संकीर्ण
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreरामायण-महाभारतासारख्या प्राचीन महाकाव्यांचा जो विविध दृष्टीकोनातून चिकित्सक अभ्यास होत आहे, त्यामुळे त्याकाळचे समाजजीवन, राजकीय स्थित्यंतरे, व्यक्ती-त्यांचे स्वभाव, गुणदोष, स्त्री-पुरूष संबंध इत्यादी गोष्टींबाबत नवी नवी माहिती उजेडात येत आहे. शाप आणि वर हे महाभारत ग्रंथाचे केवळ शोभनीय पैलू नसून ते अंगभूत असे अविभाज्य भाग आहेत. रामायण घडले ते दशरथाने कैकयीला दिलेल्या वरांमुळे आणि महाभारत साकारले ते देवव्रताच्या प्रतिज्ञेतून. रामायणात ६१ शाप आणि ८४ वर आहेत तर महाभारतातील शापांची संख्या १४७ असून वर २७२ आहेत. शपथा, प्रतिज्ञा, सत्यक्रिया,आशीर्वाद, आकाशवाणी यांचे प्रमाणही उपेक्षणीय नाही. ग्रंथरचनेतील या सर्वांचे स्थान आणि योजना महत्त्वपूर्ण आहे. व्यास-वाल्मिकीसारख्यांना शाप / वराची योजना करण्याची आवश्यकता का भासली असावी ? ही संकल्पना कशी उदयास आली ? शाप / वर देण्याचा अधिकार कोणाला, केव्हा आणि कसा प्राप्त होऊ शकतो ? अतिरिक्त उपयोगाने शाप / वर निष्फळ होतात काय ? कोणत्या वैशिष्टयांमुळे त्यांचा एवढया विपुल प्रमाणात उपयोग करण्यात आला ? साहित्यदृष्टया शाप / वर यांचे मूल्य काय ? हे या ग्रंथाचे अलंकार, विभ्रम की अविभाज्य अंग ? त्यांच्याविषयी समाजाला इतके जबरदस्त आकर्षण का वाटावे ? इत्यादी अनेक प्रश्न हे ग्रंथ वाचताना मनात येतील. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे.
संकीर्णMahabhartache Vardan | महाभारताचे वरदान
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Sale! Add to cartमुंबई म्हणजे लोकलमधली गर्दी, माणसांनी खच्चून भरलेल्या चाळी, वाहनांनी ओसंडणारे रस्ते. मुंबई म्हणजे बकालपणा. पण मुंबई अशी नव्हती. अगदी पन्नास साठ वर्षांपूर्वीचे मुंबईचे रूपडेसुध्दा साजिरे-गोजिरे होते. त्यावेळच्या मुंबईच्या राजकीय, सांस्कृतिक घडामोडीँमधून त्या मोहमयी नगरीची अनोखी सफर.....
संकीर्णMazi Mumbai | माझी मुंबई
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
संकीर्ण
Mumbaicha Annadata | मुंबईचा अन्नदाता
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cartरूढ अर्थानं ज्यांना सेलिब्रिटी म्हणता येणार नाही, अशी अनेक मराठी मंडळी वेगळ्याच वाटेनं चालत असतात. प्रसिद्धी, मानसन्मान, त्यातून मिळणारा पैसा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपल्या मनाला पटेल, आवडेल ते काम ही मंडळी स्वान्त सुखाय करीत राहतात. विश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टवर येऊन गेलेल्या अनेक पाहुण्यांपैकी काही निवडक पाहुण्यांशी झालेल्या गप्पांवर आधारित हे पुस्तक. पॉडकास्ट ते पुस्तक अशा माध्यमांतराचंही मराठीतलं हे पहिलंच उदाहरण. गेल्या चार-पाच वर्षात पॉडकास्टींग या माध्यमानं मराठीच नव्हे तर इतरही अनेक भारतीय भाषांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. मराठीमध्ये या माध्यमाची ओळख करून देण्यात विश्वसंवाद चा हातभार लागला याचा अतिशय आनंद वाटतो. हे पुस्तक वाचून आणि विश्वसंवाद च्या यू-ट्यूब चॅनेलवरील इतर मुलाखती ऐकून मराठी वाचकांमध्ये या माध्यमाची आवड निर्माण झाली, आणि त्याही पुढे जाऊन कुणी स्वतःचा पॉडकास्ट सुरु केला तर या धडपडीचं सार्थक झालं असं वाटेल.
