-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreजादूटोणा, मंत्रतंत्र अन चमत्कारांच्या प्रकारातून 'वैद्यकशास्त्रा' चा जन्म झाला. माणसाच्या अस्तित्वाशीच या वैद्यकशास्त्रा' ची नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे माणसाप्रमाणेच हे शास्त्र कसं उत्क्रांत होत गेलं याचा कल्पनेहून अद्भुतरम्य इतिहास आणि आता भविष्यात त्याची दिशा काय असणार आहे, याचा वेध.
वैद्यकीयVidyakachi Yashogatha | वैद्यकाची यशोगाथा
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cart'महाराष्ट्रात महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांनी स्त्री-शिक्षणाची पायाभरणी केली. नंतरची पायरी होती स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याची, समाजास स्त्रीप्रश्नांप्रती संवेदनशील बनवण्याची. हे कार्य हाती घेतलेल्यांमध्ये विद्या बाळ यांचं नाव अग्रस्थानी आहे. प्रथम 'स्त्री' आणि नंतर 'मिळून साऱ्याजणी'चं माध्यम वापरून विद्याताईंनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली. संवाद हे विद्याताईंचं बलस्थान. न पटलेल्या रूढी-रिवाजांशी संघर्ष करणं तो मात्र पटेल अशा शब्दांत ही त्यांची खास शैली. दृढ कृतीचा आग्रह, पण भाषा मात्र अनाग्रही आणि ॠजू. पुरुषप्रधानतेस विरोध दर्शवतानासुद्धा त्या पुरुषांशी संवाद साधण्यास प्रयत्नशील असतात. म्हणून तर स्त्रीमुक्ती चळवळीतील नेमस्त पंथाचं नेतृत्व आपसूक त्यांच्याकडे जातं. पूर्णवेळ गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती हा विद्याताईंचा प्रवास म्हणजेच विद्याताई आणि..
संवादVidyatai Aani… | विद्याताई आणि…
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreअमेरिकेत राहत असलेली तन्वी. एकूण परिस्थितीविषयी असमाधानी असणारी. विकासाच्या औद्योगिक प्रतिमानाची भयानकता अनुभवणारी, अन् पर्यायांचा तोडकेपणाही जाणवणारी. पण, नेमक काय हवंय हेही उमगत नसणारी. दिशाहीन, भांबावलेली. त्याच औद्योगिक विकासाची पाठराखण करणा-या आपल्या वडिलांसमवेत सहज म्हणून ती कण्हेरवाडीत येते काय, नि दादाजींशी होणा-या चर्चांमधून शंकामुक्त होऊन, शाश्वत विकासासाठी कार्य करण्याचं ठरवून, भारतात परतण्याचा निर्णय घेते काय: सारं काही स्वप्नवतच ! आजच्या परिस्थितीविषयी असमाधानी असणा-या आणि विधायक विकासाची स्वप्नं पाहणा-या प्रत्येकाला मूलभूत वैचारिक मार्गदर्शन करणारी ही विचारकथा :
पर्यावरणVikas Swapna | विकास स्वप्न
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Read more -
Sale! Add to cartविकासा चे दोन मार्ग आहेत. पहिला आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या आधारे उत्पादन आणि उपभोग यामध्ये सातत्यानं करण्याच्या वाढीचा. ह्या अमेरिकी मार्गाचे तीन पुरस्कर्ते : सावरकर, नेहरू आणि कलाम. दुसरा मार्ग आहे, तो उत्पादन आणि उपभोग ह्यांचं मान इष्टतम ठेवून, आंतरिक विकासावर भर देणारा. ह्या आध्यात्मिक मार्गाचे चार पुरस्कर्ते : विवेकानंद, गांधी, विनोबा आणि अरविंद. पहिला मार्ग विकासा चा नाहीच. तो मानवासह सृष्टीला विनाशाकडे नेतो. त्यामुळे, भारताची वाटचाल दुसऱ्या मार्गानंच झाली पाहिजे. वरील सात जणांच्या विकासविषयक विचारांचं खंडनमंडन करत, भारताच्या भावी विकासाच्या वाटेचा शोध घेणारा; चार दशकांच्या अखंड चिंतनातून साकारलेला ग्रंथ.
