WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Prakash Mujumdar | प्रकाश मुजुमदार

Prakash Mujumdar | प्रकाश मुजुमदार

प्रकाश मुजुमदार
• हे मूळचे भंडाऱ्याचे. त्यांनी बी.एस्सी.ची पदवी नागपूरच्या सायन्स कॉलेजमधून घेतली.
• पुढे त्यांनी बी.टेक. (केमिकल इंजिनीअरिंग) ची पदवी ‘लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’मधून १९६२ साली घेतली.
• सुरुवातीची काही वर्षे ‘नेपा पेपर मिल’ व ‘ऑर्डनन्स फॅक्टरी’मध्ये काम केल्यानंतर १९६७ साली ते त्रिवेंद्रमला अणुशक्ती विभागाच्या ‘अंतरिक्ष शास्त्र व प्रौद्योगिकी केंद्रात’ रुजू झाले.
• प्रणोदक अभियांत्रिकी विभागात प्रणोदक अभियंता म्हणून त्यांनी डॉ. वसंतराव गोवारीकरांबरोबर प्रणोदक विकासाच्या कार्यक्रमात अगदी प्राथमिक स्तरापासून कामाला सुरुवात केली.
• हा प्रकल्प श्रीहरीकोटा येथे संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाच्या आधारावर उभारला गेला. हा प्रणोदक निर्मिती प्रकल्प (Solid Propellant Space Booster Plant) जगातील काही मोजक्याच प्रकल्पांत गणला जातो.
• आज या प्रकल्पात तयार होणारी १२५ टनी रॉकेट मोटार (PSLV चा पहिला टप्पा) जगातील तिसरी/चौथी मोठी मोटार म्हणून गणली जाते.
• त्यांनी डॉ. अब्दुल कलामांबरोबरही प्रणोदक विकास, SLV-3 तसेच PSLVच्या कामात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
• डॉ. गोवारीकरांचे व मुजुमदारांचे प्रणोदक निर्मिती प्रकल्प आजही इस्रोच्या PSLV व GSLV प्रक्षेपण यानाच्या कार्यक्रमात बहुमोलाची कामगिरी बजावत आहेत.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">