-
Sale! Add to cart'सोविएत संघराज्याचं विघटन झाल्यानंतर रशियात निर्माण झाली निर्नायकी. रशियाला साम्यवादाच्या जोखडापासून जास्तीत जास्त दूर नेण्याच्या नादात बोरिस येल्त्सिन यांनी अनेक प्रयोग केले. ते बहुतांशी फसले; तथापि व्लादिमीर पुतिन यांना सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयोग मात्र अपवाद ठरला. पुतिन निघाले महाबेरकी आणि तितकेच क्रूरही. यथावकाश येल्त्सिनना बाजूला सारून पुतिननी देशाची सारी सत्तासूत्रं आपल्या हातात घेतली. विरोधकांचा काटा काढताना त्यांनी कसलाही विधिनिषेध बाळगला नाही. रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचा ध्यास घेऊन देशविदेशांत त्यांनी जी पावलं उचलली, ती खूप वादग्रस्त ठरली. राष्ट्रवादाचा मुलामा दिलेली त्यांची व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही प्रदीर्घ काळ टिकली तरी कशी, हा भल्याभल्या राजकीय निरीक्षकांची सत्त्वपरीक्षा पाहणारा एक महत्त्वाचा प्रश्न. त्या कटूप्रश्नाची एका व्यासंगी आणि गोष्टीवेल्हाळ पत्रकारानं करून दाखवलेली ही उकल... आंतरराष्ट्रीय राजकीय इतिहासाचा वेध घेता घेता एका जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची त्याच्या असंख्य भल्याबु-या कंगो-यांसह करून दिलेली ही ओळख...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेPutin – Mahasattechya Itihasache Asvastha Vartaman | पुतिन – महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartसतराव्या शतकात युरोपमध्ये घडलेली एक विचित्र सत्यकथा आहे ही... वैज्ञानिक संशोधनातून नव्या संकल्पना पुढे येत होत्या. त्या जुन्या धार्मिक समजुतींना आव्हान देत होत्या. या दोन्ही शक्तींमधील संघर्षाला धार चढत होती, ती राजदरबारातील लहरी माणसांच्या कटकारस्थानांमुळे. अशाच एका कारस्थानाच्या पार्श्वभूमीवरची ही कथा... केपलर नावाच्या एका महान संशोधकाच्या म्हाता-या आईला चेटकीण ठरवून जिवंत जाळायचा कट आखला गेला. त्या खटल्यातून आपल्या निष्पाप आईला कसं वाचवायचं, या विवंचनेनं ग्रासलेल्या केपलरना कोणत्या मानसिक ताणतणावातून जावं लागलं, याचं भावस्पर्शी चित्रण करणा-या मूळ जर्मन कादंबरीचा हा सरस मराठी अनुवाद...
कादंबरीPutra Chetkinicha | पुत्र चेटकिणीचा
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'सतरा वर्षांचा एक तरुण माय आणि मायभूमी यांच्यापासून दूर, एका अनोळखी जगात जातो, तेव्हा त्याच्या शिदोरीमध्ये बांधलेली असते अपार जिज्ञासा आणि अथक ध्यासवृत्ती ! आणि मग सुरू होते ज्ञानपंढरीकडे जाणारी त्याची वाटचाल... विश्वाची पायाभरणी करणा-या मूलकणांची रहस्यं उलगडणारी, जणू विधात्याच्याच मनाचा वेध घेणारी अशी वाटचाल ! अशी वैज्ञानिक वाटचाल करत राहणारा डॉ. आशुतोष कोतवाल यानं आपल्या उपजत प्रज्ञेला दृढसंकल्पाची, चिकाटीची, परिश्रमांची आणि मनोधैर्याची जोड दिली. मूलकण-विज्ञान-क्षेत्रातलं आजचं त्याचं अग्रगण्य स्थान हे जलपृष्ठावर दिसणा-या हिमशिळेच्या टोकासारखं आहे. त्याच्या यशामागं दडलेली आव्हानं, संघर्ष आणि अविचल आशादृष्टी यांची ही त्याच्या आईनंच सांगितलेली कथा अनेक युवकांना प्रेरणादायी ठरू शकेल.