बेस्ट सेलर
-
Sale! Add to cartवेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्... अशा पवित्र वंदे मातरम् च्या जयघोषात पुण्यवंतांनी केला पराकोटीचा त्याग, तेव्हा कुठे दीडशे वर्षांनंतर उगवली स्वातंत्र्याची पहाट ! आता ७५ वर्षांनंतर, काय आहे चित्र आपल्या देशाचं नि समाजाचं? गर्वानं ऊर भरून यावा असं काही घडलं का? वेदनांचा पूर यावा इतकं काही बिघडलं का? हुतात्म्यांचा त्याग लागला का सार्थकी? केली का आपण पायाभरणी एका बलाढ्य राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यकाळाची? आपले सैनिक, शिक्षक, शेतकरी, आपले शास्त्रज्ञ, राज्यकर्तेही आपलेच आणि अधिकारीही आपणच... आणि आपण सारेच नागरिक? केली का आपण आपापल्या क्षेत्रात कर्तव्यपूर्ती? उद्दिष्टप्राप्ती? शेतकीपासून शिक्षणापर्यंत, अवकाश मोहिमेपासून अणुकरारापर्यंत, हरितक्रांती, दुग्धक्रांती, माहिती तंत्रज्ञानामधली क्रांती, दूरसंचारातली प्रगती, अन्नसुरक्षा, ऊर्जानिर्मिती, आर्थिक विकास, दारिद्र्याशी दोन हात, दहशतवादावरती मात... नानाविध क्षेत्रांत जगातल्या इतर कुठल्याही नवस्वतंत्र राष्ट्रापेक्षा खूप काही जास्त साध्य केलं आपल्या भारत देशानं... पुरावे हवेत? तर हा घ्या आपल्या अमृतमहोत्सवी कामगिरीचा आलेख. काय कमावलं, कसं मिळवलं यांचा धावता लेखाजोखा मांडणारं हे पुस्तक ७५ सोनेरी पाने स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षणचित्रे अविनाश धर्माधिकारी यांच्या सिद्धहस्त लेखणीनं प्रभावी भाषाशैलीत घेतलेला हा ओघवता, वस्तुनिष्ठ आढावा, आपल्या संग्रही हवाच...
All Books75 Soneri Paane | ७५ सोनेरी पाने
₹1,000.00Original price was: ₹1,000.00.₹750.00Current price is: ₹750.00. Save ₹250 Add to cart -
Sale! Add to cart'तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडयाच्या पोटी 1931मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे.'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAgnipankh | अग्निपंख
₹395.00Original price was: ₹395.00.₹296.00Current price is: ₹296.00. Save ₹99 Add to cart -
Sale! Add to cartभाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून 'हसवाफसवी'तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, 'चौकटराजा'मधल्या नंदू आणि 'श्रीयुत गंगाधर टिपरे'तल्या आबांपासून 'लगे रहो मुन्नाभाई'मधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे ! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म ! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ. बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! 'गुगली', 'नवी गुगली', 'हसगत', 'कागदी बाण' व 'झूम' नंतरचं प्रभावळकरांचं 'बोक्या सातबंडे' हे एक झकास पुस्तक! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.
बेस्ट सेलरBokya Satbande (Part 1 To 3) | बोक्या सातबंडे (भाग १ ते ३)
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cart'ब्र उच्चारणं सोपं नसतंच कधीही. ब्र म्हणजे अवाक्षर. गप्प बस... नाहीतर... या धमकीला न भिता धाडसानं उच्चारलेला शब्द म्हणजे ब्र! स्वत:बाहेर पडणं, हा अशा भीतीवरचा उत्तम उपाय. मग एक साधारण गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती अशा एकीचा सुरू झालेला प्रवास. बाईच्या नजरेनं निरागसपणानं पाहिलेलं जग. एक प्रकारे आदिवासी भागातल्या अनुभवांचा अहवाल. त्यासोबत स्वयंसेवी संस्थांमधलं राजकारण आणि स्त्री-पुरुष संबंधांमधलं राजकारणदेखील! हे लेखन महानगर, शहर, खेडेगाव आणि आदिवासी वाड्यापाडे अशा सगळयांना सामावून घेतं.'
कादंबरीBra (Lok Aavruti) | ब्र (लोकआवृत्ती)
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartअधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणा-या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कार्व्हरनं दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकानं वाचायलाच हवं असं पुस्तक.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेEk Hota Carver | एक होता कार्व्हर (डिलक्स आवृत्ती)
₹395.00Original price was: ₹395.00.₹296.00Current price is: ₹296.00. Save ₹99 Add to cart -
Sale! Add to cartचाकोरीतल्या अपयशानं मुळीच खचून न जाता चाकोरीबाहेरचा छंद मनापासून जोपासणा-या एका पोरसवद्या तरुणानं लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे निसर्गप्रेमाचा आगळा आविष्कार आहे. रसायनशास्त्राच्या महाविद्यालयीन परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे हाती आलेलं फावलं वर्ष मदुमलाईच्या जंगलात प्राणीनिरीक्षणात घालवण्याची संधी मिळाली आणि कृष्णमेघच्या मनात लहानपणापासूनच दडलेलं जंगलप्रेम उफाळून आलं. तो वर्षभर त्या जंगलात राहिला, पण एखाद्या उप-या निरीक्षकासारखा नाही तर ख-याखु-या जंगलपुत्रासारखा राहिला. त्या जंगलातले हत्ती, रानगवे, रानकुत्री, अस्वलं यांच्यासारख्या प्राण्यांचं मनमुक्त जीवन त्यानं एखाद्या सहनिवाशाच्या भूमिकेतून निरखलं - पारखलं. त्याच्या त्या शोधयात्रेत आलेल्या सुंदर, थरारक, रोमांचक अनुभवांचं हे नितळ पारदर्शी संकलन म्हणजे जंगलरसात न्हाऊन निघालेलं आणि वाचकांनाही रानवेडाची दीक्षा देणारं मदुमलाई सूक्त आहे. काही पुस्तकं निव्वळ वाचायची नसतात, तर अनुभवायची असतात. मदुमलाईच्या जंगलातला एक तरुणप्रसन्न जीवनानुभव त्यातल्या सा-या चढउतारांसह, रौद्रथरारांसह आणून देणारं हे उत्कट पुस्तक असंच अनुभवण्याजोगं पुस्तक आहे... कृष्णमेघ जेथे रमला त्या मदुमलाईच्या प्रेमात पाडणारं... आणि त्याच्या हातून जे निसटलं त्याबद्दल हुरहूर लावणारं... वाचकांच्या जंगलजाणिवा प्रगल्भ करणारं, सहजसुंदर शैलीतलं...
