ललित लेखन
-
Sale! Add to cartहे भुयार आहे की विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का ? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का लिहिणं वगैरे ? लिहिणाऱ्या समोर ठाकणारे असे अनेक प्रश्न.. ज्यांची उत्तरं लिहिणाऱ्याला लिहिता लिहिताच उमगत जातात. दुसरे आपल्याला समजतात, तितके मूर्ख आपण खचितच नसतो. पण आपण स्वतःला समजतो, तितके शहाणेही आपण क्वचितच असतो ! लिहिताना आणि लिहिल्यावर काय काय झालं, यातली तथ्यं मी मांडताना हे शक्य आहे, की 'या तथ्यांच्या जबड्यातून निसटून, सत्य कदाचित् दूर कुठेतरी एकटंच बागडत असेल!'
All BooksDone That, Been There | डन दॅट बीन देअर
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartप्रदर्शन झालं, भिंतीवरची चित्रं ज्याच्यात्याच्या घरी गेली, की पोटात खड्डा पडतो : ... आता पुढे काय? मग आठवणी खरवडायला सुरुवात होते. खपल्या निघतात. मनात रुतून राहिलेले अनुभव... भिंतीवर खिळा ठोकावा तशा नजरेत ठोकल्या गेलेल्या इमेजेस... मी लगोरी लावायला लागतो. दगड एकमेकांवर रचतो, पुन्हा मोडतो, पुन्हा रचतो. काही म्हणता काही मनाला येत नाही. लगोरी उभी राहात नाही! या धडपडीतच ठेचकाळून मला माझ्या वाटा सापडत गेलेल्या आहेत. हरेक चित्रकाराला मिळालेला हा एक दैवी शाप आहे. डिव्हाईन कर्स! सब्जेक्ट... फॉर्म... काँपोझिशन्स.. कलर्स... टेक्श्चर्स... सतत शोधत राहायचं. लगोर्या लावत बसायचं. सुटका नाही. ती त ड फ ड सोसावीच लागते. बुडाखाली जाळ पेटलाय आणि डोक्यातल्या पातेल्यात काहीतरी शिजत घातलंय... अशी अवस्था! त्या चटक्यांचे काही तुकडे !
All BooksDont Paint The Clue | डोंट पेंट द क्लू –
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartहे एका शहाण्या मुलीचं मर्मस्पर्शी लिखाण आहे. तिच्यासाठी तिचं लेखन ही एक शोधाची वाट आहे. तिच्यामध्ये एक अतिशय उत्कट अशी शिकणारी मुलगी आहे. ती तिच्या लिखाणामधून स्वत:ला वाढवायला बघते. इतकी वाढण्याची धडपड मला फार कमी माणसांमध्ये दिसते. तिच्यात सतत एक ऊर्मी आहे, सतत एक उत्साह आहे. मोठ्ठा हात पसरून एखाद्या मुलीनी यावं ना, हे सगळं मला हवंय! असं म्हणत, तशी मला अमृता तिच्या लिखाणातून दिसते. एकूणच जीवन समजून घेण्याची या मुलीला फार असोशी आहे. शिवाय विचारपूर्वक जगण्याचं भान आहे आणि अशा जातीच्या माणसांना कायम अतृप्त, अस्वस्थ राहण्याचा एक शाप किंवा वर असतो. तोही तिला मिळालेला आहे, असं मला वाटतं. तिच्याभोवती घरीदारी नाटक, सिनेमा, चित्रं, संगीत, गाणं, नाचणं या सगळ्यांनी झणकारणारं वातावरण आहे आणि या झणकारणार् या वातावरणामध्ये ती स्वत:चा आवाज लावू पाहतीये. अतिशय प्रामाणिक आणि उत्कट अशा मुलीचा तो आवाज आहे आणि अमृता, तुझा आवाज आम्हाला छान ऐकू येतोय. डॉ. अरुणा ढेरे
