-
Sale! Add to cart'स्त्रियांसाठी योगासने ही पुरुषांसाठी करण्याच्या योगासनांपेक्षा फार वेगळी नाहीत. मुले, संसार, जेवणखाण इत्यादी सांभाळून कामावर जाणाऱ्या स्त्रियांना एकावेळी ४० मिनिटे एवढा मोकळा वेळ मिळणे कठीण असते. कामाच्या जागेवर, प्रवास करताना, घरात बसल्या बसल्या योगासनातील स्नायूंचे आकुंचन आणि शिथिलीकरण, स्नायू व बंध यांना मिळणारे तणाव, श्वसनाकडे लक्ष दिल्याने होणारा एकाग्रतेचा सराव, पाठीच्या, मानेच्या, खुब्याच्या स्नायूचा 'टोन' वाढवणे या हेतूने सर्व स्त्रिया साधी आसने दिवसभर करू शकतात. अशा प्रकारे आपली निरामयता कमावू शकतात, टिकवू शकतात, अशी योगासने हे प्रत्येक स्त्रीला एक वरदानच आहे. -- डॉ. ह. वि. सरदेसाई
वैद्यकीयYog Tuza Ghadava | योग तुझा घडावा
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartशत्रूच्या सैनिकांना ठार मारण्यासाठी माणसं किंवा बंदुकाच लागतात, असं थोडंच आहे! अदृश्य जीवजंतू किंवा निर्जीव रसायनंसुध्दा त्यासाठी पुरेशी ठरतात, असं विज्ञान सांगतं. आता तर हे तंत्रज्ञान ही फक्त काही देशांचीच मक्तेदारी राहिलेली नसून दहशतवादी संघटनांच्याही आवाक्यात ते तंत्रज्ञान आलंय. आपल्यासारख्या निरपराध नागरिकांसमोर कोणतं मरण केव्हा आणि कसं उभं ठाकेल, काहीही सांगता येत नाही, येणार नाही. त्या महाभयानक संघर्षाची खडानखडा बित्तंबातमी आपल्यासमोर मांडणारं खळबळजनक पुस्तक
इतिहासYuddha Jeevanche | युध्द जिवांचे
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartसरधोपटता वजा केली, की तुम्हाला थोडं अधिक चांगलं लिहिता येऊ शकतं, हे नोरा एफ्रॉन या विदुषीचं तत्त्वज्ञान कविता महाजन यांनी त्यांच्या कथात्म लेखनकाळातच ओळखलं होतं. अकथनात्मक लेखन, अनुवादासाठी देशाच्या कानाकोपर् यातील लेखक-लेखिकांचं वाचन, संपादन या सर्व बाबींमुळे त्यांच्या लेखणीला धार आलेली दिसते. रा. भि. जोशींच्या प्रवासलेखनकुळाशी बरंचसं जवळचं नातं सांगणार् या घुमक्कडी' या पुस्तकामध्येही आहे प्रवासाच्या गोष्टी आणि गोष्टींचा प्रवास. तो किती खोलवर आहे, याचा अंदाज यातील कोणताही लेख वाचल्यानंतर उमजून येईल. पृथ्वीची उत्पत्ती, सूर्याची, अग्नीची, पावसाची इतकंच नाही, तर मिठाची उत्पत्ती याबद्दलच्या लोककथांचा प्रवास कविता महाजनांच्या प्रवासाशी एकरूप होऊन रूढार्थानं प्रवासवर्णन नसलेलं एक अचंबित करणारं पुस्तक तयार झालंय. ब्लॉगसाठी लिहिल्या गेलेल्या या प्रवासनोंदी, पण अत्यंत गंभीर आणि अनंत तपशिलांना कवेत घेणार् या.
All BooksYuddha Nakarnare Jag | युद्ध नाकारणारे जग
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartआदित्य दवणे यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह. युद्ध ही एक थीम, एक विषय घेऊन ते लिहितात. खरंतर आजचा सगळा काळच अस्वस्थतेचा काळ आहे, तरी या कवीला इच्छा आहे युद्धभूमीचं नंदनवन करण्याची, इतिहासातून बोध घेत नवी पिढी घडवण्याची. माणसामाणसात पेटलेल्या आणि पेटवल्या जाणार् या युद्धानं तो अस्वस्थ होतो. संवेदनशील आणि सर्जनशील मनांवर आलेलं दडपण त्याला जाणवत राहतं. त्याला आजच्या परिस्थितीतील दाहकता कळलेली आहे. कधी विरोधाभास दाखवून, तर कधी उपरोधाचा सूर लावून तो कळकळीनं सांगत राहतो माणसाच्या मनात पेटलेल्या युद्धांबद्दल, युद्धानं दिलेल्या एकटेपणाबद्दल, तुटलेपणाबद्दल, माणसांतल्या जनावरांबद्दल, माणसाच्या असहाय्यतेबद्दल, त्याच्यातल्या माणूसपणाबद्दल. या कवीची श्रद्धा आहे आपल्या शब्दांवर आणि त्यातल्या अर्थांवर. ते अर्थ तो नेमकेपणाने आपल्यापर्यंत पोचवतो. माणसात लपलेल्या हिंस्रतेचे अनेकविध पदर उलगडून दाखवणारा हा कवी त्याच्यातल्या माणूसपणाचेही अनेकदा दर्शन घडवतो. नीरजा
All BooksYuddhanantar… | युद्धानंतर…
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreयुगांतर सहस्रकाच्या उंबरठयावर आज एक नवी औद्योगिक क्रांती वेगाने आकार घेते आहे. ही आहे सौम्य औद्योगिक क्रांती. कारण औद्योगिक युगातले अनेक जाच, काच व ताप सौम्य करत नेण्याची गुंजाइश तिच्यात आहे. अभूतपूर्व अशा सार्वत्रिक संपर्कशक्तीमुळे आता ग्राहक-उत्पादक थेट संबंध तसेच पारदर्शक व सहभागी निर्णयप्रक्रिया शक्य होत आहे व ही निर्णयप्रक्रिया आंधळया बाजारपेठेच्या व बधीर नोकरशाहीच्या पलीकडे नेणारी असेल. बहुउत्पादक आणि तरीही अल्पभांडवली तंत्रामुळे आता श्रमिकच ग्राहकोत्पादक बनू शकेल. समतेच्या नावाखाली सर्वांना नोकर बनवून टाकणा-या समाजसत्तावादाचे स्वप्न आता विरले आहे. आता स्वप्न आहे ते सर्वोद्योजक समाजाचे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि योगदानात्मक न्याय अबाधित ठेवून सामाजिक सुरक्षा जाळे विणण्याचे. आजच्या इतिहासाची नव्या नजरेने आर्थिक-राजकीय-नैतिक व रीतीविषयक मीमांसा करणारे कालचे दुराग्रह झटकून टाकून उद्याचे भविष्य वाचणारे युगांतर