समाजकारण / राजकारणVikasit Bharat – Amerikee Ki Adhyatmik | विकसित भारत – अमेरिकी की अध्यात्मिक?
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमराठीमध्ये वाङ्मयाच्या सैद्धांतिक समीक्षेचा अभाव आहे. वाङ्मयविषयक सर्व जटिल प्रश्नांची समर्पक उत्तरे देणाऱ्या आणि वाङ्मयकृतीच्या अस्तित्वाचा आणि तिच्या सर्व घटकांच्या परस्परसंबंधाचा उचित अर्थ सांगून तिच्या मूल्यमापनासंबंधीचे याेग्य निकष देणाऱ्या भूमिकेचा नव्याने शाेध घ्यावा, ही प्रेरणा मराठी समीक्षेत दिसून येत नाही. दीडशे वर्षांच्या मराठी समीक्षेच्या इतिहासात असे दाेनच प्रयत्न झाले. बा.सी. मर्ढेकरांनी सर्व ललित कलांच्या आंतररचनेसंबंधीचा आपला लयसिद्धांत मांडला. त्यानंतर लगेचच विंदा करंदीकरांनी सर्व ललित कलांमधून वाङ्मयकला बाजूला काढणारा आणि वाङ्मयकलेचे वेगळे स्वरूप अधाेरेखित करणारा ‘जीवनवेधी कले’चा सिद्धांत मांडला. मराठीत जशी मर्ढेकरांच्या लयसिद्धांताची दखल घेतली गेली, तशी करंदीकरांच्या जीवनवेधी कलेच्या सिद्धांताची घेतली गेली नाही. किंबहुना त्यांच्या वाङ्मयविषयक सैद्धांतिक भूमिकेची उपेक्षाच झाली. खरे म्हणजे करंदीकरांनी केवळ जीवनवेधी कलेचा सिद्धांतच मांडला नाही, तर त्यांनी हा सिद्धांत केंद्रस्थानी ठेवून समग्र काव्यशास्त्रच उभे केले. या पुस्तकातून सुप्रसिद्ध समीक्षक डॅा. सुधीर रसाळ यांनी पहिल्यांदाच विंदांच्या काव्यशास्त्राची सैद्धांतिक समीक्षा मांडलेली आहे.
पुरस्कार प्राप्त पुस्तकेVindanche Gadyaroop | विंदाचे गद्यरूप
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cart'माझ्या विनोबा साहित्याच्या वाचनातून एक गोष्ट मला सातत्याने जाणवत होती. ती म्हणजे गांधीजी आणि विनोबा यांच्या विचारांतील एकत्व. "विनोबांनी गांधी विचारांची शास्त्रशुध्द मांडणी केली, त्यातील विकासाच्या अनेक शक्यता दाखवून दिल्या आणि त्यापैकी काही प्रत्यक्षात आणून दाखवल्या. "गांधीचा मूळ विचार अस्पृश्यतेसंबंधी असो की स्त्रीप्रश्नासंबंधी असो, ग्रामोद्योगाबद्दल असो की सर्वोदयासंबंधी असो, विनोबांनी तो आशयघन केला, त्याला बुद्धिसंगत घाट दिला, त्यातील ऐतिहासिक विकासाचा संदर्भ स्पष्ट केला, त्याला चालू काळाशी सुसंगतता प्राप्त करून दिली आणि आपला स्वतंत्रपणा त्यात न दाखवता आपले नावही त्यात लोपवून टाकले. "सत्त्याग्रह, सर्वोदय, ग्रामदान, ग्रामस्वराज्य इत्यादी विचार गांधी-विनोबा विचार झाले. हा गांधी विचार आणि तो विनोबा विचार असे अलगअलग विचार दाखवण्याची गरजच नाही. कारण ते मुळी अलग नाहीतच. अगदी मार्क्स-एंगल्स यांच्या विचारांप्रमाणे." - प्रस्तावनेतून
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेVinoba | विनोबा भावे
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'पुण्याच्या कॉफीशॉपमध्ये जमणारा, ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा जेएफके नावाचा कलंदर ग्रुप. एका गडावरच्या भटकंतीत त्यांच्या हाती लागली एक अकल्पित खूण. आणि मग सुरू झाला रोलरकॉस्टरसारखा एक थरारक प्रवास. या प्रवासात प्राचीन, मध्ययुगीन संदर्भ आहेत; तसेच आजचे राजकीय, सामाजिक संदर्भही. आंतरराष्ट्रीय घटनांचे पडसाद आहेत. अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव, कल्पित आणि सत्य यांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवर आटयापाटया खेळणारी नाटयपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी
कादंबरीVishwasta | विश्वस्त
₹625.00Original price was: ₹625.00.₹469.00Current price is: ₹469.00. Save ₹156 Add to cart -
Sale! Add to cartया अफाट विश्वात आपण एकटेच आहोत काय ? की आपल्याला कुणी साथीदार आहेत ? आकाशगंगेत आपण एकमेवाद्वितीय आहोत ? की ती प्रगत जीवसृष्टींनी गजबजलेली आहे ? विश्वात लक्षावधी प्रगत संस्कृती असतील काय ? असतील तर त्यांचेकडून अजून संदेश का आला नाही ? जीवनाची उत्क्रांती निसर्गत: झाली आहे ? की कुण्या महाशक्तीने जीवसृष्टी निर्माण केली आहे ? फार फार पूर्वी अवकाशयात्री पृथ्वीवर आले होते काय ? त्यांनी आपल्या भेटींचे पुरावे मागे ठेवले आहेत काय ? आज शास्त्रज्ञांना पडलेल्या प्रश्नांची ही मालिका आहे. दुस-या टोकाचाही विचार आज मांडला जात आहे. आपल्या मानवजातीशिवाय या विश्वात दुसरं कुणीही नाही. आपण आहोत म्हणूनच विश्वाच्या अस्तित्वाला अर्थ आहे. परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीचा शोध व्यर्थ आहे. अंधा-या खोलीत नसलेले काळे मांजर शोधण्याचा तो प्रकार आहे. तरीही सहस्रावधी शास्त्रज्ञ प्रगत संस्कृतीच्या शोधात आज गुंतलेले आहेत. आज ना उद्या त्यांचा संदेश येईल अशी त्यांना आशा आहे. विश्वात आपण एकटेच आहोत काय ? हा ग्रंथ या मतामतांच्या गलबल्याचा एक आढावा आहे.
विज्ञानVishwat Aapan Ektech Aahot Kay | विश्वात आपण एकटेच आहोत काय?
₹110.00Original price was: ₹110.00.₹83.00Current price is: ₹83.00. Save ₹27 Add to cart -
Sale! Add to cart'विठूमाउलीऽ बापरखुमादेवीवराऽ विठोऽ विठ्ठलाऽ किती किती हाकांनी फोडलेला टाहो ! कुणी त्याला भजतात, कुणी अभ्यासतात. कुणी त्याला पाहतात, कुणी गळामिठी घेतात, कुणी समचरणी माथा टेकतात, कुणी निव्वळ मनीचा भाव पोचवतात. आणि आपल्यालाही तो वेगवेगळ्या रूपांत भेटतो. कधी सखा, कधी राजकारणी, कधी आधार देणारा, तर कधी भ्रष्टाचारी व्यवस्थेचा प्रतिनिधी बनूनसुद्धा ! सुष्टापासून दुष्टांपर्यंत, भल्यापासून बु-यापर्यंत अवघ्या चराचरात भरून राहिलेला तो - त्याचे दर्शन घडवणाऱ्या कविता विठोबा
कवितासंग्रहVithoba | विठोबा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartहे आहे स्वत:च्या निर्णयानं स्वतंत्रपणे एकल राहणा-या स्त्रीचं आत्मकथन. साध्यासुध्या मध्यमवर्गीय कुटुंबातली ही मुलगी. जीवनात लग्न तिनं गृहीत धरलेलंच होतं. तरीही एका टप्प्यावर तिनं एकल आणि स्वतंत्रही राहण्याचा निर्णय घेतला - का? कसा? तिच्या जीवनाची निरनिराळी वळणं दाखवणारं हे आत्मकथन. मुलीचं लग्न होतं, तेव्हा तिचं जीवन समूळ बदलतं; हे सर्वमान्य. पण ती एकटीनं स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेते तेव्हा? तिचं जीवन कसं बदलतं? काय होतं?
All BooksVivah Nakartana | विवाह नाकारताना
₹430.00Original price was: ₹430.00.₹323.00Current price is: ₹323.00. Save ₹107 Add to cart
">
Skip to content