बेस्ट सेलरEka Ranvedyachi Shodhyatra (Lokavrutti) | एका रानवेडयाची शोधयात्रा (लोकावृत्ती)
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
कथासंग्रह
Hansa Akela | हंस अकेला
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartबालपणापासुन ती होती अबोल, एकाकी. आईची आर्त व्याकुळता नि पित्याची तेजस्वी भव्यता यांचा नाद तिच्या मनात घुमत राहिला. स्वत:च्या घरी देशाचा घडत असलेला इतिहास ती लहानपणापासून पहात होती आणि पहाता पहाता तिनंही इतिहास घडविला. बांगला देश स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेळी लखलखत्या दुर्गेचा अवतार धारण करून इतिहासाचं सोनेरी पर्व घडविणा-या इंदिरेनंच आणीबाणीचा काळाकुट्ट अध्यायही लिहिला. स्वयंभू,कठोर, खंबीर, प्रसंगी वादळ उठवणारी नि झेलणारी इंदिरा पुढे मात्र हळवी, परावलंबी, अंधश्रध्दाळू बनली. तिच्या मनातील आंदोलनाचा, स्वप्नांच्या उदयास्ताचा, तिच्या कोंडलेल्या श्र्वासाचा, खाजगी जीवनातील अज्ञात घटनांचा भारावून टाकणारा प्रवास.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेIndira Gandhi | इंदिरा गांधी
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Add to cart -
Sale! Add to cartराधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात, जन्माला आली. परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली. तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा, इतिहास, काही माहीत नव्हतं. इथही ती निरक्षरच होती; त्यामुळं लंडन हे गावाचं नाव आहे की देशाचं, असा संभ्रमही बरेच दिवस तिच्या मनाला असायचा ! पण कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती झाली. तिनं भरपूर पैसे मिळवले. भरपूर खर्चही केले. आपली माणसं, आपला धर्म, आपली जीवनपद्धती यांचं एक मूर्त चित्र स्वत:च्या आयुष्यात तिनं दाखवून दिलं... तिनं जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या शवावर वाहण्यासाठी लंडनच्या गो-या मेयरनं मेयर ऑफ बारनेटनं फुलं पाठवली आणि लंडनमधल्या तिच्या भारतीय मुलांनी तिची शवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून नेली !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेKahani Londonchya Aajibainchi | कहाणी लंडनच्या आजीबाईंची
₹270.00Original price was: ₹270.00.₹203.00Current price is: ₹203.00. Save ₹67 Add to cart -
Sale! Add to cart'चोर चोरी करू शकत नाही, शासक कर लावू शकत नाही, भाऊबंदांमध्ये वाटणी होत नाही आणि तिचे ओझेही वहावे लागत नाही. अशी संपत्ती म्हणजे बौद्धिक संपदा. तरीसुद्धा तिचेही रक्षण करावेच लागते. अगदी व्यक्तिगत पातळीपासून सामूहिक अन् राष्ट्रीय स्तरापर्यंत ही सृजन संपत्ती जपावी लागते, वाढवावी लागते. ही बौद्धिक संपदा तुम्हाला देत असते विशिष्ट हक्क. पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगौलिक निर्देशक, इंडस्ट्रियल डिझाइन - अशा अनेक प्रकारांनी हे हक्क तुम्हाला मिळतात. कसे मिळवायचे हे हक्क ? कसे राखायचे हे हक्क ? कुणी या हक्कांचा भंग केल्यास तो रोखायचा कसा ? राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय कायद्यांची यात काय भूमिका असते ? अशा अनेक मुद्द्यांबाबत मोलाचे मार्गदर्शन करणारे - संशोधक-उद्योजकांपासून लेखक-प्रकाशकांपर्यंत, गीतकार-संगीतकारांपासून नाट्य-चित्रपट दिग्दर्शकांपर्यंत, चित्रकार-छायाचित्रकारांपासून इंजिनीअर-तंत्रज्ञांपर्यंत, साऱ्या सर्जनशील व्यक्तींना त्यांच्या अनमोल निर्मितीचे भान करून देणारे - कथा अकलेच्या कायद्याची
कायदाविषयक - अर्थव्यवहारKatha Aklechya Kaydyachi | कथा अकलेच्या कायद्याची
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart
">
Skip to content
