-
Sale! Add to cartविज्ञान हा वर्तमानकाळाचा युगधर्म आहे. सा-या मानवी जीवनाचा तो आधारच आहे. विज्ञानाने सारे मानवी जीवन आमूलाग्र बदलले. केवळ एका विसाव्या शतकात हे साध्य झाले. एकविसावे शतक मानवी स्वरूपच बदलून टाकणार आहे. मानवाच्या उत्क्रांतीमध्येच विज्ञान हस्तक्षेप करेल. चंद्र-मंगळावर मानवी वसाहती होतील, आणि मानव सूर्यमालेबाहेर जाण्याची स्वप्ने पाहील. इंटरनेटद्वारे बुध्दिमान जागतिक मेंदू निर्माण होईल. नॅनो आणि बायो टेक्नॉलॉजी हे परवलीचे शब्द होतील. इन्फर्मेशन सुपर पॉवर्स अस्तित्वात येतील. इंटिलिजंट स्टेटस् देशातील नागरिकांना एकात्म करतील. विज्ञानावर प्रभुत्व ही एक अटीतटीची स्पर्धा होईल. विज्ञान वेध या प्रस्तुत पुस्तकात त्याची झलक दिसून येईल. भारताला मात्र या स्पर्धेत मागे राहून परवडणार नाही.
विज्ञानVidnyan Vedh | विज्ञान वेध
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreविज्ञान ही संज्ञा सर्वांना परिचयाची असते. पण तत्वज्ञान म्हटले, की अंमळ बिचकायला होते. विज्ञानाचे तत्वज्ञान ही तर भानगड पूर्णच डोक्यावरून जाते. मात्र विज्ञानालाही जे स्पष्टीकरण मागते, पेचात पकडते, प्रश्न टाकते ते विज्ञानाचे तत्वज्ञान! विज्ञान जे गृहित धरते, निष्कर्ष काढते, दावे करते, ते तर्काच्या कसोटीवर तावून सुलखून घेण्याचे काम विज्ञानाच्या तत्वज्ञानाचे!! तत्वज्ञानाचा जागल्या हा विज्ञानातील गैरसमजाचे तण दूर करून वैज्ञानिक मांडणी अधिकाधिक लख्ख करतो. सर्व वैज्ञानिकांना आधारभूत ठरणारा हा इंग्रजी भाषेतील परिचयपर लघुग्रंथ मराठीत उपलब्ध करून देत आहोत. विज्ञानजगातात तो निश्चितपणे मोलाची भर घालेल.
विज्ञानVidnyanache Tattvadnyan | विज्ञानाचे तत्वज्ञान
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Read more -
Sale! Add to cartमुलांमधे विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी छोटया-छोटया प्रयोगांमधून विषयाची मूळ संकल्पना त्यांना सहजपणे समजावी या हेतूने 'विज्ञानातील गमती-जमती' या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. विशेष करून सहा ते बारा वयोगटातील मुलांसाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
मुलांसाठीVidnyanatil Gamti Jamti | विज्ञानातील गमती-जमती
₹15.00Original price was: ₹15.00.₹11.00Current price is: ₹11.00. Save ₹4 Add to cart -
Sale! Add to cartमुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी छोट्या-छोट्या प्रयोगांमधून विषयाची मूळ संकल्पना त्यांना सहजपणे समजावी हेतूने विज्ञानातील हवेचे प्रयोग या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. विशेष करुन सहा ते बारा वयोगटातील. मुलांसाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
मुलांसाठीVidnyanatil Haveche Prayog | विज्ञानातील हवेचे प्रयोग
₹15.00Original price was: ₹15.00.₹11.00Current price is: ₹11.00. Save ₹4 Add to cart -
Sale! Add to cartबदलत्या भारताची वेगाने वाढणारी ऊर्जेची गरज अणुशक्तीच पुरी करू शकेल, असा दृढ विश्वास असणारा हा शास्त्रज्ञ. डॉ.काकोडकर हे भारताच्या अणु-कार्यक्रमाचे आघाडीचे शिलेदार. पोखरणची लष्करी अणुचाचणी असो वा नागरी वापरासाठीची विद्युत्निर्मिती, देशाच्या अणुकार्यक्रमात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. अणुविज्ञान क्षेत्रातील उच्चपदी ते केवळ योगायोगाने पोचलेले नाहीत. गेली पाच दशके अहर्निश झपाटून काम करणाऱ्या या शास्त्रज्ञाचे आवर्जून वाचलेच पाहिजे, असे चरित्र.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेVidnyanyatri – Dr. Anil Kakodkar | विज्ञानयात्री – डॉ. आनिल काकोडकर
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cart'डॉ. गोविंद स्वरूप हे भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक. कल्याण येथे प्रायोगिक रेडिओ दुर्बीण उभारून त्यांनी भारतात या शास्त्राचा श्रीगणेशा केला. पुणे जिल्ह्यामध्ये खोडद या गावी त्यांच्या पुढाकाराने रेडिओ दुर्बिणींचे संकुलच उभारण्यात आले. 'मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण' (जीएमआरटी) म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय ठरलेला आहे. भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचा लौकिक जगभर नेणारे उमदे आणि उत्साही शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचा हा परिचय.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेVidnyanyatri – Dr. Govind Swarup | विज्ञानयात्री- डॉ. गोविंद स्वरूप
