विज्ञान
-
Sale! Add to cart'पृथ्वीच्या रंगमंचावर रंगले आहे एक महानाट्य. हे नाटक सुरू झाले साडेचार अब्ज वर्षांपूर्वी, त्यावेळी झाली पृथ्वीची उत्पत्ती. या पृथ्वीतलावर चेतनसृष्टीने पदार्पण केले चार अब्ज वर्षांपूर्वी. सतत वाढता विस्कळितपणा हा जडसृष्टीचा गुणधर्म. मात्र जीवसृष्टीने या प्रवृत्तीवर मात केली, जीवसृष्टीचा हा तरू सतत वर्धिष्णू राहिला, विविधांगांनी बहरत राहिला. या महानाट्यातील आगळीवेगळी सजीव पात्रे म्हणजे रेणूंचे अत्यंत सुसंघटित सहकारी संघ. या पात्रांनी पृथ्वीच्या रंगमंचावर साकारलेले'
विज्ञानUtkranti – Ek Mahanatya | उत्क्रांती – एक महानाट्य
₹800.00Original price was: ₹800.00.₹600.00Current price is: ₹600.00. Save ₹200 Add to cart -
Sale! Add to cartचार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिध्दांत मांडला दीडशे वर्षांपूर्वी. अनेक सूक्ष्म निरीक्षणे, विविध तपशीलवार नोंदी आणि या सा-यांची तर्कशुध्द गुंफण यांच्या वैज्ञानिक बैठकीवर रचलेला हा सिध्दांत. डार्विनच्या जन्माच्या द्विशताब्दीवर्षात उत्क्रांती सिध्दांताच्या विकासाचा वेध घेणारे उत्क्रांती
विज्ञानUtkranti | उत्क्रांती
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreवेद म्हणजे फक्त देवांची स्तुती करणा-या ऋचा नाहीत. वैदिक वाड्मय म्हणजे निव्वळ यज्ञयाग वा कर्मकांडाची वर्णने नाहीत. वेदकालीन ऋषींनी गणिताचा मूलभूत विचार केला होता. आजही अचंबा वाटेल, असे खगोलशास्त्राचे ज्ञान त्यांनी मिळवले होते. ग्रह-तारे-नक्षत्रांच्या गतीवरून कालगणनेचे अचूक मोजमाप करणारे पंचांग ते मांडत होते. भारताची ही तेजस्वी ज्ञानपरंपरा साधार दाखवणारा आद्य ग्रंथ प्रथमच मराठीतून तुमच्यापर्यंत पोहोचवणारे
विज्ञानVedang Jyotish | वेदांग ज्योतिष
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Read more -
Sale! Add to cartविज्ञान हा वर्तमानकाळाचा युगधर्म आहे. सा-या मानवी जीवनाचा तो आधारच आहे. विज्ञानाने सारे मानवी जीवन आमूलाग्र बदलले. केवळ एका विसाव्या शतकात हे साध्य झाले. एकविसावे शतक मानवी स्वरूपच बदलून टाकणार आहे. मानवाच्या उत्क्रांतीमध्येच विज्ञान हस्तक्षेप करेल. चंद्र-मंगळावर मानवी वसाहती होतील, आणि मानव सूर्यमालेबाहेर जाण्याची स्वप्ने पाहील. इंटरनेटद्वारे बुध्दिमान जागतिक मेंदू निर्माण होईल. नॅनो आणि बायो टेक्नॉलॉजी हे परवलीचे शब्द होतील. इन्फर्मेशन सुपर पॉवर्स अस्तित्वात येतील. इंटिलिजंट स्टेटस् देशातील नागरिकांना एकात्म करतील. विज्ञानावर प्रभुत्व ही एक अटीतटीची स्पर्धा होईल. विज्ञान वेध या प्रस्तुत पुस्तकात त्याची झलक दिसून येईल. भारताला मात्र या स्पर्धेत मागे राहून परवडणार नाही.
विज्ञानVidnyan Vedh | विज्ञान वेध
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreविज्ञान ही संज्ञा सर्वांना परिचयाची असते. पण तत्वज्ञान म्हटले, की अंमळ बिचकायला होते. विज्ञानाचे तत्वज्ञान ही तर भानगड पूर्णच डोक्यावरून जाते. मात्र विज्ञानालाही जे स्पष्टीकरण मागते, पेचात पकडते, प्रश्न टाकते ते विज्ञानाचे तत्वज्ञान! विज्ञान जे गृहित धरते, निष्कर्ष काढते, दावे करते, ते तर्काच्या कसोटीवर तावून सुलखून घेण्याचे काम विज्ञानाच्या तत्वज्ञानाचे!! तत्वज्ञानाचा जागल्या हा विज्ञानातील गैरसमजाचे तण दूर करून वैज्ञानिक मांडणी अधिकाधिक लख्ख करतो. सर्व वैज्ञानिकांना आधारभूत ठरणारा हा इंग्रजी भाषेतील परिचयपर लघुग्रंथ मराठीत उपलब्ध करून देत आहोत. विज्ञानजगातात तो निश्चितपणे मोलाची भर घालेल.
विज्ञानVidnyanache Tattvadnyan | विज्ञानाचे तत्वज्ञान
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Read more -
Sale! Add to cartया अफाट विश्वात आपण एकटेच आहोत काय ? की आपल्याला कुणी साथीदार आहेत ? आकाशगंगेत आपण एकमेवाद्वितीय आहोत ? की ती प्रगत जीवसृष्टींनी गजबजलेली आहे ? विश्वात लक्षावधी प्रगत संस्कृती असतील काय ? असतील तर त्यांचेकडून अजून संदेश का आला नाही ? जीवनाची उत्क्रांती निसर्गत: झाली आहे ? की कुण्या महाशक्तीने जीवसृष्टी निर्माण केली आहे ? फार फार पूर्वी अवकाशयात्री पृथ्वीवर आले होते काय ? त्यांनी आपल्या भेटींचे पुरावे मागे ठेवले आहेत काय ? आज शास्त्रज्ञांना पडलेल्या प्रश्नांची ही मालिका आहे. दुस-या टोकाचाही विचार आज मांडला जात आहे. आपल्या मानवजातीशिवाय या विश्वात दुसरं कुणीही नाही. आपण आहोत म्हणूनच विश्वाच्या अस्तित्वाला अर्थ आहे. परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीचा शोध व्यर्थ आहे. अंधा-या खोलीत नसलेले काळे मांजर शोधण्याचा तो प्रकार आहे. तरीही सहस्रावधी शास्त्रज्ञ प्रगत संस्कृतीच्या शोधात आज गुंतलेले आहेत. आज ना उद्या त्यांचा संदेश येईल अशी त्यांना आशा आहे. विश्वात आपण एकटेच आहोत काय ? हा ग्रंथ या मतामतांच्या गलबल्याचा एक आढावा आहे.
विज्ञानVishwat Aapan Ektech Aahot Kay | विश्वात आपण एकटेच आहोत काय?
₹110.00Original price was: ₹110.00.₹83.00Current price is: ₹83.00. Save ₹27 Add to cart
">
Skip to content