-
Sale! Add to cart'पृथ्वीच्या रंगमंचावर रंगले आहे एक महानाट्य. हे नाटक सुरू झाले साडेचार अब्ज वर्षांपूर्वी, त्यावेळी झाली पृथ्वीची उत्पत्ती. या पृथ्वीतलावर चेतनसृष्टीने पदार्पण केले चार अब्ज वर्षांपूर्वी. सतत वाढता विस्कळितपणा हा जडसृष्टीचा गुणधर्म. मात्र जीवसृष्टीने या प्रवृत्तीवर मात केली, जीवसृष्टीचा हा तरू सतत वर्धिष्णू राहिला, विविधांगांनी बहरत राहिला. या महानाट्यातील आगळीवेगळी सजीव पात्रे म्हणजे रेणूंचे अत्यंत सुसंघटित सहकारी संघ. या पात्रांनी पृथ्वीच्या रंगमंचावर साकारलेले'
विज्ञानUtkranti – Ek Mahanatya | उत्क्रांती – एक महानाट्य
₹800.00Original price was: ₹800.00.₹600.00Current price is: ₹600.00. Save ₹200 Add to cart -
Sale! Add to cartचार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिध्दांत मांडला दीडशे वर्षांपूर्वी. अनेक सूक्ष्म निरीक्षणे, विविध तपशीलवार नोंदी आणि या सा-यांची तर्कशुध्द गुंफण यांच्या वैज्ञानिक बैठकीवर रचलेला हा सिध्दांत. डार्विनच्या जन्माच्या द्विशताब्दीवर्षात उत्क्रांती सिध्दांताच्या विकासाचा वेध घेणारे उत्क्रांती
विज्ञानUtkranti | उत्क्रांती
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
Sale! Add to cartही अक्षरं नाहीत हे शब्द नाहीत या कविता नाहीत मौनातून उसळून मौनात विसर्जित होण्यापूर्वी मध्यसीमेवर अस्तित्वभान देत निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची स्मारकं आहेत ही उभ्या आडव्या रेषा काही बिंदू, काही वळणं आणि बरंचसं अवकाश यांनी घडवलेली !
कवितासंग्रहUttarardha | उत्तरार्ध
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartसाहित्यापासून संगीतापर्यंत, छायाचित्रणापासून अभिनयदर्शनापर्यंत, समाजकारणापासून राजकारणापर्यंत, कलाक्षेत्रापासून क्रीडांगणापर्यंत, इतिहाससंशोधनापासून भविष्यवेधापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये अजोड कर्तृत्व गाजवलेल्या नामवंतांना आपल्या भेटीला घेऊन येत आहेत सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ. या नामवंतांशी भरभरून मारलेल्या गप्पांमधून उलगडत जाणारं त्यांचं जीवन अन् कार्य म्हणजे उत्तुंग भाग १ व २
All BooksUttunga : Part 1 | उत्तुंग भाग १
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे दुसऱ्या माध्यमातील सर्जनप्रक्रियेत गवसणे हा अत्यंत विरळा असा अनुभव त्यांना आला. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणाऱ्या या आत्मकथनातून आपल्यालाही त्यामुळे अंतर्मुख करणारा अस्सल वाचनानुभव मिळतो. प्रफुल्ल शिलेदार
All BooksUttunga : Part 2 | उत्तुंग भाग २
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartहॅम्लेट - "बोलण्यात नेमस्तपणा ठेवला म्हणजे भाषण चित्तवेधक होते. पुष्कळदा कर्कश नट क्यें करून जेव्हां ओरडतात, तेव्हां माझ्या पायाची आग मस्तकात चढते. असल्या मूर्खपणाने रस उत्पन्न न होता भाषणाच्या चिंधडयान् चिंधडया होतात. "पण, त्राटिकेचा सूर काढू नको असे म्हटले म्हणून आपला तोंडतल्या तोंडात मुळमुळ करीत बसशील. पण तेही उपयोगाचे नाही. या कामात ज्याची त्याने अक्कल खर्चिली पाहिजे; पढवून किती येणार ? भाषण आणि अभिनय ही एकमेकांना जुळून चालली पाहिजेत. "हजारो अरसिक प्रेक्षकांनी टाळी दिली, पण सहृदय प्रेक्षकांपैकी एकाने जरी नाक मुरडले, तरी सर्व खेळावर पाणी पडले असे तुम्ही मानले पाहिजे. असे कित्येक नाटकवाले आहेत की, ज्यांची अरसिक व मूर्ख लोक पराकाष्ठेची वाखाणणी करीत असतात, पण त्यांच्यात गुण म्हणाल तर काडीचा देखील नसतो. हे बेटे मनुष्यस्वभावाची इतकी खराब बतावणी करतात की, त्यामुळे मला कधी कधी वाटते की, या लोकांना आमच्या नेहमीच्या ब्रह्मदेवाने घडविलेले नसावे, तर त्यांच्याकरिता कोणी तरी भाडोत्री ब्रह्मदेव धरून आणला असावा." - शेक्स्पिअर (भाषांतर : गोपाळ गणेश आगरकर) इ. स. १८८३
कलाविचारVachik Abhinay | वाचिक अभिनय
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartवाद्यांच्या विविधरंगी विश्र्वाचे आणि भारतीय संगीतसंस्कृतीचे अनोखे दर्शन घडवणारे वाद्यवेध आणि भारतीय संगीताची मूलतत्त्वे
संगीतVadyavedh | अलख
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartरोजच्या वापरात वारंवार भेटणारे अनेक शब्द. दैनंदिन संभाषणात हरघडी बोलावी लागणारी अनेक वाक्ये. अशा आवश्यक आणि उपयुक्त अकराशे नोंदी असलेला- विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या साऱ्यांना इंग्रजी भाषेच्या व्यावहारिक वापरासाठी सुबोध मार्गदर्शक ठरणारा- मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोश. जेव्हा नेमके शब्द हरवतात तेव्हा संवाद अडखळतो. हा संवाद सोप्या अर्थवाही वाक्यांतून उलगडून देणारा वाक्यकोश. त्याची तोंडओळख करून देणारी काही वाक्ये : गाडी एखाद-दोन मिनिटांत येईल अशी आशा आहे. I Hope the train comes ( will come) in a couple of minutes. तुला भेटावे असे गेले चार दिवस मनात येत आहे. I Have been meaning to meet you for the last four days. तिने टीव्ही चालू केला व ती कार्यक्रम पाहू लागली. She turned/switched the TV on and started watching programmes. 'तू किती संगणक विकलेस' ? 'एकही नाही'. How many computers did you sell ? None. विमलचा सध्या लग्न करण्याचा बेत नाही. Vimal has no plans to get married at present. तिने जेमतेम गाडी पकडली. She only just caught train.
