मार्गदर्शनपर
-
Sale! Add to cart'गिरीश टिळक हा एक यशस्वी हेडहंटर आहे. म्हणजे काय? तर, आजच्या कॉर्पोरेट जगात दोन प्रकारची माणसं लागतात. पहिली, सुमारे 90 टक्के - शरीराच्या हातापायांसारखी. आज्ञेप्रमाणे कामे करणारी. दुसरी, सुमारे 10 टक्के - मेंदू, हृदयासारखी. विचारपूर्वक, प्रसंगी भावनापूर्वक काम करवून घेणारी. हे 10 टक्के उच्चपदस्थ किंवा डिसिजन मेकर्स इतके महत्त्वाचे असतात, की ते सोडून गेले, तर त्या कंपनीच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहतो. ती शोधून देणं म्हणजे हेडहंटिंग! हा व्यवसाय युरोपात मोठा झालाय, मात्र आपल्या इथे अजून रांगतोय. गिरीशसारख्या एका सामान्य, आजारी मुलानं ही किमया कशी साधली त्याच्या धडपडीची ही कहाणी. वाचा सुमेध वडावाला (रिसबूड) यांच्या मनोरंजक शब्दांत- हेडहंटर.'
मार्गदर्शनपरHeadhunter | हेडहंटर
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartश्री.सप्रे हे एक कामगार क्षेत्रामधील मान्यता पावलेले प्रशिक्षक आहेत. त्यांना या क्षेत्रातील भल्याबु-या प्रवाहांचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळालेली आहे; तसेच त्यांचे या विषयावरील वाचन,मनन आणि चिंतनही प्रगाढ आहे. सप्रे यांचे हे पुस्तक अगदी वेगळे, काम या विषयाकडे अगदी भिन्न पातळीवरून बघणारे आहे. काम हे केवळ मोबदला मिळवण्याचेच साधन नव्हे, तर आत्मसंतुष्टीकरता करण्याचे योगसाधनही आहे. या मूलभूत पण नेहमी विसरल्या जाणा-या मूल्यांचे विवेचन त्यात आहे. या मूल्यांचे बीजारोपण व संवर्धन करण्याबाबतची जबाबदारी कुटुंबाची असते. याचे स्मरणही सप्रे या पुस्तकात घडवतात. हे पुस्तक कामासंबंधीचे नीतिशास्त्र आहे. सुरेश नाडकर्णी
मार्गदर्शनपरKamachi Kimaya | कामाची किमया
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cart' सदनिकेची (फ्लॅटची) खरेदी सोसायटी/अपार्टमेंटची स्थापना व त्यानंतर पूर्तता करावयाच्या बाबी आदर्श व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखभाल खर्चात कपात आपल्या घराच्या संरक्षणाची अन् तंदुरुस्तीची व्यवस्था पुनर्विकासाची प्रक्रिया पुनर्विक्रीचे (रिसेलचे) अन् घर-खरेदीचे सहजसोपे टप्पे जमीन विकत घेऊन घराचे बांधकाम घराची विक्री करतानाची प्रक्रिया सर्वांच्या मनातील घराशी संबंधित या सगळया मुद्दयांचे स्पष्टीकरण देणारे कशासाठी ? घरासाठी !
मार्गदर्शनपरKashasathi? Gharasathi! | कशासाठी? घरासाठी!
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartआपल्या मुलांशी बोलत असताना, तसंच त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना, आजही पालकांची गाडी एका विशिष्ट, नाजूक पण महत्त्वाच्या मुद्दयाला अडते लैंगिकतेच्या. म्हणजे या बाबतीत बोलायला हवं, हे त्यांनाही जाणवत असतं; पण अडचण असते ती काय सांगू , कसं सांगू! याची. त्याचवेळी याबाबत कोणाशी बोलावं, हेही कळत नाही. हे जाणूनच, गेली पंचवीसहून अधिक वर्षं लैंगिकता शिक्षणाबाबत काम करणा-या साठे पतिपत्नींनी मोकळेपणानं, पण संकोच जाणवणार नाही अशा सहज भाषेत साधलेला हा संवाद, आजच्या पालकांच्या मनामधील अनेक संदेह दूर करेल आणि पालकत्वाच्या त्यांच्या या वाटचालीत त्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल. केवळ आई नंच नव्हे, तर बाबा नंही वाचलंच पाहिजे, असं हे पुस्तक !
