00Original price was: ₹1,100.00.₹825.00Current price is: ₹825.00. Save ₹275 Add to cart
">
Skip to content