प्रवास
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreयुरोपच्या टूर्स आखणा-या अनेक प्रवासी कंपन्या गेली काही वर्षे भारतभर आढळतात. परंतु त्या टूर्समध्ये स्वत:च्या खास आवडीनिवडींना मुरड घालावीच लागते. युरेलचे ठरावीक मुदतीचे पास काढून वेळापत्रक पाहून व इंटरनेटची मदत घेऊन कमी दरात, स्वत:च्या आवडीनुसार युरोपचा प्रवास करणे सहज शक्य आहे, हे अनेकांना माहीतच नसते. ती माहिती मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी युरोपचा प्रवास हे पुस्तक लिहिले आहे. युरेल पास, व्हिसा, पासपोर्ट, परकीय चलन, कस्टम्स, विमा यांच्या कायदेशीर बाबींबरोबरच नित्याच्या व्यवहारात लागणा-या बारीकसारीक खाचाखोचा, कुठे काय पाहावे, कुठे राहावे इत्यादी बारकावे यात दिले आहेत. याशिवाय लेखकांनी स्वत: प्रवास केलेला असल्यामुळे स्वानुभवांचे कवडसे जागोजागी दिसतातच. हे पुस्तक वाचून युरोपच्या प्रवासाच्या तयारीला लागावेच असे वाटेल.
प्रवासEurope Sahlicha Sobati | युरोप सहलीचा सोबती
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Read more -
Sale! Add to cartसाडेतीन हजार वर्षांपेक्षा अधिक काळाचा इतिहास लाभलेला देश म्हणजे ग्रीस. आधुनिक लोकशाहीचा प्रारंभबिंदू म्हणजे ग्रीस. शास्त्र, कला, तत्त्वज्ञान यांचे पुरातन माहेरघर म्हणजे ग्रीस. सॉक्रेटीस, प्लेटो, अ ॅरिस्टॉटल यांसारखे तत्त्वज्ञ अन् गणितज्ञ म्हणजे ग्रीस. एकीकडे ही सारी अभिमानास्पद परंपरा. तर दुसरीकडे आर्थिक दुरवस्था, बेरोजगारी, व्यसनासक्त तरुणाई यांनी झाकोळलेले वर्तमान. प्राचीन काळापासून अद्ययावत वर्तमानातील ग्रीसच्या विस्तृत पटाचा वेध
प्रवासGreece | ग्रीस
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreअज्ञात किल्ले, पुरातन गढ्या, प्राचीन मंदिरे, खासा खानदेश अन् आकर्षक कोकण यांची मिलिंद गुणाजी यांनी घडवलेली गूढ पण तितकीच रम्य सहल. '
प्रवासGudh Ramya Maharashtra | गूढ रम्य महाराष्ट्र
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Read more -
Sale! Add to cartइंका संस्कृती : गूढ, रहस्यमय, अनाकलनीय. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठे पाचशे वर्षांचे साम्राज्य. स्वत:ला सूर्यपुत्र समजणारी, निसर्गाला देव मानणारी, सोन्याचांदीच्या ढिगामध्ये लोळणारी, दो-याच्या गाठी मारून संदेश पाठवणारी, शेकडो टनांचे पाषाणखंड कापून अगम्य, अवाढव्य बांधकामे करणारी. पंधराव्या शतकात स्पॅनिश आक्रमकांनी इंका साम्राज्य धुळीस मिळवले, नंतरच्या चारशे वर्षांत इंका संस्कृती हळूहळू नष्ट झाली. पण एके दिवशी स्पॅनिशांच्या तावडीतून वाचलेले इंकांचे गुप्त शहर सापडले - माचूपिच्चू ! अवघे विश्व चकित झाले, पाषाणखंड हळूहळू बोलके झाले, इंका चा सप्तरंगी झेंडा गौरवाने आकाशात फडकायला लागला, सोने लुटून संपले होते, पण अजस्र पाषाणखंडांना सोन्याचे मोल आले, त्याचीच ही कहाणी -
प्रवासInka’chi Devdari | इंका ची देवदरी
₹320.00Original price was: ₹320.00.₹240.00Current price is: ₹240.00. Save ₹80 Add to cart -
Sale! Add to cartकाश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमा म्हणजे जगातील सर्वात अशांत आंतरराष्ट्रीय सीमारेषांपैकी एक. या सीमारेषेवरील प्रत्यक्ष परिस्थिती आणि जनजीवन जाणून घेण्यासाठी एक मध्यमवर्गीय स्त्री एकटीने प्रवास करण्याचा निर्णय घेते. इतकेच नाही तर या प्रवासात अत्यंत गरजेपुरतेच सामान आणि पैसे जवळ ठेवते. तिचा भरवसा आहे सामान्य काश्मिरी माणसाच्या चांगुलपणावर आणि मानवतेच्या मूल्यांवर. कसा घडला तिचा हा प्रवास? या प्रवासात तिला आलेल्या अनुभवांनी तिचा भरवसा भंगला की मजबूत झाला? पृथ्वीवरील स्वर्ग असे सार्थ वर्णन असलेल्या काश्मीरमधील निसर्गसौंदर्य, आलेल्या पाहुण्याची घरच्यासारखी मेहमाननवाजी करणारी काश्मिरी कुटुंबे, सीमारेषेच्या अलिकडे काय किंवा पलिकडे काय, सारख्याच जीवनाला सामोरे जाणारे जनसामान्य यांचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारी सीमेवरच्या एकल प्रवासाची सत्यकथा
