समाजकारण / राजकारण
-
Sale! Add to cartइतिहास आणि वर्तमान मांडतो ती मोठ्यांच्या युद्धाची कहाणी परंतु मुलांच्या नजरेतून पाहा. तीच दिसेल रक्तरंजित, नकोशी खरी कहाणी. जगातल्या चौदा देशांतला युद्धकाळ आणि मरणाच्या दारात उभी असलेली मुलं. त्यांच्या घुसमटलेल्या बाल्याच्या अन् दबलेल्या मनस्थितीच्या साक्षी अशा डाय-यांतले काही दिवस. परस्परांचे शत्रू असलेल्या देशातली मुलंसुद्धा टाहो फोडूनच एकच प्रश्न विचारतात- जगातली युद्ध संपणार काधी?
समाजकारण / राजकारणHiravlele Awaj | हिरावलेले आवाज
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'प्रकृतीची काही तक्रार नाही. ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता. आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य. अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर स्वेच्छेने मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या - मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे याची जाणीव ठेवून त्याच्याकडे धीटपणे वाटचाल करणाऱ्या - मुलखावेगळया स्त्री-पुरुषांची सत्यकहाणी. विलक्षण बाब म्हणजे हे सारे एकाच कुलकर्णी कुटुंबाचे सदस्य होते !'
समाजकारण / राजकारणJagna Premacha Ani Maranahi | जगणं प्रेमाचं अन् मरणंही!
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartजेरुसलेम... ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमान या तिन्ही समाजांना अत्यंत श्रद्धेय असणारं हे शहर गेली पन्नास-पंचावन्न वर्षं सतत धुमसत राहिलं आहे. इस्त्राइलच्या स्थापनेपासून गडद होत गेलेला ज्यू-अरब संघर्ष आता अत्यंत स्फोटक अवस्थेत पोचला आहे. त्या संघर्षाच्या गेल्या वर्षीच्या अत्यंत निर्वाणीच्या टप्प्यावर निळू दामले हे प्रसिद्ध पत्रकार त्या युद्धभूमीला प्रत्यक्ष भेट देऊन, तेथली स्थिती निरखून आले. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे त्या संघर्षाचा अथपासून इतिपर्यंतचा इतिहास नाही, पण सर्वसामान्यांना तो जटिल प्रश्न समजू शकेल अशा रीतीने केलेले माहितीपूर्ण, रोचक-रंजक वृत्तांतकथन आहे. विषयाला थेट जाऊन भिडणा-या, व्यक्ती-प्रसंगांच्या नेमक्या निरीक्षणातून किस्से सांगत-गुंते उलगडवत नेणा-या विशेष शैलीत केलेले युद्धभूमीचे हे आगळेवेगळे प्रवासवर्णन आहे.
समाजकारण / राजकारणJerusalem | जेरूसलेम
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartकाश्मीर :एक शापित नंदनवन याच नावाच्या १९९५ साली प्रसिद्घ झालेल्या ग्रंथाची ही संक्षिप्त आवृती. ग्रंथ संक्षिप्त केलेला असला तरी काश्मीर-समस्या मात्र वाढलेली आहे; अधिकच गंभीर, स्फोटक बनलेली आहे ! या ग्रंथाचा हेतू काश्मीर-प्रश्न मुळात काय आहे व तो का सुटत नाही, याचे सत्यकथन हा आहे. तेथील महाराजांना भारतात विलीन व्हावयाचे नव्हते, हा प्रवाद खरा आहे काय ? त्यांना पाकिस्तानात विलीन होण्याचा सल्ला भारताने का दिला होता ? संस्थानांच्या विलीकरणाचे भारताचे धोरण कोणते होते ? विलीन करून घेताना सार्वमताचे लेखी आश्वासन का देण्यात आले ? तरीही नंतर सार्वमत का घेतले गेले नाही ? घटनेत ३७० कलम कसे व कशासाठी आले ? पं. नेहरूंनी पंतप्रधान शेख अब्दुल्लांना कारागृहात का टाकले ? तेथे अराजकाची व दहशतवादाची सुरूवात केव्हा झाली ? या व अशा अनेक प्रश्नांची खरी उत्तरे या ग्रंथात सापडतील. भरभक्कम पुराव्यांनिशी यात मांडलेले दाहक सत्य कितीही अप्रिय वाटले तरी राष्ट्रासाठी ते समजून घ्यावेच लागेल. कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नाच्या ख-या स्वरूपाचे अज्ञान हाच मूलत: एक राष्ट्रीय शाप आहे. म्हणूनच काश्मीर हे शापित नंदनवन ठरले आहे !
