-
Sale! Add to cartSanat was sketching at home. And suddenly there was a loud noise in the kitchen Ssh ..S S .S ..Hisss ' Sanat was terrified; but his mom and dad were calm. What noise was that ? Come, along with Sanat, let's find out. The Pressure Cooker Whistled And...
All BooksThe Pressure Cooker Whistled And … | The Pressure Cooker Whistled And…
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartनाझी जर्मनी, दुसरं महायुद्ध, ज्यूंच्या छळछावण्या... ही या कादंबरीची पार्श्वभूमी. परंतु कादंबरीचा विषय मात्र हा नव्हे. मायकल बेर्ग : पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा. हाना : पस्तिशीची. नाझींच्या कुख्यात `एसएस'च्या छळछावणीतली पहारेकरी. त्यांच्यातले शारीर-प्रेम-संबंध. तरीही तिचं अचानक नाहीसं होणं. त्याची फरफट. तिचीही...! त्याचं वकिलीचं शिक्षण. आणि अचानक... आरोपी म्हणून हानाचा त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश. आणि तिचं ते गुपित अमानुष पार्श्वभूमीवरची ही मानवी कादंबरी - द रीडर
कादंबरीThe Reader | द रीडर
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cart"When you build a bridge, you build something for all times", said Joseph Strauss, the architect of the iconic Golden Gate Bridge in San Francisco. The Bandra-Worli Sea-Link holds a similar place in the life of Mumbaikars, especially the suburbanites. It is the first bridge in India to be constructed in the open sea. It is also the longest cable-stayed bridge in the country. It is an edifice of magnificence built by Indian engineers, contractors and workers with confidence and pride. It has joined the CST and the Gateway of India as an identity of Mumbai. The book tells the story of the challenges, trials and hardships faced by those who created it and brings out the satisfaction, joy and pride which they rightly feel on completion of the project.
इंग्रजी पुस्तकेThe Sea Link Story | द सी लिंक स्टोरी
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartधनेशने पोलिस व्हॅन मधेच थांबवली. बुरखाधारी आणि जगदाळे अचंबित नजरेने धनेशकडे बघत होते. इन्स्पेक्टर धनेशने निर्विकार चेह-याने खिशातल्या पिस्तुलाकडे हात नेताच जगदाळे हादरले. बुरखाधारी तर चळाचळा कापायलाच लागला. साहेब, काय करताय ? ह्या झाडीत निर्जन आडवाटेला गाडी का थांबवली तुम्ही ? तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ?'' एकावर एक प्रश्न... पण धनेशच्या चेह-यावरून त्याच्या पुढच्या चालीचा अंदाजच लागत नव्हता. त्याने पिस्तूल बुरखाधा-याच्या कनपटीवर टेकवत हातातले कागद त्याला दिले. हा अडाणी जंगली माणूस इंग्लिशमधले कागद कसे वाचणार ? साहेब हे काय करताहेत ? जगदाळेंना कळतच नव्हते. बुरखाधा-याने कागदांवर नजर टाकली अन् धनेशच्या पायांवर लोळण घेतली. नेमका आहे तरी काय हा सगळा प्रकार ? धनेशने कोणते पेपर्स त्याला दाखवले ? काय होते त्यात ? कोणत्या रहस्याचा खुलासा करणार होती ती कागदपत्रे ? धनेश अखेरीस करणारच का बुरखाधा-याचा एन्काउन्टर ? का ? काय आहे काय हे ?
All BooksThe Secret Mission | द सीक्रेट मिशन
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Sale! Add to cart'त्याच्या प्रवेशाआधी सजीवांचे होते निव्वळ गट - पशू, पक्षी, कीटक, जलचर, फळझाडे, फुलझाडे, वृक्ष, वेली... हा सारा पसारा त्यानं शिस्तीत मांडला. गटांमधल्या प्रत्येकाचं त्यानं बारसं केलं. माहीत असलेल्या सजीवांचं त्यानं केलं वर्गीकरण. प्रत्येक प्रकारच्या सजीवाला त्यानं बहाल केलं एकेक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण नाव. आणि हे नावच बनलं त्या सजीवाच्या जातीची ओळख. जीवशास्त्रानं ही वैज्ञानिक पद्धत कायमची स्वीकारली.'
इंग्रजी पुस्तकेThe Solider | द सोल्जर (इंग्रजी)
₹295.00Original price was: ₹295.00.₹221.00Current price is: ₹221.00. Save ₹74 Add to cart -
Sale! Add to cartMother Nature satisfies all her childrens' needs. She teaches us to live and let others live. Those who don't follow her rules, learn a tough lesson. The World of Flowers also learnt a lesson. How ? Read inside... The Story of Foreign Flowers
All BooksThe Story Of Foreign Flowers | The Story of Foreign Flowers
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartमहिला बचत गट. अधून-मधून कानावर येणारे शब्द. पण त्यांची सुरुवात, प्रसार, उपयुक्तता अशा तपशिलाच्या खोलात बाहेरचं फारसं कुणी जात नाही. फार फार तर चटण्या-मसाले बनवणाऱ्या बायका' एवढ्यावर बोळवण होते, किंवा बायका बायका जमून काही करताहेत, तर करू द्या,' इतपत उदारपणा दाखवला जातो! थेंबे थेंबे तळे साचे' ही म्हण तशी खूप जुनी. पण तिला नवा अर्थ दिला, तो बचत गटातल्या गरीब पण होतकरू व धडपडणाऱ्या महिलांनीच. ग्रामीण स्त्रियांनी रुपया रुपया जिवापाड वाचवून बचत गटात घातला; तर तो वाढतो, वेळेला उपयोगी पडतो आणि बाईचा आत्मसन्मानही वाढवतो... महिला बचत गटातून विधायक आर्थिक बदल घडवणाऱ्या सभासद बायका, त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या व्यक्ती-संस्था आणि शासनाच्या सकारात्मक योजना या सगळ्यांची वाटचाल जिव्हाळ्यानं पाहायचा हा प्रयत्न. महिला बचत गटांच्या प्रवासाचा नि फलितांचा लेखाजोखाच जणू !
