All Books
-
Sale! Add to cartमुलांचं अडनिडं वय, हा पालकांचा परीक्षेचा काळ ! मुलांना स्वत:ची मतं फुटतात, आणि ती समजून घेताना, पालकांना घाम फुटतो. पालकांना वाटणारी आस्था, ही मुलांच्या दृष्टीनं लुडबूड ! पालकांनी केलेल्या सूचना, ही मुलांच्या नजरेत हुकुमशाही ! संवादासाठी सुरु केलेलं बोलणं, हमखास विसंवादाचं वळण घेतं. हा तिढा सोडवायचा कसा ? प्रक्रिया सोपी नाहीच, पण प्रयत्नसाध्य नक्की आहे. त्यासाठी सादर आहे, प्रिय पालक एका बालरोगतज्ज्ञ समुपदेशिकेचे अनुभवाचे बोल...
All BooksPriya Palak | प्रिय पालक
₹340.00Original price was: ₹340.00.₹255.00Current price is: ₹255.00. Save ₹85 Add to cart -
Sale! Add to cartBirds play an important role in protecting the environment. They help us in many ways like keeping the surroundings clean to signalling the change in weather. Let's know more about many such birds through this book. Protectors of Environment
All BooksProtectors Of Environment | Protectors of Environment
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartपुनश्च हनिमून एका लांबलेल्या आत्महत्येचा प्रवास. आजच्या जागतिकीकरणाच्या काळातील मध्यमवर्गीय, चाळिशीतील जोडप्याच्या वैवाहिक जीवनातील वैचारिक विसंवादाची जीवघेणी आंदोलने या दोन तासांच्या नाट्यप्रयोगात आहेत. ही आंदोलने आषाढातील भरलेले आकाश अधिक झाकोळून टाकतात. हे काही अवखळ करमणुकीचे नाटक नाही. सध्याच्या जगण्यातील विखंडतेवर हे नाटक सतत भाष्य करते. जगण्यातील अपरिहार्यता, स्त्री-पुरुष लग्नसंबंधांची सार्थकता, अर्थपूर्णता आणि कालौघातील निरर्थकता, त्यातील भाव-विषता यांच्या रंगमंचीय खेळाचे गारूड नाटक संपल्यावरही आपल्याबरोबर येते. वरकरणी मस्त चाललेल्या लग्नसंसाराच्या अंतर्मनाचे हे रंगमंचीय धिंडवडे आहेत. अशा नाटकाला सुरुवात असते, पण शेवट असतोच असे नाही. तो प्रत्येकानी आपापला समजून घ्यायचा असतो. सतीश आळेकर
All BooksPunashcha Honeymoon | पुनश्च हनिमून
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartदेवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांनी आपल्या काही जिवाभावाच्या सहकाऱ्यांसह संगीतशिक्षण आणि संगीतप्रसारासाठी एक रोपटं लावलं. भास्करबुवांच्या पुण्यप्रभावानं त्यांच्या मांदियाळीत सामील झालेल्या अनेकांनी या रोपट्याचं संवर्धन केलं. दिसामासानं वाढत या वृक्षानं शंभरहून अधिक पावसाळे पाहिले. त्याच्या संगीतछत्राखाली किती तरी स्वर आणि सूर निनादले, लय आणि ताल विसावले. या वृक्षाच्या विस्तारकार्यात देवगंधर्वांच्या पुढच्या पिढ्यांनी भक्कम योगदान दिलं अन् वर्तमान पिढी आजही पूर्णांशानं कार्यरत आहे. महाराष्ट्रभर पस्तीस शाखांनी समृद्ध झालेली ही संस्था म्हणजे एक नांदतं-गाजतं संगीतविद्यापीठ. गेली एकशे दहा वर्षं अखंड झंकारणाऱ्या या संगीतसंस्थेच्या समग्र प्रवासाचा वेध घेणारा ग्रंथ : पुणे भारत गायन समाज एक सुरेल स्वरयात्रा
All BooksPune Bharat Gayan Samaj : Ek Surel Swarayatra | पुणे भारत गायन
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartमला इथं स्त्रीच्या दुबळेपणाबद्दल बोलायचं नाहीय. पुरुषाच्या दुर्गुणांची यादीही वाचायची नाहीय. मला लिहायचंय ते स्त्रीच्या अंगभूत गुणवत्तेविषयी आणि प्रतिकूलतेवर मात करणा-या तिच्या कणखरपणाविषयी !
All BooksPunha Ekada ‘Stri-Purush’ Tulana | पुन्हा एकदा स्त्री पुरुष
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cartविलास शेळके.
एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व.
शिक्षणाने आणि पेशाने अभियंता.
संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक.
सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार,
अशा व्यक्तीचे बोट धरून
आपण या अक्षरप्रवासाला निघालो की,
ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो,
सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो.
त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी
आपणही समृद्ध बनतो.