कोशवाड्मयVakyakosh – Part 1 | वाक्यकोश – भाग १
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cart'मराठी भाषेला अपरिचित असलेली phrasal verb ही संकल्पना इंग्रजी भाषेचे भूषणभूत वैशिष्टय आहे. एखाद्या क्रियापदासोबत एखादे शब्दयोगी अव्यय किंवा एखादे क्रियाविशेषण किंवा एकाच वेळी ही दोन्ही अव्यये वापरल्याने जे एक बहुपदी क्रियापद अस्तित्वात येते त्याला इंग्रजीत phrasal verb म्हणतात. ते एक स्वतंत्र क्रियापद असून अर्थदृष्टया मूळ क्रियापदाहून वेगळे असते. उदाहरणार्थ, १. Come म्हणजे येणे, पण come about म्हणजे होणे किंवा घडून येणे. मसुद्यात इतक्या चुका कशा झाल्या ते लिपिक सांगू शकला नाही. The clerk couldn t tell how so many mistakes came about in the draft. २. Get म्हणजे मिळणे किंवा मिळवणे, पण get back म्हणजे(विशेषे-करून स्वत:च्या घरी) परत येणे. ती काल रात्री खूप उशिरा (घरी) परत आली. She got back very late last night. ३. Give म्हणजे देणे, पण give out म्हणजे संपुष्टात येणे, संपणे. आपला धान्यसाठा दोन आठवडयानंतर संपेल. Our food supplies will give out after two weeks. ४. Go म्हणजे जाणे, पण go-down म्हणजे किमती वगैरे उतरणे किंवा कमी होणे. तयार कपडयांच्या किमती गेल्या महिन्यात अचानकपणे उतरल्या. The prices of ready-made clothes (or garments) suddenly went down last month. ५. Hang म्हणजे टांगणे, पण hang back म्हणजे इतर सगळे निघून गेल्यावर मागे थांबून राहणे. सभा संपल्यावर अध्यक्षांना प्रश्न विचारण्यासाठी ती मागे थांबून राहिली. After the meeting, she hung back to ask the chairman a question. प्रत्येक phrasal verb मधील घटक एकमेकांशी सहयोग करून एक नवीन क्रियापद सिध्द करतात. म्हणनूच इंग्रजीतील phrasal verb ह्या संकल्पनेसाठी मराठीत सहयोगी क्रियापद हा प्रतिशब्द वापरला आहे. प्रस्तुत कोशात पाच हजारांहून अधिक सहयोगी क्रियापदांचा समावेश केला असून त्यांच्या स्पष्टीकरणासाठी मराठी वाक्ये रचून त्यांची इंग्रजी भाषांतरे सादर केली आहेत. सहयोगी क्रियापदे भौतिक घटनांची तसेच मनुष्याच्या अगणित कृतींची व अनुभवांची अभिव्यक्ती अचूकपणे व प्रभावीपणे करतात. ह्यातच त्यांची उपयुक्तता सामावलेली आहे.
कोशवाड्मयVakyakosh – Part 2 | वाक्यकोश – भाग 2
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cart'शब्दयोगी अव्यय म्हणजेच 'Preposition'. वाक्यातल्या मागच्या-पुढच्या शब्दांना ही अव्यये जोडतात. पण तरीही 'above' किंवा 'over' कधी वापरायचं, 'in' आणि 'into' मधला नेमका फरक काय, हे प्रश्न मनाला पडतातच. इंग्रजी भाषेत एकूण 179 शब्दयोगी अव्यये आहेत. अर्थाच्या सूक्ष्म आणि चमत्कृतिपूर्ण छटा व्यक्त करण्याची या अव्ययांची क्षमता केवळ अफाट आहे. हे सगळे कॅलिडोस्कोपिक कंगोरे या विस्तृत कोशात आहेत. या Prepositions चा अभ्यास केला, तर निर्दोष आणि सहजसुंदर इंग्रजी साध्य होईल. यासाठी हे नमुने पाहा. 1. माझ्या पाठीत दुखत होते. I had a pain across my back. 2. तो विक्रम कोणी केला ? Who was that record by ? 3. तिने केसांचा अंबाडा घातला होता. She was wearing her hair in a bun. 4. कपाचा कान तुटला आहे. The handle on the cup is broken. 5. मी ती कादंबरी दिवाळीच्या सुट्टीत वाचली. I read that novel over the Diwali holidays.
कोशवाड्मयVakyakosh – Part 3 | वाक्यकोश – भाग ३
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart
">
Skip to content