All BooksEk Ulat.. Ek Sulat : Bhag 2 | एक उलट… एक सुलट भाग २
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Sale! Add to cart'अक्षरांशी ओळख, अक्षरांशी मैत्री, अक्षरांशी गप्पा आणि अक्षरांसोबतीनं धरलेला फेर... ती गाते सुरेख, अभिनय तर तिच्या आवडीचा, पण तिला व्यक्त व्हायला या अक्षरांनीच हात दिला... तिच्या मनातल्या विचारवादळांची अन् आयुष्यातल्या अनुभवसरींची अक्षरांनीच घडवली वीण... एक उलट... एक सुलट
ललित लेखनEk Ulat.. Ek Sulat : Part 1 | एक उलट… एक सुलट भाग १
₹320.00Original price was: ₹320.00.₹240.00Current price is: ₹240.00. Save ₹80 Add to cart -
Sale! Add to cartचाकोरीतल्या अपयशानं मुळीच खचून न जाता चाकोरीबाहेरचा छंद मनापासून जोपासणा-या एका पोरसवद्या तरुणानं लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे निसर्गप्रेमाचा आगळा आविष्कार आहे. रसायनशास्त्राच्या महाविद्यालयीन परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे हाती आलेलं फावलं वर्ष मदुमलाईच्या जंगलात प्राणीनिरीक्षणात घालवण्याची संधी मिळाली आणि कृष्णमेघच्या मनात लहानपणापासूनच दडलेलं जंगलप्रेम उफाळून आलं. तो वर्षभर त्या जंगलात राहिला, पण एखाद्या उप-या निरीक्षकासारखा नाही तर ख-याखु-या जंगलपुत्रासारखा राहिला. त्या जंगलातले हत्ती, रानगवे, रानकुत्री, अस्वलं यांच्यासारख्या प्राण्यांचं मनमुक्त जीवन त्यानं एखाद्या सहनिवाशाच्या भूमिकेतून निरखलं - पारखलं. त्याच्या त्या शोधयात्रेत आलेल्या सुंदर, थरारक, रोमांचक अनुभवांचं हे नितळ पारदर्शी संकलन म्हणजे जंगलरसात न्हाऊन निघालेलं आणि वाचकांनाही रानवेडाची दीक्षा देणारं मदुमलाई सूक्त आहे. काही पुस्तकं निव्वळ वाचायची नसतात, तर अनुभवायची असतात. मदुमलाईच्या जंगलातला एक तरुणप्रसन्न जीवनानुभव त्यातल्या सा-या चढउतारांसह, रौद्रथरारांसह आणून देणारं हे उत्कट पुस्तक असंच अनुभवण्याजोगं पुस्तक आहे... कृष्णमेघ जेथे रमला त्या मदुमलाईच्या प्रेमात पाडणारं... आणि त्याच्या हातून जे निसटलं त्याबद्दल हुरहूर लावणारं... वाचकांच्या जंगलजाणिवा प्रगल्भ करणारं, सहजसुंदर शैलीतलं...
