WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Davbhijaleee Vahee | दवं भिजली वही

लेखक: Himanshu Kulkarni | हिमांशु कुलकर्णी

Original price was: ₹120.00.Current price is: ₹90.00. Save ₹30

Availability: 25 in stock

फुलांनी बहरलेली नाजूक डहाळी वा-याच्या झुळकीने चांदण्यात थरथरावी, तसेच काहीसे श्री. हिमांशु कुलकर्णी यांची कविता वाचताना मला सतत जाणवत राहिले. अतिशय संवेदनशील मनाचा तो उत्कृष्ट आणि कोमल आविष्कार आहे. स्वत:कडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी या कवितेला कसलीही नवी टूम लपेटून घेण्याची जरुरी वाटत नाही. आवाज मोठा करून ती कानावर आदळण्याचा सोस

बाळगीत नाही. तिला स्वत:चीच सोबत पुरते. ती आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी पहाते. भोवतीच्या वास्तवाचे प्रखर भान तिला आहे. पण असे असूनही तिचा प्रकृतिधर्मच असा आहे की, स्वत:शीच हळुवारपणे गुणगुणल्यासारखी ती व्यक्त होते. हा प्रकृतिधर्म म्हणजे तिचे खानदान आहे. या प्रकृतिधर्माशी सुसंगत अशी सूचकता श्री. हिमांशु कुलकर्णी यांच्या कवितेत अगदी स्वाभाविकपणे आली आहे. मंगेश पाडगावकर

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2024
बुक कोड : D-04-2024
वजन : 125 g
पाने : 64
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">