-
Sale! Add to cartकलेचा प्रवास धुंद करणारा असतो. यश, कीर्ती, मान-सन्मान ही या प्रवासातली रमणीय विश्रामस्थळं असतील. परंतु प्रतिभेचा धूप जाळणारे मनस्वी कलावंत जीवनार्थाचं मंथन करण्यातच मग्न असतात. 'शुभ्र काही जीवघेणे' शोधत असतात. आपल्या प्रासादिक कलागुणांनी साहित्य, नाटय, संगीत अन् सिनेमाचा परिसर उजळून काढणारी सात कलंदर व्यक्तिमत्त्वं या पुस्तकाला रेलून उभी आहेत. प्रत्येकाचं जगणं भिन्न. प्रत्येकाच्या आयुष्यातल्या हालचाली अगदी वेगळयाच. ईर्ष्या, वासना अन् प्रेरणांची गुंतागुंत अनोखी. प्रत्येकजण म्हणजे एक स्वायत्त कलाकृतीच. परंतु प्रतिभेच्या वरदानाने आणि नितांत अस्वास्थ्याने सगळेच भारून गेलेले. 'लस्ट फॉर लाईफ'ने निथळत राहिले. 'जीवातळी आंथरितू आपुला जीवू' या आंतरिक प्रेरणेने सळसळत राहिले. यापैकी काहींना यशाने वरलं. काहींना नशीबाने हुलकावण्या दिल्या. तर काही मानभंग होऊन आडवळणाच्या शेवटाला विव्हळत राहिले. परंतु आयुष्यातल्या या चढ-उतारांमुळे यापैकी कुणाचीच प्रतिभा म्लान झाली नाही, जगण्याची रग ओसरली नाही.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेShubhra Kahi Jivaghene (Vyaktichitre) | शुभ्र काही जीवघेणे (व्यक्तिचित्रे)
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartआठवी ते एम.ए.चे विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक, मुद्रितशोधक आणि अभ्यासक ह्यांच्यासाठी मराठी शुद्धलेखनाचे सुलभ मार्गदर्शन उदाहरणांसह वैशिष्ट्यपूर्ण मांडणी विशेष पाठांसह १. सूत्रबद्ध पाठरचना २. वर्णमाला आणि शुद्धलेखन ३. जोडाक्षरे ४. स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी ५. शुद्धलेखनविषयक संकीर्ण बाबी नित्योपयोगी शब्दांचा वैशिष्ट्यपूर्ण संग्रह
भाषाविचारShuddhalekhan Margapradeep | शुद्धलेखन मार्गप्रदीप
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
भाषाविचार
Shuddhalekhan Theva Khishat | शुद्धलेखन ठेवा खिशात
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartसुनीताबाई देशपांडे आधुनिक महाराष्ट्रामधलं एक बहुचर्चित व्यक्तिमत्त्व सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका वत्सल कुटुंबिनी कर्तव्यकठोर विश्वस्त काव्यप्रेमी रसिक परखड समाज हितचिंतक आप्तेष्टांच्या आठवणींचा आणि स्वत: सुनीताबाईंच्या लेखनाचा आधार घेऊन केलेली ही स्मरणयात्रा. काही संस्मरणं नुसती रंजक नसतात, प्रेरक आणि वेगवेगळया अर्थांनी उदबोधकही ठरू शकतात. सुनीताबाई
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेShunyatun Shambharakade | शून्यातून शंभराकडे
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cart'हा प्रवास आहे सिद्धार्थचा अन् त्याच्या आई-बाबांचा. हा प्रवास सुखकर नक्की नव्हता. त्यात आशानिराशेचा लपंडाव होता, सुखदु:खाची पाठशिवणी होती, उव्दिग्नतेची खोल खाई अन् अत्यानंदाची उत्तुंग शिखरंही होती ! जिगसॉ पझल च्या खेळातून स्वत:चा शोध घेतलेल्या अन् स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळवणाऱ्या सिद्धार्थची आणि आयुष्याच्या जिगसॉ पझल ला जिद्दीनं भिडणाऱ्या त्याच्या आईबाबांची - स्मिता आणि भूषणची कहाणी... '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSiddharth | सिद्धार्थ
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartमृणालिनी चितळे यांच्या कथांत आधुनिक मध्यमवर्गीय जीवनातील स्पंदनं उमटलेली आहेत. शाळेत शिकणा-या मुलीपासून ते वृद्धाश्रमात राहणा-या वृद्धेपर्यंतच्या सर्व वयांतील व्यक्ती या कथासृष्टीत वावरतात. तीत माणसामाणसातला संघर्ष आहे. जिव्हाळाही आहे. अबोल ताण आहे. मन:पूर्वक प्रेमही आहे. मित्रमैत्रिणींच्या संवादात स्वत:च्या प्रश्नांना उत्तरं शोधणारी माणसं आहेत. हिमालयाच्या सहवासात स्वत:चं दु:ख विसरू शकणारी माणसंही आहेत. त्यांच्या सुखदु:खांचं मूळ बदलत्या आधुनिक जीवनाच्या आशाआकांक्षांमध्ये आहे. म्हणून या आजच्या काळाचा स्वर खेचून घेणा-या कथा आहेत.