बेस्ट सेलरEka Ranvedyachi Shodhyatra (Lokavrutti) | एका रानवेडयाची शोधयात्रा (लोकावृत्ती)
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cart'विनायकरावांची मैफील रंगली नाही, असे कधीच होत नाही. त्यात मैत्रीचा तानपुरा सतत वाजत राहतो. कधी स्वत:ची फजिती सांगणारा, कधी इतर कोणाची मस्त फिरकी घेणारा, कधी एखाद्या गुगलीने ऐकणा-याचीच विकेट काढणारा नर्म विनोदाचा ताल मध्यलयीत चाललेला. आणि मग विनायकराव किस्से, प्रसंग, घटना आणि त्यातून कितीतरी माणसे, केवढा तरी काळ तुमच्यापुढे जिवंत करतात. - दिलीप माजगावकर
ललित लेखनGele Lihayache Rahun | गेले लिहायचे राहून
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartसरधोपटता वजा केली, की तुम्हाला थोडं अधिक चांगलं लिहिता येऊ शकतं, हे नोरा एफ्रॉन या विदुषीचं तत्त्वज्ञान कविता महाजन यांनी त्यांच्या कथात्म लेखनकाळातच ओळखलं होतं. अकथनात्मक लेखन, अनुवादासाठी देशाच्या कानाकोपर् यातील लेखक-लेखिकांचं वाचन, संपादन या सर्व बाबींमुळे त्यांच्या लेखणीला धार आलेली दिसते. रा. भि. जोशींच्या प्रवासलेखनकुळाशी बरंचसं जवळचं नातं सांगणार् या घुमक्कडी' या पुस्तकामध्येही आहे प्रवासाच्या गोष्टी आणि गोष्टींचा प्रवास. तो किती खोलवर आहे, याचा अंदाज यातील कोणताही लेख वाचल्यानंतर उमजून येईल. पृथ्वीची उत्पत्ती, सूर्याची, अग्नीची, पावसाची इतकंच नाही, तर मिठाची उत्पत्ती याबद्दलच्या लोककथांचा प्रवास कविता महाजनांच्या प्रवासाशी एकरूप होऊन रूढार्थानं प्रवासवर्णन नसलेलं एक अचंबित करणारं पुस्तक तयार झालंय. ब्लॉगसाठी लिहिल्या गेलेल्या या प्रवासनोंदी, पण अत्यंत गंभीर आणि अनंत तपशिलांना कवेत घेणार् या.
All BooksGhumakkadi | घुमक्कडी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartएखाद्या संवेदनशील स्त्रीनं आपल्या जाणत्या सखीला कधी मनोगत तर कधी हृद्गत सांगावं, तसा या 'गोंदणखुणा' - चा आशय आहे. निसर्गातील एखाद्या घटकाचा अनपेक्षित साक्षात्कार, मानवी स्वभावातील अतर्क्य भावनाट्य, रुणझुणत्या कवितेच्या चरणाशी सहज घडलेला अर्थमेळ, स्त्री-संवेदनेशी जोडलेल्या घटना-प्रसंगांची चलतचित्र किंवा जीवनाच्या एखाद्या प्राणसूत्राचं स्वतःला निःसंदर्भ करून केलेलं आत्मचिंतन - अशा अनेक आशयसूत्रांची स्मरणी या लेख- संग्रहात आहे. त्यात क्षणात आपला आकार बदलणाऱ्या मेघांचं दर्शन आहे; तसंच शांतनिवांत आकाशाचं सूचक निःशब्दपणही आहे. अंतर्याम आणि भवताल यांतील तरल रेषा विरून जावी इतकी अनुभवाला सामोरं जाण्याची सिद्धता निघोजकरांकडे आहे. सुजाण वाचक 'गोंद णखुणा' पाहतील, नव्या दृष्टीनं पाहतील असा भरवसा वाटतो. हेमकिरण पत्की
All BooksGondankhuna | गोंदणखुणा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartSunil Gavaskar Before it came to be called “Googly” the delivery bowled through the back of the hand was called “Bosie” after a certain Mr.Bosanquet. It caused confusion among batsmen. The “googly” of Dilip Prabhavalkar causes hilarity among everybody with a sense of humour. Should we then call it “Prabhie”? संदीप पाटील क्रिकेट मैदानावर फलंदाजांना नाचविणारे गुप्ते, चंद्रशेखर, कादिर असे कैक गुगली गोलंदाज बघितले. परंतु मैदानाबाहेर आमच्या विकेटी घेणारा दिलीपचा गुगली अफलातुनच !
ललित लेखनGugali | गुगली
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cartमानवात जे नाही त्याची भरपाई म्हणून त्याला कल्पनाशक्ती मिळालीय नि जे आहे ते सुसह्य व्हावे म्हणून त्याला विनोदबुध्दी मिळालीय... विनोदाच्या अशा काही रंगीबेरंगी तुकड्यांचं एक संकलन
ललित लेखनHasa Ki! | हसा की!
₹90.00Original price was: ₹90.00.₹68.00Current price is: ₹68.00. Save ₹22 Add to cart
">
Skip to content