ललित लेखनThembe…Thembe… | थेंबे… थेंबे…
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमराठी साहित्यातील कविता आणि कथा या क्षेत्रांत नीरजा यांनी स्वत:चे एक स्थान तयार केले आहे. थिजलेल्या काळाचे अवशेष' ही त्यांची पहिलीच कादंबरी, या क्षेत्रातही त्या आपला ठसा निर्माण करतील, असा विश्वास देऊन जाते. स्वातंत्र्यानंतर भारत या देशातील समाज घडवतानानिरनिराळ्या क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्तींची विवक्षित भूमिका होती. ती स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रयीला महत्त्व देणारी, विविधतेचे महत्त्व जाणून तिचा आदर करणारी आणि मानवतावादी चेहरा असणारी होती. गेल्या दशकात ही भूमिकाच बदललेली दिसते. आता ती निरनिराळ्या अस्मितांमध्ये विद्वेष निर्माण करणारी, बहुमतशाहीवादी, धर्म आणि राजकारण यांचे संयुग करू पाहणारी आणि अतिरेकी राष्ट्रवादी झाली आहे, असे जाणवते. या बदलामागची कारणे अत्यंत गुंतागुंतीची आहेत आणि मुख्य म्हणजे हा बदल लोकशाहीच्या मार्गानेच झालेला आहे. आधीच्या काळात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या तत्त्वांचा पाठपुरावा करतील अशा अनेक संस्था काढल्या होत्या. त्यातील एक होते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ - जेएनयू. १९८०च्या दशकात तिथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा एक गट या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. त्यातील नजमा ही व्यक्तिरेखा तीन दशकांनंतर त्या गटातील जगभर विखुरलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना स्वतंत्रपणे आणि शेवटी एकत्रितपणे भेटते. या भेटीत प्रत्यक्षात विशेष काहीच होत नाही. पण त्यातून नीरजा गेल्या तीन दशकांत झालेले बदल आणि त्यामागची व्यामिश्र कारणे यांची चर्चा ताकदीने मांडतात, आणि त्या अनुषंगाने घडलेली पात्रे आणि आजच्या काळातले त्यांचे जगणे आपल्यासमोर जिवंत करतात. मराठीत चर्चा-नाटकांची परंपरा आहे; निदान माझ्या माहितीत चर्चा-कादंबऱ्यांची. त्या मानाने कमी आहे. ही कादंबरी साहित्याच्या या दालनात मोठीच भर घालते. ही कादंबरी, ठोस भूमिका असूनही, अभिनिवेश टाळत, सर्वांप्रती काही किमान सहानुभूती आणि आदर बाळगत, गेल्या काही दशकांतील बदललेल्या वास्तवाबाबत व्यापक परिस्थितीभान देते, हे या कादंबरीचे सर्वात मोठे यश आहे. मकरंद साठे
All BooksThijalelya Kalache Avshesh | थिजलेल्या काळाचे अवशेष
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Read more -
Sale! Add to cart'पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांसाठी रेडी रेकनर सायबर सिक्युरिटी मेडिको मार्केटिंग शहर नियोजन संवादकौशल्य वास्तुशास्त्र बौध्दिक संपदा संरक्षण फोरेन्सिक सायन्स ग्रामीण विकास सुगंधनिर्मिती संगीतोपचार क्रीडाव्यवस्थापन टेक्निकल रायटिंग रोबोटिक्स न्यूक्लियर इंजिनियरिंग नॅनोटेक्नॉलॉजी अँनिमेशन सौंदर्यसंवर्धन फूडमॅपिंग फायरसेफ्टी या आणि अशाच इतर अनेक विद्याशाखांमधील नवनवीन अभ्यासक्रमांची संकलित माहिती.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Think Differently, Be Successful! | थिंक डिफरंटली,बी सक्सेसफुल!
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartविज्ञान हा बंडूच्या आवडीचा विषय. विज्ञान शिकताना त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. त्याच्या कल्पनाशक्तीमुळे या प्रश्नांना मनोरंजक रूप मिळते. बंडूच्या खोडकरपणा अन् मिस्किलपणामुळे त्याच्याबरोबर विज्ञानाची चर्चा करताना गंमत वाटते. वर्गात शिकवताना असंख्य शंका विचारणा-या विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक रूप म्हणजे बंडू. आजच्या विज्ञानयुगात भोवतालच्या अनेक घडामोडी, निसर्गातल्या अनेक घटना पाहताना आपल्या सा-यांच्या मनात बंडूसारखेच प्रश्न निर्माण होतात. कारण लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकामध्ये एक बंडू दडलेला असतो.
मुलांसाठीThode Vidnyan Thodi Gammat | थोडे विज्ञान थोडी गंमत
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart
">
Skip to content