Jalyatil Chandra | जाळयांतील चंद्र
₹140.00 Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35
Out of stock
श्री. म.वा. धोंड हे कायम प्रवासात असतात. मुंबईतील साहित्य सहवास मधल्या आपल्या घरातल्या खुर्चीत बसून ते एक गाडी पकडतात. पिपात मेले . आनंदी गोपाळ . पोत . स्वीमी . लता मंगेशकरांनी गायिलेले तुकारामाचे अभंग. बालकवींची रमाई नाहीतर नाच ग घुमा . मूळ गाडी मर्यादित धावेची असली तरी धोंड ती आपल्याला
हव्या त्या वेगाने फिरवतात. हे करताना त्यांचे दिशेने भान चुकत नाही. गाडीवरचे नियंत्रण सुटत नाही. अपघात घडत नाही. गाडी मोडत नाही. कोणत्याही कुशल ड्रायव्हर प्रमाणे या सगळ्याचे पक्के भान ते ठेवतात. पोचण्याचे ठिकाण ठरलेले असते पण वाटते जे जे भेटते ते स्वतंत्रपणे मन गुंतवणारे, चकित करणारे, दाद द्यावी असे असते. अशी कितीतरी ठिकाणे जागोजाग ते आपल्याला भेटवतात. यामुळेच हे प्रवास सरळ रेषेतले आणि कामापुरते नाहीत, हे मुक्त आणि मजेचे आहेत. वाचकाला बरोबर घेऊन या पुस्तकात श्री.धोंड यांनी असे एकुण अकरा प्रवास केले आहेत. त्यांची लेखनशैली व्यासंगी तितकीच ससीली, कधी गंभीर, कधी मिष्किल, कधी रंगेल आणि कधी चावटदेखील. गरजेनुसार यात उपरोधाची धार. अभ्यासाने सामान्य पंडितांना येते ते जाड्य या पुस्तकात औषधालाही सापडणार नाही. विजय तेंडुलकर
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
William Shakespeare - Jeevan Ani Sahitya | विल्यम शेक्सपिअर - जीवन आणि साहित्य
Sale!
Mahanirvan : Samiksha Aani Sansmarne | महानिर्वाण : समीक्षा आणि संस्मरणे
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content