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartभारतातील पाणी या महत्त्वाच्या प्रश्नावर कार्य करणारा हा शास्त्रज्ञ. विदर्भासारख्या कोरडया भागात बालपण गेलेल्या या शास्त्रज्ञाने पाण्याचे महत्त्व जाणले. त्यांनी 'जलसंपदा अभियांत्रिकी' या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेली आहे. पानशेतचे धरण फुटल्यानंतर पुण्याला पाणी पुरवण्याचा यक्षप्रश्न असो वा सध्याचा गाजत असणारा मोठी धरणे बांधण्याबाबतचा प्रश्न असो, तो सोडवण्यात डॉ. माधव चितळे यांचे योगदान असतेच. या कार्याबद्दल नोबेल पुरस्काराच्या समकक्ष असणारा 'स्टॉकहोम पुरस्कार' मिळवणाऱ्या शास्त्रज्ञाचे हे वाचनीय चरित्र.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेVidnyanyatri – Dr. Madhav Chitale | विज्ञानयात्री – डॉ. माधव चितळे
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartज्याकाळी पर्यावरणशास्त्र किंवा इकॉलॉजी हा शब्दही रूढ व्हायचा होता, त्या काळापासून निसर्गरक्षणाच्या कामात गुंतलेला हा शास्त्रज्ञ. पन्नासहून अधिक वर्षांपूर्वी अमेरिकेत जीवशास्त्र व संगणकशास्त्राचे प्रगत शिक्षण घेऊनही तिथे न राहता ते मायभूमीला परतले. महाराष्ट्रातील देवराया असोत वा भारतातील हत्तींची मोजदाद असो, व्याघ्रप्रकल्प असो वा जैवविविधता सूची असो, डॉ.माधव गाडगीळांच्या मार्गदर्शनाशिवाय हे पुरे होऊच शकले नसते. विज्ञाननिष्ठ आणि तरीही कविमनाच्या शास्त्रज्ञाचे आवर्जून वाचावे, असे चरित्र.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेVidnyanyatri – Dr. Madhav Gadgil | विज्ञानयात्री – डॉ. माधव ग़ाडगीळ
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cartकोल्हापूरसारख्या लहान शहरातून आलेल्या या शास्त्रज्ञाने ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेतले. पण इतरांसारखे तिथेच न रमता भारताच्या अग्निबाण प्रकल्पासाठी ते मायदेशी परतले. इस्रोमधील जबाबदारी, भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे सचिवपद, हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणाऱ्या गोवारीकर मॉडेलची निर्मिती, पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद, खतांच्या ज्ञानकोशाचे संपादन, लोकसंख्येच्या प्रश्नाबद्दलची वेगळी मांडणी - माणसाला आयुष्यामध्ये एवढे सारे करणे शक्य आहे, यावर हे चरित्र वाचल्याखेरीज आपला विश्वासच बसणार नाही.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेVidnyanyatri – Dr. Vasant Govarikar | विज्ञानयात्री – डॉ. वसंत गोवारीकर
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartव्यंकटेश बापूजी केतकर यांच्याबद्दल बहुतेक सुशिक्षित भारतीयांना माहिती नसते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नेपच्युन ग्रहापलीकडे परिक्रमा करीत असलेला ग्रह आणि त्याची परिक्रमा याचे भाकीत केतकर यांनी केले. केतकर ज्या समाजात वाढले, त्यातील अधिकांश घटक नवग्रह म्हणजे मानवी जीवनात ढवळाढवळ करणारे अशा अंधश्रध्देखाली वावरत होते. ह्यावरूनच केतकरांच्या विलक्षणतेची कल्पना येते व या विचारकाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होते. ती जिज्ञासापूर्ती डॉ.प्रभाकर कुंटे यांच्या चरित्रलेखनातून होते. या पुस्तकावर आधारलेला एक धडा पाठयपुस्तकात असावा म्हणजे नव्या पिढीला व्यंकटेश बापूजी केतकर हे कोण होते, याची कल्पना येईल. - जयंत नारळीकर
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेVidnyanyatri – Vyankatesh Bapuji Ketkar | विज्ञानयात्री – व्यंकटेश बापुजी केतकर
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart
">
Skip to content