-
Sale! Add to cartपोथीनिष्ठ समाजवाद ना देशाचे दैन्य दूर करू शकत, ना देशबांधवांचे दारिद्र्य नाहीसे करू शकत. हवे आहे ते निखळ व्यवहारज्ञान. मांजर काळे की गोरे यावर काथ्याकूट करीत बसण्यापेक्षा ते उंदीर फस्त करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ! असा दृष्टिकोन ठेवून आधुनिक चीनची भक्कम उभारणी करणाऱ्या नेत्याचे - देंग झियाओपिंग यांचे हे चरित्र. साम्यवादी पक्षातली त्यांची जडणघडण, त्यांनी पार पाडलेल्या विविध जबाबदाऱ्या, त्यांना वैयक्तिक जीवनात आणि सार्वजनिक कारकिर्दीत सोसाव्या लागलेल्या व्यथावेदना, त्यांनी देशहित समोर ठेवून घेतलेले निर्णय व केलेल्या तडजोडी आणि अखेरीस समृद्ध, समर्थ चीनच्या रूपात त्यांनी मागे ठेवलेला वारसा... या साऱ्यांचे हे माहितीपूर्ण चित्रण.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDeng Xioping – Adhunik Chincha Shilpakar | देंग झियाओपिंग – आधुनिक चीनचा शिल्पकार
₹320.00Original price was: ₹320.00.₹240.00Current price is: ₹240.00. Save ₹80 Add to cart -
Sale! Add to cart'अकिरा कुरोसावासारखा प्रतिभावान दिग्दर्शक, अनेक पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी, जीवशास्त्रज्ञ, अभ्यासक आणि जगभरचे असंख्य वाचक या साऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरलेले विलक्षण पुस्तक.
कलाविचारDersu Uzala Vladimir Arseniv | देरसू उझाला
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreपन्नास वर्षांहूनही अधिक काळ अडवाणीजी माझे मित्र आणि निकटवर्ती सहकारी राहिले आहेत. राष्ट्रवादावरील अतूट श्रध्देशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही आणि तरीही वेळोवेळी उदभवणा-या परिस्थितीच्या गरजेनुसार राजकीय प्रतिसाद देताना आवश्यक ती लवचीकतासुध्दा त्यांनी दाखवली आहे. माझी अशी खात्री आहे की, देश माझा, मी देशाचा या त्यांच्या पुस्तकाला मोठया संख्येने वाचक मिळतील; कारण त्यात एका संवेदनशील माणसाच्या लक्षवेधी जीवनप्रवासाचे प्रतिबिंब पडले आहे... आणि अशा एका लोकविलक्षण नेत्याचेही की, ज्याच्या कारकिर्दीचा सर्वोत्तम टप्पा माझ्या अपेक्षेप्रमाणे अजूनही यायचा आहे. तो लवकरच यावा, अशी माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे ! - भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDesh Maza, Mi Deshacha | देश माझा, मी देशाचा
₹700.00Original price was: ₹700.00.₹525.00Current price is: ₹525.00. Save ₹175 Read more -
Sale! Add to cart'डॉ नीलिमा गुंडी यांचा देठ जगण्याचा हा ललित लेखसंग्रह म्हणजे लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वाचा सहज स्पर्श लाभलेले लेखन आहे हे लेखन आठवणी, अनुभव,वाचन आणि निरीक्षण यांचा मेळ साधत फुलले आहे. त्यामुळे हे पुस्तक एकीकडे आत्मपर लेखनातील काव्यात्मता जपते आणि त्याचवेळी भोवतालच्या विश्वाशी कधी सौहार्दपूर्ण नाते राखते, तर कधी मिश्कीलपणे बदलांना सामोरे जाते. संवेदना, भावना आणि चिंतन यांची एकात्म गुंफण साधत आकाराला आलेले यातील लेख अर्थपूर्ण शब्दांच्या आधारे जगण्याचा देठ तोलून धरण्यात यशस्वी ठरतात व्यक्तिगत भावानुभवांइतकेच निसर्ग, बालमन आणि भाषा-संस्कृती हे देखील लेखिकेचे आस्थाविषय असल्यामुळे यातील सर्वच लेख वाचकांशी संवाद साधू शकतील, असे आहेत आशयानुरुप बदलणारी यातील भाषाशैली हा या पुस्तकाचा एक लोभस विशेष आहे.