मार्गदर्शनपरKay Sangu? Kasa Sangu ? | काय सांगू? कसं सांगू?
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cart'लग्न कशासाठी ? भावनांचं व्यवस्थापन... डेटिंग.... लिव्ह इन रिलेशनशिप... गृहव्यवस्थापन... व्यक्तिमत्व चाचणी आणि विवाह... मुलामुलींच्या लग्नाविषयी पालकांची भूमिका.. नात्यांचं व्यवस्थापन... लग्न करण्याआधी पत्रिका बघावी का? विवाहपूर्व समुपदेशन.. काळाची गरज... लग्न करण्यामागच्या कारणांपासून ते जोडीदार निवडीच्या निकषांपर्यंत, लग्न सोहळ्याच्या स्वरूपापासून ते स्वत:च्या आंतरिक ओळखीपर्यंत अनेक गोष्टींची तपासणी करण्यास प्रवृत्त करणारे पुस्तक लग्न जमवण्याआधी... '
मार्गदर्शनपरLagna Jamavnyaadhi.. | लग्न जमवण्याआधी…
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartएक असतो निराशावादी माणूस. त्याच्या हातात असतो अर्धा भरलेला पेला. तो पेला अर्धा रिकामा आहे, याचं दु:ख करीत तो माणूस कसंबसं जगतो, खंगत मरतो. दुसरा असतो आशावादी माणूस. त्याच्या हातात असतो अर्धा रिकामा पेला. तो पेला अर्धातरी भरलेला आहे, याचंच समाधान मानत तो माणूस जगतो, वर्षानुवर्षं नुसतं जगत राहतो. पण त्या दोघांच्याही दुस-या हातात पाण्यानं भरलेला तांब्या असतो, असू शकतो. त्यातलं पाणी पेल्यात ओतावं, तो पूर्ण भरावा आणि पोटभर पाणी प्यावं, एवढी साधी गोष्ट त्या दोघांनाही कुणीच कसं सुचवत नाही, याचं आश्चर्य वाटतं. त्या दोघांना ती साधी गोष्ट सुचवण्याचं आजवर कुणी न केलेलं विधायक काम, मराठी भाषेपुरतं पार पाडणारं खेळकर, खुमासदार शैलीतलं 'क्रांतिकारक' पुस्तक.
मार्गदर्शनपरMajet Jagava Kasa? | मजेत जगावं कसं?
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cart'मजेत जगावं कसं ? - याचा राजमार्ग दाखवला शिवराज गोर्ले यांनी ! या विक्रमी पुस्तकाच्याच लेखकाची 'माणसं जोडावी कशी ? ' - ही नवी लाघवी कलाकृती. वास्तविक माणसं-नाती जोडू पाहणारे आपण, कळत-नकळत काहीवेळा ती तोडूनच टाकतो. म्हणूनच माणसांची किंमत आणि नात्यातली गंमत समजावून सांगणारं हे पुस्तक प्रत्येक 'माणूसप्रेमीनं' वाचावं, मित्र-मैत्रिणींना भेट द्यावं किंवा, नुसतंच जवळ बाळगावं !
मार्गदर्शनपरMansa Jodavi Kashi ? | माणसं जोडावी कशी?
