WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Onjalitil Moti | ओंजळीतील मोती

लेखक: Prashant Hire | डॉ. प्रशांत हिरे

Original price was: ₹350.00.Current price is: ₹263.00. Save ₹87

Availability: 25 in stock

महाराष्ट्राला हिरे घराण्याची आणि हिरे घराण्याला महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, संस्कृती याची एक दीर्घ परंपरा आहे. या परंपरेनं महाराष्ट्रातील खूप मोठा भाग शंभर-सव्वाशे वर्षांपासून विधायकतेनं व्यापला आहे. मराठी माणसाला या परंपरेचा स्वाभाविकच आनंद आहे. या परंपरेला बाजूला ठेवून आधुनिक महाराष्ट्राच्या व्यापक जडणघडणीचा इतिहास कोणी लिहू शकणार नाही. याच परंपरेतील एक महत्त्वाचे

पाते म्हणजे डॉ. प्रशांत हिरे होय. केवळ राजकारणच नव्हे तर समाज, साहित्य, कला आणि संस्कृती यांना त्यांनी गच्च जोडून घेतलं आहे. या जोडलेपणातूनच ‘ओंजळीतले मोती’ हे व्यक्तिचित्रणपर पुस्तक जन्माला आले आहे. खूप वर्षांपासून प्रशांत गंभीर आणि ललित लेखन करत आहेत. मराठी साहित्यात एकेकाळी व्यक्तिचित्रणाची मोठी हुकमत होती. बराच कालखंड ही व्यक्तिचित्रणं मराठी साहित्यात झळाळत राहिली. काळाच्या ओघात अन्य काही साहित्य प्रकाराबरोबरच व्यक्तिचित्रणालाही ओहोटी लागली. अशा काळात प्रशांत हिरे यांनी लिहिलेलं महत्त्वपूर्ण व्यक्तिचित्रण वाचकांच्या हातात येत आहे. सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो. व्यक्तिचित्रणं वाचायला आवडत असली, तरी ती तशी लिहायला कठीण असतात. समाज व्यक्तींचा बनतो. एखादा माणूस समाजाला जसा घडवतो, तसा समाजही व्यक्ती घडवत असतो. आपल्या आयुष्यात कोणत्या-ना-कोणत्या कारणानं पायरव करणाऱ्या माणसांना आतून-बाहेरून समजून घेणं, आपल्या मनावर त्यांना कोरून ठेवणं आणि मग त्यांना समजून घेण्याचा, त्यांना मोठ्या समाजात सादर करण्याचा प्रयत्न होतो. माणूस तसा अनाकलनीय प्राणी. आत आणि बाहेर अशा दोन जगात जगणारा प्राणी. त्याला समजून घेण्याचा, शद्बबद्ध करण्याचा, त्याचा प्रत्येक पैलू हेरण्याचा प्रयत्न व्यक्तिचित्रण लिहिणारे करत असतात. प्रशांत हिरे यांनीही तसाच प्रयत्न केलाय. घडवून घडवून त्यांना मोती बनवलेत. अर्थात मोती बनवण्याची प्रक्रिया तर खूपच कठीण असते, पण प्रशांत हिरे यांनी त्यासाठी प्रयत्न केलाय. हे जे मोती दिसतात ते वेगवेगळ्या जीवनप्रवाहातून, घटकातून आलेले आहेत. जेव्हा या साऱ्यांची एक सुंदर माळच बनते, तेव्हा मानवी स्वभावातील विविध पैलूंचं सहज, सुंदर दर्शन घडत जातं. वाचकाला ते भावत जातं. व्यक्तीचं चित्रण म्हणजे चित्रच असतं. ते काढण्यासाठी प्रशांत हिरे यांनी अचूक आकृत्या, भावरम्य रंग वापरले आहेत. सहजता, सुलभता हा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग मानावा लागेल. वरचे, तळातले, मधले, वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज, सामान्य, अधिकारी, नट, राजकारणी, महिला, योगी-महात्मे अशा कितीतरी व्यक्तींना माळेत गुंफण्यात आले आहे. चकाकणारे, लक्षवेधी, भावणारे असे हे मोती साहित्यातही चकाकत राहतील, अशी अपेक्षा आहे. व्यक्तींच्या चित्रणासाठी वापरलेला कॅमेरा जेवढा सुंदर आहे, तेवढाच कॅमेऱ्यामागचा डोळाही सुंदर आहे. व्यक्तिचित्रणासाठी आवश्यक असणाऱ्या दोन्ही गोष्टींचा मिलाम येथे आहे. या पुस्तकाला माझ्या शुभेच्छा.

तपशील
ISBN : 978-93-90324-75-0
परिमाण : 1 cm
प्रकाशन तारीख : जून 2026
बुक कोड : F-05-2026
वजन : 260 g
पाने : 208
आर्टिस्ट : सतीश भावसार
बाईंडिंग : -
आवृत्ती : जून 2026

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">