समाजकारण / राजकारणKashmir : Ek Shapit Nandanwan (Sankshipt Awrutti) | काश्मीर :एक शापित नंदनवन (संक्षिप्त आवृती)
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart'नर्मदा बचाव आंदोलन ! विस्थापित होणाऱ्या आदिवासींना लढण्याचं बळ मिळालं, ते या सशक्त जनआंदोलनानं. त्या बळावर त्यांनी आपलं घर-दार, जंगल, जमीन वाचवण्यासाठी दीर्घकाळ लढा दिला. त्या तीन दशकांच्या झुंजीची ही संघर्षमय सत्यकथा... आंदोलनाचा इतिहास, विस्थापनापूर्वीचं अन् नंतरचं आदिवासींचं जीवन, त्यांची संस्कृती, आदिवासी कार्यकर्त्यांची भूमिका अन् योगदान हे सारं या कथेतून उलगडत जातं. या लढ्याचा कणा असलेले दोन प्रमुख आदिवासी नेते ही कथा सांगताहेत आपल्या बोलीभाषेतून. त्यांच्या मुलाखतींमधून मांडलेला मौखिक इतिहास लढा नर्मदेचा... '
समाजकारण / राजकारणLadha Narmadecha | लढा नर्मदेचा
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart' युगानुयुगे निद्रिस्त राहिलेल्या चिनी माणसाला सतत जागं ठेवण्यासाठी वारंवार क्रांतीचं धक्कातंत्र अनुसरावं लागतं... माओच्या या वचनाचा आधार घेऊन त्याच्या चिआंग चिंग या पत्नीनं आपल्या सहका-यांकरवी 1966 च्या सुमारास चीनमध्ये सांस्कृतिक क्रांती नावाची प्रचंड उलथापालथ घडवून आणली. त्या क्रांतीच्या वावटळीत हजारो निरपराध चिनी नागरिकांचे जीवन पार उद्ध्वस्त झालं. अशाच एका अभागी, पण जिद्दीनं परिस्थितीला सामो-या जाणा-या स्त्रीचं हे थरारक आत्मकथन म्हणजे काही वर्षांपूर्वीच्या चिनी समाजाचं एक विदारक चित्र आहे. हे आत्मकथन कोणत्याही सहृदय माणसाला मनाला घायाळ करील, इतकं प्रत्ययकारी आहे. तुरुंगाच्या खिडकीतून बाहेरच्या जगाचा वेध घेऊ पाहणा-या निएन चंग नावाच्या एका मातेची ही कथा आहे. ती जशी तिच्या हालअपेष्टांची कथा आहे, तशीच ती तिच्या हरपलेल्या मुलीचीही शोधकथा आहे. तिचं सर्वस्व हिरावून घेण्यासाठी टपून बसलेले विध्वंसक रेडगार्ड्स, त्यांना प्रोत्साहन देणारे मतलबी नेते आणि त्या नेत्यांच्या दडपशाहीला बळी पडून सग्यासोय-यांच्याच जिवावर उठणारे दीनवाणे सामान्यजन या सा-यांचे अत्यंत प्रभावी चित्र या पुस्तकात रेखाटलेले आढळते. सर्वसामान्य चिनी माणसाच्या व्यथावेदनांचा परिचय करून देणारे... ऊरबडवा आक्रोश न करतासुद्धा मरणप्राय यातनांना शब्दरूप देणारं... आणि लेखिकेच्या अनुभवांचा अस्सल प्रत्यय देणारं आगळं आत्मकथन म्हणून निएन चंगचं हे पुस्तक जगभर गाजलं आहे, ते या प्रभावी गुणवैशिष्ट्यांमुळेच !