ललित लेखनDeth Jagnyacha | देठ जगण्याचा
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cart'ज्यांना आपण श्रध्दांजली वाहतो, त्या व्यक्ती केवळ सर्वगुणसंपन्न होत्या, असा आदर्श मागे झाला नाही, पुढे होणं शक्य नाही - अशासारखं लिहिणं शक्य आहे; पण मला ही केवळ व्यक्तिपूजा वाटते... कदाचित ऐन तिशीमध्ये मी तसं लिहू शकलो असतो किंवा तशा प्रकारचं लिहिलंही असेल. आता या वयाला केवळ भावप्रचुर लिहिणं मानवत नाही आणि उपयुक्तही वाटत नाही. काहीतरी पूर्णांशानं खरं असलेलं आपण लिहू या, त्यामध्ये कार्याची हानी होणार नाही अशी अवश्य काळजी घेऊ या. पण तरीसुध्दा शक्य तितकं यथातथ्य लिहू या, केवळ भावनाप्रधान लिहायला नको, असं मला वाटतं. - आप्पा पेंडसे (एका पत्रातून)
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDevache Ladke | देवाचे लाडके
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartगायनाचार्य भास्करबुवा बखले (१८६९–१९२२) * उन्नीसवीं शताब्दी में अपनी कला एवं तपस्या से अखिल भारत में (सिंध-पंजाब तक) ख्यातिप्राप्त गायक। * विद्यासाधना के अत्यंत कठिनतम उस कालखंड में अपने अपूर्व त्याग और सेवा के बल पर गायन कला में सफलकाम शिष्योत्तम। * विद्यादान एवं शिष्यनिष्पादन में औघ़डदानी आदर्श गुरु। * मास्टर कृष्णराव और बालगंधर्व जैसे देदीप्यमान शिष्यों के द्वारा कालपट पर अपनी मुद्रा अंकित करनेवाले आचार्य। * मराठी नाट्यसंगीत को नवसंजीवन देकर मराठी नाट्यसंगीत में युगांतर लानेवाले संगीतकार। * शील, शालीनता, सद्भाव तथा अपरिग्रह से मंडित अध्यात्मप्रवण व्यक्तित्व। * मात्र ५२ वर्ष की आयु में ही अपने अभूतपूर्व कर्तृत्व से अद्यावधि कीर्तिमान कलाकार। * स्वरों की जीवंतता, रागों का सच्चा रूप और ताल-लय का लालित्य जिनके गायन में मुखर हो उठता था ऐसे श्रेष्ठ गानपंडित। * ‘देवगंधर्व’ जीवन गाथा में उपर्युक्त समूचे पहलू औपन्यासिक ललित शेली में रसरंजक बनते हुए रेखांकित हुए हैं।
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDevagandharva (Hindi) | देवगंधर्व (हिंदी)
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartअशी सहजच नाही फुलली माझी कविता सगळी पानझड सोसावी लागली तिला कुरूप वाटावे अस्तित् वच अवघे इतके निष् पर्णही व् हावे लागले तिला अंत:करणातली सल तिने मूकपणे सोसली विजनवासात ती निमूट राहिली आर्ततेच् या खोल मातीत ती आपसूक रुजली दु:खाच् या बोडक् या फांदीवर मग गाभ् यातून उमलली सोसल् या तिने थंडपणे तप् त उन् हाच् या झळा अथांग अंधारात वावरताना सृजनाच् याही कळा आनंदमयी केला तिने वेदनेचा हुंकार आशावादी राहिली ती पचवताना नकार भावनांच् या दुष् काळातही एकेक हिरवी काडी शोधून विणलेला, बाभळीवरला खोपा माझी कविता म् हणजे डोंगरकपाऱ्यातून, ग्रीष् मकाहिली सोसून, फुलणारा एकला देवचाफा. देवचाफ्याच्या फुलासारख्या शुभ्र, नितळ, नाजूक अन् निरागस नजरेनं भावविश्व न्याहाळणाऱ्या - मनातल्या सच्च्या भावनांना प्राणस्वर बनवून शब्दांच्या ताटव्यांत फुलवणाऱ्या - अंतर्नादाचे आर्त सूर साकारणाऱ्या अंतर्मनाच्या तारा छेडणाऱ्या कविता.
