The Secret Mission | द सीक्रेट मिशन
₹260.00 Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65
Availability: 25 in stock
धनेशने पोलिस व्हॅन मधेच थांबवली. बुरखाधारी आणि जगदाळे अचंबित नजरेने धनेशकडे बघत होते. इन्स्पेक्टर धनेशने निर्विकार चेह-याने खिशातल्या पिस्तुलाकडे हात नेताच जगदाळे हादरले. बुरखाधारी तर चळाचळा कापायलाच लागला. साहेब, काय करताय ? ह्या झाडीत निर्जन आडवाटेला गाडी का थांबवली तुम्ही ? तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ?'' एकावर एक प्रश्न...
पण धनेशच्या चेह-यावरून त्याच्या पुढच्या चालीचा अंदाजच लागत नव्हता. त्याने पिस्तूल बुरखाधा-याच्या कनपटीवर टेकवत हातातले कागद त्याला दिले. हा अडाणी जंगली माणूस इंग्लिशमधले कागद कसे वाचणार ? साहेब हे काय करताहेत ? जगदाळेंना कळतच नव्हते. बुरखाधा-याने कागदांवर नजर टाकली अन् धनेशच्या पायांवर लोळण घेतली. नेमका आहे तरी काय हा सगळा प्रकार ? धनेशने कोणते पेपर्स त्याला दाखवले ? काय होते त्यात ? कोणत्या रहस्याचा खुलासा करणार होती ती कागदपत्रे ? धनेश अखेरीस करणारच का बुरखाधा-याचा एन्काउन्टर ? का ? काय आहे काय हे ?
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content