ललित लेखन
-
Sale! Add to cartगोमंतकाच्या हिरव्यागर्द शेताभाटांत वाढलेल्या; पावसापाण्यात, पागोळ्यांत मनसोक्त भिजलेल्या एका निसर्गवेड्या मनस्वी मुलीच्या जडणघडणीच्या आणि व्यावसायिक स्थैर्यापावेतोच्या प्रवासातील हे कडू-गोड जीवनानुभव.तिच्या त्या एकाकी धडपडीची, ध्येयाप्रत पोहोचण्यासाठीच्या जिद्दीची ते जाणीव तर करून देतीलच; परंतु अशा संघर्षाच्या वाटेवरून चालणाऱ्यांना प्रेरकही ठरतील.या लेखांतील हृदयंगम शब्दवैभव आणि लोभस लालित्य आपल्याला खिळवून ठेवील; शिवाय सखोल व्यासंग, वैचारिक परिपक्वता आणि भावनिक उत्कटता यांनी परिणत असे शाश्वत जीवनमूल्यांवरील श्रद्धा दृढ करणारे हे लेखन समकालीन मराठी ललित लेखनालाही निश्चितच नवी उंची देईल.लेखिकेच्या आजवरच्या आयुष्यातील नानाविध बऱ्यावाईट अनुभवांच्या तरंग आणि भोवऱ्यांचा भर ओसरल्यावर शेवटी ओंजळीत उरलेले हे निवळशंख पाणी...
All BooksNivalshankh Pani | निवळशंख पाणी
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Sale! Add to cartफुलं झाडावर तर छान दिसतातच, पण जेव्हा ती एका ओंजळीतून दुसऱ्या ओंजळीत जातात, तेव्हा ती आणखी छान दिसतात. जी गोष्ट फुलांची, तीच विचारांचीही. मनात जेव्हा शुद्ध, सात्त्विक विचार उमलतात, तेव्हा ते त्या कुणा एका व्यक्तीला तर आनंद देतातच, पण जेव्हा ते शब्दरूप लेवून एका मनातून दुसऱ्या मनात शिरतात, तेव्हा ते अधिक प्रकाश पसरवतात, अधिक प्रेरणादायी ठरतात. जगातलं, निसर्गातलं सौंदर्य आपल्या आस्वादक नजरेनं टिपण्याची किमया साध्य झाली म्हणजे ते इतरांनाही दाखवण्याची असोशी जन्म घेते. अशाच असोशीतून एका रसिकाला स्फुरलेल्या काही ललित लेखांचं हे संकलन. हे छोटेखानी लेख म्हणजे जणू काही सोनचाफ्याची फुलंच. त्या फुलांचा सुगंध जसा मन मोहरवून टाकणारा असतो, तसेच हे लेखही सात्त्विक समाधान देणारे आहेत. चौफेर संचार करणारे, प्रेरणेच्या पणत्या पेटवणारे आणि भावविश्व समृद्ध करणारेही !
All BooksOnjaliteel Chapha | ओंजळीतील चाफा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
ललित लेखन
Panyatle Diwas | पाण्यातले दिवस
₹30.00Original price was: ₹30.00.₹23.00Current price is: ₹23.00. Save ₹7 Read more -
Sale! Add to cartगेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था राजहंस प्रकाशन . गेली चाळीस वर्षं राजहंस चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. अशा दिलीप माजगावकरांचा विविध नामवंतांशी या ह्रदयीचे त्या ह्रदयी घातले असा चिंतनशील, भावगर्भ पत्रसंवाद : सप्रेम नमस्कार . राजहंस च्या वाटचालीचं विस्तृत सिंहावलोकन करणारी आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रपटाचा गेल्या पाऊण शतकाचा मागोवा घेणारी दिलीप माजगावकरांची प्रदीर्घ मुलाखत : प्रवास श्रेयसाकडे . दिगमा या चतुरस्र अन् लोभस व्यक्तिमत्त्वाला न्याहाळणारे त्यांच्या सुह्रदांचे लेख : असे दिसले दिगमा . या सा-याचा अंतर्भाव असलेलं महाराष्ट्राच्या साहित्यिक अन् सांस्कृतिक संचिताच्या इतिहासाचा जणू तुकडा वाटणारं पत्र आणि मैत्र ------------------------------------------------ गेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था राजहंस प्रकाशन . गेली चाळीस वर्षं राजहंस चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. दिलीप माजगावकरांनी विविध प्रसंगी प्रकाशनासंबंधी अनुभवसिद्ध मतं मांडली आणि व्यवसायाच्या भवितव्याचा वेध घेतला. त्यांच्या वाणीनं विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्ती आणि साहित्यकृतींचा आस्थेवाईकपणे शोध घेतला. त्यांच्या अशा निवडक रसाळ भाषणांचं संकलन : अवधारिजो जी ! अनेकांच्या लेखनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या दिलीप माजगावकरांची स्वतःची लेखणीही टोकदार, टवटवीत आणि आशयसंपन्न असल्याचं अधोरेखित होतं ते त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांतून. त्यांनी आंतरिक जिव्हाळ्यानं रेखाटलेली बारा विलक्षण व्यक्तिचित्रं. अंतरीचे उमटे बाहेरी व्यक्तिचित्रं आणि भाषणांतून उलगडलेला महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक संचिताचा छोटा पट वाणी आणि लेखणी
All BooksPatra Aani Maitra | पत्र आणि मैत्र
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartआपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले उद्योग हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्य समोर येतं, तर कधी होर्डिंग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत.. तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिस्कीलपणा आणि या जोडगोळीची धम्माल यासाठी वाचावं असं ...
