Pushpa Bhave | पुष्पा भावे
प्रा. पुष्पा भावे
प्रा. पुष्पा भावे (माहेरच्या पुष्पा सरकार; २६ मार्च १९३९ – ३ ऑक्टोबर २०२०) या स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या, समीक्षक आणि रंगभूमीच्या भाष्यकार होत्या. साहित्य, समाज आणि राजकीय चळवळींमध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते.
मराठी आणि संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून एम.ए. पदवी प्राप्त केली.
त्यानंतर मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्या रुजू झाल्या.
दयानंद कॉलेज, म. ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले.
पुढे रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या.
त्या विद्यार्थिप्रिय मराठी प्राध्यापिका होत्या.
मराठी भाषा आणि मराठी नाटक हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते.
नाटक आणि एकूणच नाट्यसृष्टीविषयी त्यांनी विपुल लेखन केले.
अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही विशेष प्रसिद्ध झाली.
राजकीय व सामाजिक कारकीर्द
विद्यार्थिदशेपासूनच राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी त्यांचा संपर्क होता.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि गोवामुक्ती आंदोलनातील सत्याग्रहांमध्ये त्यांनी सहभाग घेतला.
स्वातंत्र्योत्तर काळातील महागाईविरोधी आंदोलनात अहिल्या रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत त्या लाटणे मोर्चात सहभागी झाल्या.
मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला त्यांनी वैचारिक मार्गदर्शन केले.
कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी झालेल्या संघर्षात त्या अग्रभागी होत्या.
स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करताना त्यांनी दलित स्त्रियांच्या संघटनांमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेतली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्या आरंभापासूनच्या कार्यकर्त्या होत्या.
डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षाचालक, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांना त्यांनी पाठिंबा दिला.
सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमातही त्या सक्रिय होत्या.
मराठवाडा विद्यापीठ नामांतर आणि मंडल आयोग यांसारख्या प्रश्नांवरील चळवळींवर त्यांच्या विचारांचा प्रभाव होता.
आणीबाणीविरोधी संपूर्ण क्रांती आंदोलनातून निर्माण झालेल्या जनता पक्षाच्या कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पदाधिकारीपद
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी
अनुवाद सुविधा केंद्र
भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अॅण्ड डेमॉक्रसी
मृणाल गोरे साऊथ एशियन सेंटर
केशव गोरे स्मारक ट्रस्ट
मेहेर संस्था
या विविध संस्था-संघटनांमध्ये पुष्पाताई पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
बाळ ठाकरे यांच्या नावाला विरोध
२०१३ सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळ ठाकरे यांचे नाव देण्याला प्रा. पुष्पा भावे यांनी उघडपणे विरोध केला होता.
साहित्य संमेलन आणि साहित्यिकांविषयी बाळ ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत त्यांनी व्यासपीठाला त्यांचे नाव देणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले.
पुस्तके
आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू
गुड मुस्लिम बॅड मुस्लिम – अनुवादित; मूळ लेखक महमूद ममदानी, सहअनुवादक मिलिंद चंपानेरकर
रंग नाटकाचे
अन्य लेखन
‘अभिरुची : ग्रामीण आणि नागर’ या गो. म. कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या पुस्तकात त्यांचा लेख आहे.
‘मराठी टीका’ या वसंत दावतर यांनी संपादित केलेल्या पुस्तकात त्यांचा लेख आहे.
‘महात्मा फुले गौरव ग्रंथा’साठीही त्यांनी लेखन केले.
पुरस्कार
समाजकार्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार
अनंतराव भालेराव स्मृती पुरस्कार
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ – २६ जून २०१८
मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार

">
Skip to content