WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: J-01-1996 Category: Brand:

Kadambari Ek | कादंबरी एक

लेखक: Vijay Tendulkar | विजय तेंडुलकर

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

Out of stock

Notify Me when back in stock

स्त्री-पुरुष संबंधांचा तटस्थपणे वेध घेणारी कादंबरी... स्त्री-पुरुष नात्याचा एवढा धीट व नि:संकोच शोध मराठी कादंबरीत क्वचितच कोणी घेतला असेल. या नात्याची अपरिहार्यता, सनातन गुंतागंत, पुरुषाचा उर्मट, आक्रमक अहंकार व त्यातून स्पष्ट होणारे त्याचे जन्मजात दुबळेपण व अपुरेपण आणि त्याचबरोबर वरवर दुबळ्या व परावलंबी वाटणा-या स्त्रीचे संयत, स्वयंपूर्ण व स्वयंभू असे

आंतरिक सामर्थ्य विजय तेंडुलकरांचे वैशिष्टय असे की, तत्त्वचिंतकाची भूमिका न घेताही सरळ, साध्या प्रसंगांच्या मालिकांमधून ते या नर-मादी संबंधातील आदिस्तर कधी हळुवारपणे, तर कधी प्रक्षोभकरीत्या उलगडत जातात. खरे तर ही कहाणी आहे एका चौकोनी कुटुंबाची; किंवा त्या कुटुंबाच्या कुटुंबप्रमुखाची, भूकंपाप्रमाणे गदगदून हलवणा-या त्याच्या वासनामय स्वप्नाची, त्याच्यातील हट्टी पुरुषाची. पण तेंडुलकरांच्या स्पर्शाने ही कहाणी होऊन जाते ती सर्वसर्जनशील अशा आदिम स्त्री-शक्तीची.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 1996
बुक कोड : J-01-1996
वजन : 270 g
पाने : 264
आर्टिस्ट : वसंत सरोवरे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 1996

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">