All BooksKashmiriyat | काश्मिरियत
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cart' गालापगोस म्हणजे कासवांचे बेट. ही बेटे आहेत सुदूर प्रशांत महासागरामध्ये. तीस-चाळीस लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या स्फोटांतून बनलेली ही बेटे म्हणजे या वसुंधरेवरील सर्वांत तरुण एकाकी भूमी. अपघातानेच लाखभर वर्षांपूर्वी या बेटांवर काही मोजक्या सजीवांचा चंचुप्रवेश झाला. या अतिसंवेदनशील अधिवासामध्ये काही टिकले, काही संपले. मोजक्याच वनस्पती, मूठभर पशु-पक्षी. त्यांच्या जीवनसाखळ्या अगदीच प्राथमिक, संशोधकांसाठी जणू बाळबोध लिपीच. पहिल्यांदा ती वाचली सर चार्ल्स डार्विन यांनी, तोच उत्क्रांतिवादाचा जन्म. आजही माणूस तेथे पाहुणाच आहे, आणि पाहुण्याने पाहुण्यासारखेच राहायला हवे, नाही का? त्यासाठीच हा पुस्तक-प्रपंच.'
प्रवासKasvanche Bet | कासवांचे बेट
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartविलास शेळके.
एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व.
शिक्षणाने आणि पेशाने अभियंता.
संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक.
सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार,
अशा व्यक्तीचे बोट धरून
आपण या अक्षरप्रवासाला निघालो की,
ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो,
सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो.
त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी
आपणही समृद्ध बनतो.
विलास शेळके आपल्या अनोख्या नजरेतून
घडवत आहेत उगवत्या सूर्याच्या दिशेला
वसलेल्या सहा देशांचे दर्शन.All BooksMadhyamayan | मध्यमायन
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartमणिपूर... प्राचीन काळापासून सुवर्णभूमी म्हणून नावाजला गेलेला ईशान्य भारतातील रमणीय, निसर्गसुंदर प्रदेश. समृध्द संस्कृतीचा वारसदार असणारा हा प्रदेश स्वातंत्र्यानंतर काहीसा उपेक्षित, दुर्लक्षित राहिला. त्या प्रदेशातील असंख्य पर्यटनस्थळांची तपशीलवार माहिती देणारे, तिकडे जायला प्रवृत्त करणारे पुस्तक...
प्रवासManobhave Deshdarshan – Manipur | मनोभावे देशदर्शन – मणिपूर
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'मिझोरम. ईशान्य भारतातले एक महत्त्वाचे राज्य. एके काळी बंडखोरीने ग्रासलेले, पण आता शांततेच्या मार्गाने विकास साधू पाहणारे... त्या सीमावर्ती राज्यातील असंख्य पर्यटनस्थळांची त्यांच्या वैशिष्ट्यांसह तपशीलवार माहिती देणारे हे संकलन हौशी पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
प्रवासManobhave Deshdarshan – Mizoram | मनोभावे देशदर्शन – मिझोरम
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cart'नागालॅण्ड. ईशान्य भारतातील एक महत्वाचे राज्य. फुटीरतावादी हिंसक चळवळीमुळे सतत चर्चेत राहिलेले. आता मात्र शांततेची वाटचाल करू लागलेले... स्थानिक लोकांच्या वेगळया चेहरेपट्टीमुळे निर्माण होणारे गैरसमज दूर करून त्या राज्याची आणि तेथील पर्यटनस्थळांची सारी वैशिष्टये समजावून सांगणारे पुस्तक.
प्रवासManobhave Deshdarshan – Nagaland | मनोभावे देशदर्शन – नागालॅण्ड
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart
">
Skip to content