विलास शेळके आपल्या अनोख्या नजरेतून
घडवत आहेत उगवत्या सूर्याच्या दिशेला
वसलेल्या सहा देशांचे दर्शन.All BooksPurvayan | पूर्वायन
₹430.00Original price was: ₹430.00.₹323.00Current price is: ₹323.00. Save ₹107 Add to cart -
Sale! Add to cartसुधीर नांदगावकर यांचे हे पुस्तक म्हणजे गुरुदत्तवरील त्यांच्या प्रेमाचा एक उत्कट आविष्कार ! गुरुदत्तच्या मृत्यूनंतर लगेचच त्याच्या घरी पोहोचलेल्या मोजक्या पत्रकारांत नांदगावकरही होते. त्यावेळी झालेल्या चर्चा, पत्रकार म्हणून कळलेल्या काही आतल्या गोष्टी आणि गुरुदत्तविषयीचा अपार आदर यांमुळे गुरुदत्तने आत्महत्या केली यावर नांदगावकरांचा विश्वास कधीच बसला नव्हता... सुधीर नांदगावकर यांनी या पुस्तकाच्या लेखनासाठी विशेष प्रयत्नांनी माहिती गोळा केली आहे. चरित्र-कादंबरी-जीवनप्रवास असा एक संमिश्र घाट स्वीकारला आहे. गुरुदत्तच्या आयुष्यातल्या एरवी फार लिहिल्या-बोलल्या न गेलेल्या घटनांचे तपशील, त्याच्या जगण्याचे, चित्रपटनिर्मितीचे, विचारप्रकियेचे काही नवे पैलू आपल्याला कळतात. आपल्या ओळखीचे चित्रपट, गाणी यांचा जन्म कसा झाला, या माहितीत आपण गुंतत जातो आणि अनेकदा तर त्या घटनांचे आपण जणू प्रत्यक्ष साक्षीदार आहोत, असे आपल्याला वाटत राहते... श्रीकांत बोजेवार
All BooksPyaass | प्यासा
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreनेमके कसे होते आर. डी. उर्फ राहुल देव बर्मन ? सिनेसंगीतात ते काळाच्या पुढे होते, असं का म्हणतात? पाश्चात्य संगीताने प्रभावित होते ते की राग-संगीताशी निष्ठावंत ? मेलडी अन् हार्मनी यांचं इतकं प्रभावी फ्यूजन केलं दुसऱ्या कुणी? राग-लय-ताल यांचे इतके अभिनव प्रयोग केले का इत्तर कुणी? वाद्यसंगीतात इतके नवे बदल इतक्या चतुरपणे करणारा आहे इतर कुणी? पंचम का म्हणत त्यांना? अन् जीनियस तरी कशामुळे म्हणायचं? 'आरडी'ने बंडच पुकारलं परंपरेविरुद्ध की परंपरा सांभाळत नावीन्य आणलं ? आर. डी. बर्मन यांच्या समृद्ध संगीताची वैशिष्टचं आणि त्यांच्या निवडक २५ चित्रपट-गीतांचं रसग्रहण यातून चित्रपट व संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर यांनी घेतलेला आर.डी.च्या संगीताचा रसिक शोध-वेध...
All BooksR. D. Burman | आर डी बर्मन
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cartतलत महमूद सुभाष दांडेकर प्रो. मधु दंडवते माधुरी आणि स्नेहलता दीक्षित प्रिया तेंडुलकर अनंत पै उषा मंगेशकर राजकारण, साहित्य, उद्योग, कला अशा विविध क्षेत्रांत लखलखीत कामगिरी केलेली वलयांकित व्यक्तिमत्त्वं. त्यांच्या जीवनप्रवासातले लक्षणीय टप्पे अन् अविस्मरणीय क्षण टिपणारी, वाचकाला एका संपन्न बहारदार मैफिलीत सामील करून घेणारी वेधक शब्दचित्रं : राग दरबारी
All BooksRag Darbaree | राग दरबारी
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartपेरू देश म्हणजे गूढ आणि रहस्यमय ठिकाणांची खाण. स्पॅनिशांनी आक्रमण करून या देशावर पाच शतके राज्य केले. पाषाणांच्या इमारतीवर अवाढव्य राजवाडे बांधले. आजही पाया खोदला, तर लाखो सांगाडे मिळतात. लिमा शहरामध्ये फिरताना पावलोपावली जुन्या काळाच्या खुणा आढळतात. हा देश पाहताना आपल्या मनात अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते. परकास बेटावरील अवाढव्य त्रिशूल थेट रामायणाशी नाते सांगतो का ? विज्ञान, तंत्रज्ञान आणि तर्कबुद्धी यांना अद्याप ज्यांचे कोडे पूर्णपणे उलगडता आलेले नाही, त्या नाझ्काच्या रेखाकृती मानवनिर्मित आहेत की परग्रहवासीय एलियननी साकारलेल्या ? विस्तीर्ण पठारावर विसावलेल्या या प्राणी-पक्षी-मानवाच्या रेखाकृती म्हणजे जणू नोहाची नौकाच ! त्यांचे संपूर्ण दर्शन आधुनिक काळात मानवाला झाले, तेच मुळी विमानातून ! इतिहासाच्या पोटातील अशी अनेक गूढ रहस्ये आपल्या भूमीवर वागवणाऱ्या देशाची वेधक सफर.
All BooksRahasyamay Peru | रहस्यमय पेरू
₹330.00Original price was: ₹330.00.₹248.00Current price is: ₹248.00. Save ₹82 Add to cart
">
Skip to content