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Sale! Add to cartमनुष्यबळ व्यवस्थापनशास्त्राची मराठी वाचकाला ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. हा ग्रंथ आहे दोन भागांत. पहिला भाग मनुष्यबळ व्यवस्थापनाची व्याख्या, व्याप्ती अन् विकासाचा मागोवा घेणारा. दुसरा भाग औद्योगिक संबंध, औद्योगिक लोकशाही, कामगार संघटना, औद्योगिक शांतता, सामुदायिक देवाण-घेवाण अशा नव्या-जुन्या संकल्पनांची ओळख करून देणारा. औद्योगिक शिस्त, कर्मचा-यांची गा-हाणी अन् त्यावरची उपाययोजना या पैलूंची मांडणी करणारा. मनुष्यबळ विकासाचे एकविसाव्या शतकातील चित्र रेखाटणारा हा ग्रंथ सामान्य वाचकांबरोबरच जिज्ञासू विद्यार्थी आणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांनाही मार्गदर्शक ठरेल.
मार्गदर्शनपरManushyabal Vyavasthapan Va Audyogik Sambandh | मनुष्यबळ व्यवस्थापन व औद्योगिक संबंध
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartगडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर या छोट्याशा गावातील विद्या मंदिर ही प्रयोगांची पहिली पायरी. मुलांमध्ये दडलेल्या उपजत क्षमतांचा विकास घडवणे हे या सा-या प्रयोगांचे लक्ष्य. वर्गात प्रत्यक्ष घडलेली अध्ययन-अध्यापन प्रकिया हा या प्रयोगविषयाचा गाभा. शिकणे आनंददायी व्हावे, शिक्षणातील साचलेपण जाऊन ते निर्झरासारखे प्रवाही व्हावे, या उद्दिष्टाने झपाटलेल्या एका शिक्षणतज्ज्ञाने रेखाटलेला हा अनोखा प्रवास. विद्यार्थी, पालक, सहयोगी शिक्षक आणि या क्षेत्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गुंतलेल्या अनेक व्यक्ती यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून साकारलेले - प्राथमिक शाळेतील शिक्षिका ते शिक्षणप्रशासनात सहभागी झालेल्या शिक्षणाधिकारी अशा विविध भूमिकांमधून भरीव योगदान देणा-या हाडाच्या शिक्षणतज्ज्ञाने शब्दबद्ध केलेले - माझे शाळेतले प्रयोग
All BooksMaze Shaletale Prayog | माझे शाळेतले प्रयोग
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cart५५ प्रश्नांची नेमकी उत्तरं, आणि आणखीही पुष्कळ... सरकारी धोरणं वेळोवेळी जाहीर होत असतातच की. मग नव्या शैक्षणिक धोरणाचा यंदाच एवढा गवगवा कशासाठी? ही फक्त सरकारी प्रसिद्धीची युक्ती? की त्यात खरंच आहे काही उपयुक्त? कुणाचा काय फायदा होणार यातून? शिक्षकांना काही लाभ मिळणार की कामंच वाढणार फक्त? आमच्या मुलांचं खरंच काही कल्याण होणारे का? भाषांची संख्या वाढवणार का? पदवी परीक्षा तीनऐवजी चार वर्षांची? कशासाठी? क्रेडिट पॉलिसी फार किचकट नाही का वाटत? मेजर, मायनर, कौशल्ये, व्होकेशनल' अशा वेगवेगळ्या श्रेणीत विषय विभागले आहेत ते का? १० २ ३ ऐवजी ५ ३ ३ ४ हा नवा पॅटर्न आणलाय. यातून गोंधळ वाढणार की काही पदरात पडणार? पालकांनी नक्की करायचं तरी काय? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२०) यंदापासून अमलात येतंय, अशा वेळी शिक्षणातल्या सगळ्या घटकांना पडणा-या तब्बल ५५ प्रश्नांची नेमकी उत्तरं देणारं, शिक्षणतज्ज्ञांनी लिहिलेलं मोलाचं पुस्तक.
All BooksNave Shaikshanik Dhoran-Vidyarthi-Palakansathi Margadarshan | नवे शैक्षणिक धोरण
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart
">
Skip to content