समाजकारण / राजकारणLife And Death In Shanghay | लाइफ ऍण्ड डेथ इन शांघाय
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमान्यवरांचे काही अभिप्राय या ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतला आहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे कार्य त्यांनी एकटयाने पार पाडले, ही बाब खचितच गौरवास्पद आहे. - य. दि. फडके राजकीय इतिहासचित्रणाचा एक नवा आदर्श निर्माण करणा-या या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे ते पुराव्यांच्या बहुसंदर्भीय पध्दतीच्या मांडणीत ! - दिलीप पुरुषोत्तम चित्रे भारतीय इतिहासातील एका तेजस्वी पण तणावग्रस्त कालखंडावर प्रकाशझोत टाकताना एक पूर्णपणे नवा 'पॅरेडाइम' देणारा हा महाग्रंथ फक्त प्रबोधनच करीत नाही, तर विचारी वाचकाला अंतर्मुखही व्हायला लावतो. - कुमार केतकर मानवी जीवनाप्रमाणेच बहुमिती असणा-या इतिहासाचे सर्वांगीण दर्शन घडवणा-या या विशाल ग्रंथाचा आवाका थक्क करून सोडणारा आहे. प्रा. सदानंद मोरे यांनी स्वातंत्र्यलढयातील निर्णायक कालखंडाची मौलिक चिकित्सा करून विलक्षण कामगिरी पार पाडली आहे. - प्रा. जे. व्ही. नाईक 'लोकमान्य ते महात्मा' हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे. - रा. ग. जाधव महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाची लखलखीत सप्रमाण मीमांसा करताना डॉ. सदानंद मोरे यांनी गुंतागुंतीच्या आंतरप्रवाहांची उकल व त्यांचा अनुबंध यांचा सूक्ष्म वेध घेतला आहे आणि महाराष्ट्रात गांधी हेच टिळकांचे राजकीय वारसदार ठरले, ही गोष्ट महाराष्ट्रधर्माला साजेशी व कालसुसंगत झाली, असा निष्कर्ष काढला आहे. - सदा डुम्बरे
समाजकारण / राजकारणLokamanya Te Mahatma (Part 1 Ani 2) | लोकमान्य ते महात्मा (भाग १ व २)
₹1,500.00Original price was: ₹1,500.00.₹1,125.00Current price is: ₹1,125.00. Save ₹375 Read more -
Sale! Add to cartगेल्या पंचवीस वर्षांत सर्वांत जास्त उत्क्रांत झालेला वर्ग कोणता ? जागतिकीकरणाचा सर्वांत जास्त लाभधारक, उपभोक्ता वर्ग कोणता ? संपूर्ण बाजारव्यवस्था, मनोरंजनाची साधने, सेवा-सुविधा यांचा सर्वाधिक उपभोग घेणारा वर्ग कोणता ? राजकारण, समाजकारण, अर्थकारण, प्रसारमाध्यमे यांवर सर्वाधिक प्रभाव असलेला वर्ग कोणता ? जागतिकीकरणानंतर बदल, संधी, पैसा, सुख, स्वप्नपूर्ती यांच्या स्थित्यंतराच्या वावटळीत सापडलेला वर्ग कोणता ? टुकीने संसार आणि नेकीने नोकरी करणारा एकेकाळचा वर्ग कोणता ? जागतिकीकरणाच्या काळात सर्वाधिक टीका होणारा वर्ग कोणता ? एकाच वेळी अचंबा, मत्सर, ईर्ष्या, असूया, हेवा, स्पर्धा, आदर, कौतुक, अनुकरणाची तीव्र मनीषा, तिरस्कार यांसारख्या परस्परविरोधी भावभावनांचा धनी होणारा वर्ग कोणता ? अशा या मध्यम वर्गाचे कालचे-आजचे आदर्श, परंपरा आणि प्रेरणा यांचा ऊहापोह करत त्याची उभी, आडवी, तिरपी चर्चा करणारा लेखसंग्रह. मध्यम वर्ग उभा, आडवा, तिरपा
समाजकारण / राजकारणMadhyam Varg : Ubha, Aadva, Tirpa | मध्यम वर्ग : उभा, आडवा, तिरपा
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart'स्त्री-पुरुष असा भेद करत, स्त्रीचा जेवढा वापर करणं शक्य आहे तेवढा करत आणि पायातील वहाण पायातच राहिली पाहिजे, असं म्हणत साऱ्या धर्मांनी स्त्रीला तुडवता येईल तितकं तुडवलं. समस्त पुरुषजातीला मोक्ष मिळवून देताना समस्त स्त्रीजातीचं जगणं अत्यंत हलाखीचं करून टाकण्याचं काम सर्व धर्मांकडून घडलं, हे एकाही धर्मसंस्थापकाला, एकाही महापुरुषाला कसं खटकलं नाही? त्याच्या करुणास्वरूपाला त्यामुळे लांच्छन कसं लागलं नाही? इतकं जीवघेणं दु:ख स्त्रीच्या पदरात टाकूनसुद्धा हे महापुरुष माणुसकीच्या, तत्त्वज्ञानाच्या गप्पा कोणत्या अधिकाराने करीत राहिले? स्वत:ला करुणामयी कसे म्हणवून घेत राहिले? की माणसाच्या कल्याणाचा विचार करताना स्त्री त्यांच्या हिशोबातच नव्हती? '
समाजकारण / राजकारणMahapurushachya Najaretun Stree | महापुरुषाच्या नजरेतून स्त्री
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Add to cart
">
Skip to content