Oxygen | ऑक्सिजन
₹360.00 Original price was: ₹360.00.₹270.00Current price is: ₹270.00. Save ₹90
Availability: 25 in stock
पृथ्वीवरच्या वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण असतं वीस टक्के. हे प्रमाण कायम राखण्यात वनस्पतींचा वाटा महत्त्वाचा. हे प्रमाण घसरू लागलं ! दहा टक्क्यांहूनही खाली घसरलं ! आणि जगात एकच हाहाकार माजला. या समस्येवरचा तोडगा काय ? तो शोधताना जगातील राष्ट्र दोन गटांत विभागली गेली. पंचेचाळीस प्रगत राष्ट्रांचा तोडगा होता झाडांविना जीवन. तर
वृक्षसंपदेचं रक्षण करणारा राष्ट्रसमूह म्हणत होता, 'झाडांच्या सहवासात जीवन.' या झगड्यात भारताचं धोरण काय होतं ? जागतिक पातळीवर नव्याने स्थापन झालेल्या 'श्वास मंत्रालया'तर्फे पॉडच्या माध्यमातून बंदिस्त परिसंस्थेची निर्मिती करण्याची योजन नेमकी काय होती ही योजना ? 'ग्रीन ड्रीम' संघटनेचा या योजनेला विरोध का होता ? एव्हरेस्टची वाढणारी उंची अन् ऑक्सिजनच्या पातळीतील घट यांचा एकमेकांशी,पर्यावरणबदलाशी काय संबंध ? आजची काल्पनिका उद्याचे वास्तव ठरल्याची अनेक उदाहरणे विज्ञानाच्या क्षेत्रात सापडतात. या कादंबरीतून मांडलेली कल्पनाही भविष्यातील भयकारी वास्तव ठरेल का ? पर्यावरणाच्या व्यामिश्र समस्येशी थेट भिडणारी भविष्यवेधी ही कादंबरी!
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content