WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Manikravanchi Charitrakatha | माणिकरावांची चरित्रकथा

लेखक: Ratnakar Patvardhan | रत्नाकर पटवर्धन

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

हे लखलखतं माणिक...मराठीत प्रथमच सगळंच भव्य-दिव्य आणि चमत्कारिक ! साता-यातल्या ताम्हणखो-यातली शिलेदार मंडळी गायकवाडांबरोबर बडोद्याला आली. त्यांनी तलवार गाजवली. म्हणून समस्त ताम्हाणे माणिक ह्या किताबानं गौरविले गेले. त्यातला एक कुलदिपक : गजानन यशवंत माणिक. ह्या मल्लविद्याविशारदाला बडोदेकर संस्थानिकांनी सांभाळलं. माणिकनं संस्थानात ऐतिहासिक शस्त्रागार निर्माण केलं. गुरू जुम्मादादांच्या स्मरणार्थ जुम्मादादा व्यायाम

मंदिर स्थापन करून ते भरभराटीला आणलं. हकीम अब्दुल रहीमकडून युनानी वैद्यक आत्मसात केलं. अस्थिसंधान विद्या संपादन करून अनेकांना व्याधिमुक्त केलं. म.गांधींना शरीरमर्दनाची दीक्षा दिली. प्रतापशस्त्रागार हा त्या क्षेत्रातला पहिला ग्रंथ रचला. अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ कार्यरत केलं. कुस्तीगीर तयार केले. मलखांब- पथकं उभारली. गायकवाडीला ललामभूत झालेलं हे लखलखतं माणिक , म्हणजेच लो.टिळकांनी गौरविलेले प्रोफेसर माणिकराव. त्यांचा हा शैलीसंपन्न परिचय मराठीत प्रथमच...

तपशील
ISBN : 978-81-7434-190-7
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2000
बुक कोड : L-01-2000
वजन : 315 g
पाने : 304
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2000

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">