संवाद
-
Sale! Add to cart... गप्पांच्या ओघात एकदा दुर्गाबाई मला म्हणाल्या, "मला जगण्याचं सुख वाटतं बघ." बाईंच्या या बोलांचा मला अपार विस्मय वाटला. त्यांचं हे विधान मला थोडंसं धाष्टर्याचंही वाटलं. कारण आपण माणसं नेहमी कशा ना कशासाठी सतत कुरकुरत असतो. तर मनाला, बुध्दीला व्यग्रता असता, काही ना काही सतत दुखतखुपत असता ही एकोणनव्वद वर्षांची बाई म्हणते, "मला जगण्याचं सुख वाटतं बघ." यामागचं रहस्य कशात आहे ? ते आहे बाईंच्या जीवनोत्साहात. त्यांच्या वृत्तींमध्ये नित्य ताजेपणा आहे. त्यांना जगाबद्दल, जगण्याबद्दल अपार उत्सुकता आहे. ज्ञानाची परमकोटीची ओढ आहे. आपलं आयुष्य म्हणजे ईश्वरानं दिलेली देणगी आहे, अशा भावनेनं त्यांची जीवनावर, जीवनमूल्यांवर अम्लान, अव्यभिचारी निष्ठा आहे. त्यामुळेच रोजचा दिवस त्यांना नवी उमेद देतो. त्यांना जग, जगणं शिळं वाटत नाही. म्हणूनच त्यांना म्हातारपणाची अडचण वाटत नाही, की मृत्यूचं भय वाटत नाही. जगण्याचं सुख वाटतं...
संवादAispais Gappa Durgabainshi | ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cart'बाई. या दोन अक्षरांनी मराठी रंगभूमीचं अर्धशतक स्वत:त सामावून घेतलं आहे. ह्या पन्नास वर्षांत अनेक नाटककार, कलावंत नि तंत्रज्ञ बाईंच्या जगाशी एकरूप झाले. ती दुनिया या पुस्तकात लखलखते आहे. रंगभूमी हा माणसांनी, माणसांसाठी नि माणसांव्दारा रचलेला अद्भुत खेळ आहे, हे विजयाबाईंना पक्कं ठाऊक आहे. मराठी रसिकांना त्यांच्या अविस्मरणीय नाटयकृतींची जबरदस्त मोहिनी पडली हे तर खरंच; परंतु विजयाबाईंनी मराठी रंगभूमीला ग्लोबल थिएटरशी विचारविनिमय करण्याचं बळ दिलं, प्रतिष्ठा दिली; हे निश्चितच त्यांचं मोठेपण. विजयाबाईंच्या कलाकिर्दीला रेनसाँची भव्यता लाभली आहे. त्यांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा आणि समृद्ध जाणिवांचा तटस्थ आणि सहृदय विचार, ही या पुस्तकाची प्रधान प्रेरणा आहे. विजयाबाईंनी अनेकांना मोठं केलं; अनेक लेखक-कलावंत घडवले. त्यांच्या शिष्यांची, सहकाऱ्यांची हृद्य मनोगतं हे या पुस्तकाचं लोभस वैशिष्टय. पु. ल. देशपांडे, श्री. पु. भागवत, दामू केंकरे, भक्ती बर्वे, डॉ. श्रीराम लागू, मोहन तोंडवळकर अशांच्या अल्पाक्षरी, रसरशीत शैलीत बाईंनी लिहिलेल्या शब्दचित्रांमुळे पुस्तकाचं मोल वाढलं आहे. बाई वाचकांना दीर्घकाळ आनंद देईल, हे निर्विवाद ! झिम्मा हे बाईंचं आत्मचरित्र. बाई हे एका रंगपर्वाचं चरित्र.
संवादBai- Eka Rangparvacha Manohar Pravas | बाई – एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
संवाद
Batchit Mahesh Elkunchwaranshi | बातचीत महेश एलकुंचवारांशी
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'संवादाचा सुवावो ही काही चटपटीत मांडणीची आणि चविष्ट माहितीची वर्तमानपत्री मुलाखत नाही. हा अंतर्मुख करणारा, विचार करायला लावणारा सर्जनशील वैचारिक संवाद आहे. प्रश्न विचारणारा आणि उत्तरे देणारा दोघेही सर्जनशील लेखक आहेत आणि ते प्रामाणिकपणे आपल्या विचारांचा शोध घेत आहेत, त्यांचा अर्थ समजून घेत आहेत. त्यांनी घेतलेल्या या शोधाचा वाचक म्हणून मागोवा घेत असताना आपण आपल्याही विचारांचा, दृष्टिकोनांचा शोध घेऊ लागतो, पापणी जागी ठेवून स्वत:कडे पाहू लागतो. याहून अधिक काय हवे ? मंगेश पाडगावकर (प्रास्ताविकातून)
संवादSamvadacha Suvavo : Prof. Ram Shawalkaranshi Ranglelya Gappa | संवादाचा सुवावो : प्रा. राम शेवाळकरांशी रंगलेल्या गप्पा
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
Sale! Add to cart'महाराष्ट्रात महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांनी स्त्री-शिक्षणाची पायाभरणी केली. नंतरची पायरी होती स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याची, समाजास स्त्रीप्रश्नांप्रती संवेदनशील बनवण्याची. हे कार्य हाती घेतलेल्यांमध्ये विद्या बाळ यांचं नाव अग्रस्थानी आहे. प्रथम 'स्त्री' आणि नंतर 'मिळून साऱ्याजणी'चं माध्यम वापरून विद्याताईंनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली. संवाद हे विद्याताईंचं बलस्थान. न पटलेल्या रूढी-रिवाजांशी संघर्ष करणं तो मात्र पटेल अशा शब्दांत ही त्यांची खास शैली. दृढ कृतीचा आग्रह, पण भाषा मात्र अनाग्रही आणि ॠजू. पुरुषप्रधानतेस विरोध दर्शवतानासुद्धा त्या पुरुषांशी संवाद साधण्यास प्रयत्नशील असतात. म्हणून तर स्त्रीमुक्ती चळवळीतील नेमस्त पंथाचं नेतृत्व आपसूक त्यांच्याकडे जातं. पूर्णवेळ गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती हा विद्याताईंचा प्रवास म्हणजेच विद्याताई आणि..
संवादVidyatai Aani… | विद्याताई आणि…
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartयशवंतराव चव्हाण खाजगी १ रेस कोर्स रोड, नवी दिल्ली ११००११ १ सप्टेंबर १९८४ प्रिय विनायकराव, यांसी स. न. वि. वि. पत्र अकारण लांबले. पण कुठे तरी मन मोकळे केले पाहिजे म्हणूनच हे सर्व लिहिले. आहे. तुम्ही कुशल असाल असा विश्वास आहे. आपला यशवंतराव चव्हाण
संवादYashodhan | यशोधन
₹75.00Original price was: ₹75.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹19 Add to cart
">
Skip to content