समाजकारण / राजकारणYugantar (Sugam Saransh) | युगांतर (सुगम सारांश)
₹25.00Original price was: ₹25.00.₹19.00Current price is: ₹19.00. Save ₹6 Read more -
Sale! Add to cartदेशाला गौरव मिळवून देणारा खेळाडू असो वा विरोधी पक्षनेता, तुटक वृत्तीचा शेजारी असो वा धडधडत्या मनानं मुलाखत घेणारा पत्रकार-वेगवेगळ्या निमित्तांनी नेल्सन मंडेलांशी थेट संर्पकात आलेल्या सर्वांचा अनुभव एकच- मंडेलांच्या नेतृत्वाला शब्दांपलीकडच्या महानतेचं कोंदण आहे ! भेटणा-या प्रत्येकाचं मन निखळ, निर्व्याज वृत्तीनं जिंकणं आणि अनायासच त्याला जन्मभर पुरणा-या स्फूर्तीनं भारून टाकणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सहजसुंदर वैशिष्टय! मंडेलांचे स्वभावगुण आणि त्यांच्या बावनकशी नेतृत्वशैलीतून खूप काही शिकण्यासारखं आहे, यांत्रिकपणे जगताना माणूसपणाचा विसर पडलेल्या तुम्हा-आम्हा सर्वांना सहजगत्या जागं करणारं हे पुस्तक ज्याला कुठल्याही क्षेत्रात अनुयायांचं परिवर्तन मनुष्य बळात करायचं आहे अशा नेत्याला मार्ग दाखवणारं आहे. आदर्श नेतेपणाचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या नेल्सन मंडेलांचे गुण असामान्य असूनही अनुकरणीयतेच्या कक्षांपलीकडचे नाहीत. माणूस म्हणून अंगी असलेल्या गुणांनीच मंडेलांना जागतिक पातळीवरच्या नेतृत्वात सर्वोच्च स्थान कसं मिळवून दिलं आहे हे विविधांगानं दाखवून देणा-या या गोष्टी मनाला नक्कीच भावणा-या आहेत. प्रथमदर्शनी साध्या-सरळ वाटणा-या या गोष्टींमध्ये लहानथोर वाचकांना उदात्ततेकडे नेण्याची अमोघ शक्ति आहे. यू.आर. अनंतमूर्ति
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेYugpurushi Netrutva : Nelsan Mandela | युगपुरुषी नेतृत्व : नेल्सन मंडेला
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartएखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वामधले खरोखरोचे असामान्य गुण स्पष्ट दिसायला हवे असतील तर अनेक वर्षं त्या व्यक्तिच्या कामाचं निरीक्षण करण्याचं सौभाग्य लाभावं लागतं. पानाफुलांवर, पशुपक्ष्यांवर, जमिनीवर आणि माथ्यावरील आकाशावर अबोल प्रेम करणा-या एका विलक्षण माणसाची ही कथा आहे. जाँ जिओनो यांच्या या चिमुकल्या कथेनं जगभराच्या लहान-थोर वाचकांवर मोहीनी घातलेली आहे.
मुलांसाठीZada Lavnara Manus | झाडं लावणारा माणूस
₹75.00Original price was: ₹75.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹19 Add to cart -
Sale! Add to cart'तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणाऱ्या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कादंबरी.
कादंबरीZadazadti | झाडाझडती
₹525.00Original price was: ₹525.00.₹394.00Current price is: ₹394.00. Save ₹131 Add to cart -
Sale! Add to cartअजिंक्य मोहिते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी छोट्या गावातून मोठ्या शहरात आलेला तरुण. शहरातल्या प्रसिद्ध कृषिमहाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून पदवी प्राप्त करेपर्यंतचा अजिंक्यचा प्रवास. त्या प्रवासात त्याला भेटलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या व्यक्तिरेखा. प्रत्यक्ष जीवनाशी सांधेजोड नसलेली आपली वर्तमान शिक्षणपद्धती आणि तिचे वेगवेगळे भलेबुरे पैलू. अजिंक्यच्या रोजच्या आयुष्याला अन् त्यातील लहानमोठ्या घटनांना असलेलं सामाजिक अन् राजकीय अस्तर. या साऱ्याचा रंगीबेरंगी गोफ विणणारं प्रवाही चित्रण म्हणजे ही कादंबरी. एका संवेदनशील तरुणाच्या भावविश्वाचा टोकदार अन् धारदार वेध घेणाऱ्या दोन कादंबऱ्यांच्या मालिकेतील पहिली कादंबरी.
कादंबरीZengat | झेंगट
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart
">
Skip to content