All BooksDevchapha | देवचाफा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartभास्कररावांच्या ऐन उमेदीत, निरनिराळ्या प्रसिध्द घराण्यातील अनेक गवई उत्तरेकडून दक्षिणेस आले होते. त्या प्रत्येकामध्ये काही विशेष गुण होते यात संशय नाही. कोणामध्ये तानेची, कल्पनातीत तयारी, कोणामध्ये गळ्याची मनस्वी माधुरी, कोणामध्ये आलापाचे सौंदर्य, तर कोणामध्ये तालाचा अजस्त्र खटाटोप दिसून येई. परंतु स्वराचा जिवंतपणा, रागाचा सच्चेपणा व तालाचे लालित्य हे तिन्ही गुण सारख्या उत्कर्षाला पोहोचलेले गुरूवर्य भास्कररावांप्रमाणे क्वचित् कोणा गायकाच्या अंगी दिसून येत असत. सबंध शतकात असा एकच पुरूष निर्माण होतो, असे त्यांच्याविषयी कोणाही म्हणावे एवढी त्यांची थोरवी होती. गोविंदराव टेंबे पंजाबात अजूनही ऐकायला मिळतं की, भास्करबुवांचं गाणं झालं की असं वाटायचं की, दुसरं गाणं ऐकू नये, हेच ऐकावं. हे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटण्यासारखं आहे.... त्यांनी रंगभूमीच्या माध्यामातून शास्त्रोक्त संगीताचा खूप प्रचार केला. अजूनही पुष्कळ लोकांना यमन राग ओळखता येत नाही. पण यमन म्हटलं की हे नाथ हा माझा सारखं आहे, हे त्यांना ओळखता येतं. पं.भीमसेन जोशी अशी ही देवगंधर्वांची चरित्र मैफल.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDevgandharva | देवगंधर्व
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartस्वप्नं पाहायला कुणी शिकवावं लागत नाही. तरुणाई स्वप्नाळू असतेच मुळी. पण स्वप्नं सहजासहजी साकार होत नाहीत. ती कठोर परीक्षा घेतात आणि कोणतीही दयामाया न दाखवता अनेकांना अपयशाचे रट्टे देतात. साहजिकच पदरी निराशा येते. पुढची वाट दिसेनाशी होते. काय करावं, कुठे जावं... काही कळत नाही. मार्गदर्शक मित्र भेटत नाही... अशा असंख्य तरुणांना थोरल्या भावाच्या नात्यानं धीर देणा-या, उठून उभं राहण्यासाठी हात देणा-या आणि स्वप्नं साकार करण्यासाठी नेमकी कोणती साधना कशी नि केव्हा करायची, हेही समजावून सांगणा-या एका तरुणाचं हे बावनकशी लखलखतं आत्मकथन... एकेकाळी रस्त्यावरचं शेण वेचून गोवऱ्या रचणारा तो गरीब ग्रामीण युवक आज एक यशस्वी उच्चपदस्थ सनदी अधिकारी आहे. पण स्वत:च्या यशाच्या धुंदीत तो बांधवांना विसरलेला नाही. भेटतील त्या सा-यांना प्रेरणेचे दिवे आंदण देत तो सांगतोय - नवं ताजं अनुभवामृत. आजच्या अन् उद्याच्या तरुणाईसाठी... '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDhadpadnarya Tarunaisathi | धडपडणा-या तरुणाईसाठी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
मुलांसाठी
Dhagatun Gadgadat | ढगातून गडगडत
₹10.00Original price was: ₹10.00.₹8.00Current price is: ₹8.00. Save ₹2 Add to cart
">
Skip to content