कथासंग्रहSinar | सिनार
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'सिंगापूर... आग्नेय आशियाच्या नकाशातला अगदी टिकलीएवढा छोटासा देश. शेजारच्या मलेशियाच्या आधाराने जगू पाहणारा... पण त्या देशाने झिडकारल्यानंतर हताश न होता अथक प्रयत्नांची कास धरणारा... त्या सिंगापूरने सर्वांगीण प्रगतीची जी गरूडभरारी घेतली, तिची ही कथा... त्या प्रयत्नांमागे प्रेरणा होती ली क्वान यू नावाच्या एका जिद्दी पण द्रष्ट्या नेत्याची. त्या नेत्याच्या अफाट कर्तबगारीची ही कथा... भारतीयांनाही प्रेरक ठरावी अशी...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSingaporechi Navalkatha | सिंगापूरची नवलकथा (पंतप्रधान ली क्वान यू यांची चरित्रकथा)
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'कैवल्य बाइकच्या आरशात पाहत असताना डबलडेकर बसमधली मुलगी त्याला हलकेच हात दाखवते. अरे, कोण ही ? सुरू होतो एक फ्लॅशबॅक --- संगणक जमान्यातील तरुणांच्या प्रेमजीवनाची कहाणी ! कामवासनांना बेधडक व्यक्त करत प्रीतीच्या उलटसुलट धाग्यांचा शोध घेणारी ! त्यात शरीरांचा रोखठोकपणा आहे, भावनांचा हळवेपणा आहे, वस्तुस्थितीची जाणीव आहे, भासआभासांचा खेळ आहे. व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना, तरुण शरीरांची आतुरता, संगणक जमान्यात मिळणारी प्रायव्हसी यातून तरुणाईत स्त्री-पुरुष संबंध कोणती वळणे घेत आहेत, ते चित्रित करणारी कादंबरी ! '
कादंबरीSingle Mingal | सिंगल मिंगल
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartही कहाणी आहे एका आधुनिक सुश्रुताची. सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या चतुरस्र कार्याची. असंख्य कॅन्सररुग्णांवर यशस्वी उपचार करणारे, जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन शल्यचिकित्साविषयक मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया करणारे, पुणे टेक्निक' हे नवे शल्यतंत्र विकसित करणारे, ख्यातनाम सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या अनोख्या प्रवासाचा घेतलेला वेध.
All BooksSkalpel Te Skopee Te Robo | स्कालपेल ते स्कोपी ते रोबो
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartसलग सात वेळा कर्नाटक विधानसभेवर निवड, तेरा वर्षे मंत्रिपद आणि एकदा लोकसभेवर निवड अशी श्री. एम. वाय. घोरपडे यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द. `स्मरणयात्रेच्या वाटेवर' या त्यांच्या आठवणी म्हणजे संपत्ती, संधी आणि सत्ता व्यापक जनहितार्थ कशा सत्कारणी लावायच्या, याचा वस्तुपाठच! राजकारणाकडे अंत्योदयाचे साधन म्हणून बघणा-या श्री. घोरपडे यांनी आपली सारी राजकीय कारकीर्द सत्तेचे विकेंद्रीकरण, ग्रामसुधार, शिक्षण, रोजगारनिर्मिती आणि स्त्री-सक्षमीकरण यासाठी वेचली. ग्रामकेंद्री विकासाचे उद्दिष्ट साध्य व्हावे, यासाठी पंचायत राज यंत्रणेच्या संरचनेत मोलाचे योगदान दिले. सुधारित शेती प्रयोगांपासून ते अवजड उद्योगांपर्यंत आणि वन्यजीवन छायाचित्रणापासून ते लेखनापर्यंत अनेक क्षेत्रांत कार्यरत राहून श्री. घोरपडे यांनी एक संतुलित, उन्नत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आयुष्य कसे जगावे, याचे उदाहरण घालून दिले आहे. त्यांचा जीवनपट आणि आठवणी सर्वच क्षेत्रांतील तरुणांना प्रेरणादायी ठरतील. स्मरणयात्रेच्या वाटेवर
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSmaranyatrechya Vatewar | स्मरणयात्रेच्या वाटेवर
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart
">
Skip to content