All BooksNivadak Vishwasavaad | निवडक विश्वसंवाद
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more' पातंजलयोगदर्शन - एक अभ्यास -- विविध संदर्भग्रंथांचा समावेश केल्यामुळे हा अभ्यासग्रंथ अतिशय श्रीमंत झाला आहे. ज्या आनंदापासून तो उमलला आहे, त्या आनंदाचे शिंपण लेखकाच्या शब्दातून होत आहे. आनंद ॠषींची भाषाशैलीही अलंकृत व नितळ आहे. त्यांच्या झरणीतून अनेक वेळा ओशोंचा झरा वाहतो आणि वाचक स्वत:ला विसरून त्यात डुंबायला लागतो. -मा अमृत साधना फीचर संपादक, ओशो टाइअिम्स, पुणे. --आनंद ॠषींनी--विषयाची उकल करताना दुर्बोधता, क्लिष्टता, संस्कृतप्रचुरता टाळून जास्तीत जास्त सुलभ व सोप्या शैलीत विषयाची मांडणी, अनेक उदाहरणांसहित केली आहे.-- हा ग्रंथ वाचनीय, मननीय व चिंतनीय आहे, यात शंका नाही. --योगायार्च श्रीकृष्ण व्यवहारे संपादक, ठाणे -योगतरंग, ठाणे. --डॉ. मिकाओ उसुई यांच्या रेकी या योगोपचार पध्दतीचा पातंजल योगावरच्या ग्रंथात समावेश करणारे आनंद ॠषी हे पहिलेच लेखक असावेत. आनंद ॠषींनी योगशास्त्राबाबत मूलभूत विचार करून, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक इत्यादी विविध दृष्टिकोनातून योगसूत्रांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रंथ वाचनीय व्हावा याकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले आहे. - डॉ. अर्जुनदास बात्रा (निवृत्त) तत्त्वज्ञान - प्राध्यापक पुणे विद्यापीठ. --योगसूत्रांच्या अर्थाच्या सूक्ष्म छटा, अध्याहृत अर्थ उलगडून दाखविण्यात लेखक यशस्वी झाला आहे. लेखकाचा हा सखोल अभ्यास ओशोंच्या अंतर्बोधावर आधारलेला असल्यामुळे, प्रस्तुत युगाच्या संदर्भात तो समकालीन आहे. --स्वामी सत्य वेदांत कुलगुरू, ओशो मण्टिवर्सिटी, पुणे. '
संकीर्णPatanjal Yogdarshan | पातंजल योगदर्शन
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Sale! Add to cartकृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही..... मराठी साहित्यसंस्कृतीच्या ओघामध्ये अनेक अर्थांनी तितकंच जिव्हाळ्याचं निधान बनलेले पुलही आता राहिले नाहीत..... म्हणून मनामनांत तीच वेदना, तीच खंत तीच हुरहुर..... तिला थोडक्यात व्यक्त करणारी आकाशवाणी पुणे केंद्रावरील आशयसंपन्न भाषणमाला आता छापील रूपात. पुरूषोत्तमाय नम:
संकीर्णPurushottamaya Namah | पुरुषोत्तमाय नम:
₹55.00Original price was: ₹55.00.₹41.00Current price is: ₹41.00. Save ₹14 Add to cart -
संकीर्ण
Roopvati Bharya Shatru : | रूपवती भार्या शत्रु: ।
₹25.00Original price was: ₹25.00.₹19.00Current price is: ₹19.00. Save ₹6 Add to cart
">
Skip to content