ललित लेखनPatrapatri | पत्रापत्री
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartमन पेटारा पेटारा, त्यात असे भरलेला । सुखदुःखे सजलेला सारा आयुष्यपसारा ।। किती भेटले, तुटले आणि कितीक मिटले । नव्या-जुन्या पावलांचा सदा जागता पहारा ।। कधी खुलते दालन, कधी झाकलेला कप्पा । कधी मीच पेटाऱ्यात, कधी माझ्यात पेटारा ।। असा पेटारा खुलता सांडे आतला पसारा । नाही नाही हो कचरा, मनमोराचा पिसारा ।। माझा पसारा भरावा कुणा दुजा पेटाऱ्यात । काळनदीच्या तीराला वाट पाहतो दुसरा ।। आयुष्यात भेटलेली माणसे, सतत वेढून राहिलेला निसर्ग, जणू कुटुंबाचेच घटक वाटावेत असे पशुपक्षी, अनवट जागा तुडवत केलेली भटकंती आणि या साऱ्यांच्या स्मृतींची मनाच्या पुस्तकाच्या पानांमध्ये जपलेली पाने आणि पिसे यातून साकारलेला - वाचकाला भावविभोर करणारा - पेटाऱ्यातला पसारा
ललित लेखनPetaryatala Pasara | पेटाऱ्यातला पसारा
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartतलत महमूद सुभाष दांडेकर प्रो. मधु दंडवते माधुरी आणि स्नेहलता दीक्षित प्रिया तेंडुलकर अनंत पै उषा मंगेशकर राजकारण, साहित्य, उद्योग, कला अशा विविध क्षेत्रांत लखलखीत कामगिरी केलेली वलयांकित व्यक्तिमत्त्वं. त्यांच्या जीवनप्रवासातले लक्षणीय टप्पे अन् अविस्मरणीय क्षण टिपणारी, वाचकाला एका संपन्न बहारदार मैफिलीत सामील करून घेणारी वेधक शब्दचित्रं : राग दरबारी
All BooksRag Darbaree | राग दरबारी
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
ललित लेखन
Ramprahar | रामप्रहर
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
ललित लेखन
Ratrani | रातराणी
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cartलोकसत्ता च्या लोकरंग पुरवणीत दर रविवारी नियमितपणे एक वर्षभर सांगतो ऐका ह्या शीर्षकांतर्गत मनोहर पारनेरकरांनी हे लेख लिहिले. शीर्षकाच्या दोन शब्दांत लेखमालेचा उद्देश पूर्णत: सामावलेला होता : संवाद. मी सांगतो आहे, तुम्ही ऐका. पारनेरकरांच्या ह्या सादेला वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आणि त्यांचं सांगणं ऐकण्यात वाचक रंगून गेले. हे लेख वाचून आपण होतो त्याहून मनाने, ज्ञानाने अधिक समृद्ध झालो आहोत, असे वाचकांना नक्कीच वाटेल. तितका ह्या लेखांचा आवाका आहे. शांता गोखले
All BooksSangato Aika… | सांगतो ऐका…
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart
">
Skip to content

