Yuddhanantar… | युद्धानंतर…
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50
Availability: 25 in stock
आदित्य दवणे यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह. युद्ध ही एक थीम, एक विषय घेऊन ते लिहितात. खरंतर आजचा सगळा काळच अस्वस्थतेचा काळ आहे, तरी या कवीला इच्छा आहे युद्धभूमीचं नंदनवन करण्याची, इतिहासातून बोध घेत नवी पिढी घडवण्याची. माणसामाणसात पेटलेल्या आणि पेटवल्या जाणार् या युद्धानं तो अस्वस्थ होतो. संवेदनशील आणि सर्जनशील मनांवर
आलेलं दडपण त्याला जाणवत राहतं. त्याला आजच्या परिस्थितीतील दाहकता कळलेली आहे. कधी विरोधाभास दाखवून, तर कधी उपरोधाचा सूर लावून तो कळकळीनं सांगत राहतो माणसाच्या मनात पेटलेल्या युद्धांबद्दल, युद्धानं दिलेल्या एकटेपणाबद्दल, तुटलेपणाबद्दल, माणसांतल्या जनावरांबद्दल, माणसाच्या असहाय्यतेबद्दल, त्याच्यातल्या माणूसपणाबद्दल. या कवीची श्रद्धा आहे आपल्या शब्दांवर आणि त्यातल्या अर्थांवर. ते अर्थ तो नेमकेपणाने आपल्यापर्यंत पोचवतो. माणसात लपलेल्या हिंस्रतेचे अनेकविध पदर उलगडून दाखवणारा हा कवी त्याच्यातल्या माणूसपणाचेही अनेकदा दर्शन घडवतो. नीरजा
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content