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेPutra Vhava Aisa | पुत्र व्हावा ऐसा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartसुधीर नांदगावकर यांचे हे पुस्तक म्हणजे गुरुदत्तवरील त्यांच्या प्रेमाचा एक उत्कट आविष्कार ! गुरुदत्तच्या मृत्यूनंतर लगेचच त्याच्या घरी पोहोचलेल्या मोजक्या पत्रकारांत नांदगावकरही होते. त्यावेळी झालेल्या चर्चा, पत्रकार म्हणून कळलेल्या काही आतल्या गोष्टी आणि गुरुदत्तविषयीचा अपार आदर यांमुळे गुरुदत्तने आत्महत्या केली यावर नांदगावकरांचा विश्वास कधीच बसला नव्हता... सुधीर नांदगावकर यांनी या पुस्तकाच्या लेखनासाठी विशेष प्रयत्नांनी माहिती गोळा केली आहे. चरित्र-कादंबरी-जीवनप्रवास असा एक संमिश्र घाट स्वीकारला आहे. गुरुदत्तच्या आयुष्यातल्या एरवी फार लिहिल्या-बोलल्या न गेलेल्या घटनांचे तपशील, त्याच्या जगण्याचे, चित्रपटनिर्मितीचे, विचारप्रकियेचे काही नवे पैलू आपल्याला कळतात. आपल्या ओळखीचे चित्रपट, गाणी यांचा जन्म कसा झाला, या माहितीत आपण गुंतत जातो आणि अनेकदा तर त्या घटनांचे आपण जणू प्रत्यक्ष साक्षीदार आहोत, असे आपल्याला वाटत राहते... श्रीकांत बोजेवार
All BooksPyaass | प्यासा
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartइजिप्त म्हणजे साडेचार हजार वर्षांची प्राचीन संस्कृती. इजिप्त म्हणजे फारोह, नाईल, ममीज् अन् अवाढव्य मंदिरे. पण या सर्वांहून ठळक वैशिष्ट्य म्हणजे इजिप्तचे पिरॅमिड. प्राचीन जगातील आश्चर्यांपैकी आधुनिक जगापर्यंत पोहोचलेले एकमेव आश्चर्य म्हणजे इजिप्तचे हे पिरॅमिड. या प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचे, वास्तूंचे अन् प्रतीकांचे वेधक दर्शन घ्यायचे असेल, तर चला जाऊ सफरीला -
प्रवासPyramidchya Pradeshat | पिरॅमिडच्या प्रदेशात
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreनेमके कसे होते आर. डी. उर्फ राहुल देव बर्मन ? सिनेसंगीतात ते काळाच्या पुढे होते, असं का म्हणतात? पाश्चात्य संगीताने प्रभावित होते ते की राग-संगीताशी निष्ठावंत ? मेलडी अन् हार्मनी यांचं इतकं प्रभावी फ्यूजन केलं दुसऱ्या कुणी? राग-लय-ताल यांचे इतके अभिनव प्रयोग केले का इत्तर कुणी? वाद्यसंगीतात इतके नवे बदल इतक्या चतुरपणे करणारा आहे इतर कुणी? पंचम का म्हणत त्यांना? अन् जीनियस तरी कशामुळे म्हणायचं? 'आरडी'ने बंडच पुकारलं परंपरेविरुद्ध की परंपरा सांभाळत नावीन्य आणलं ? आर. डी. बर्मन यांच्या समृद्ध संगीताची वैशिष्टचं आणि त्यांच्या निवडक २५ चित्रपट-गीतांचं रसग्रहण यातून चित्रपट व संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर यांनी घेतलेला आर.डी.च्या संगीताचा रसिक शोध-वेध...
All BooksR. D. Burman | आर डी बर्मन
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cartडोळ्यांना दिसते ते खरेसे असले, तरी पुरेसे नसते. विशाल विश्वाचा पसारा पाहण्यास डोळेच काय, महाप्रचंड दुर्बिणीही अपु-या ठरतात. या दोन्हींच्या टप्प्यांपलीकडच्या विश्वाचा शोध घ्यायला रोखावी लागते
विज्ञानRadio Durbin | रेडिओ दुर्बीण
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
Sale! Add to cartतलत महमूद सुभाष दांडेकर प्रो. मधु दंडवते माधुरी आणि स्नेहलता दीक्षित प्रिया तेंडुलकर अनंत पै उषा मंगेशकर राजकारण, साहित्य, उद्योग, कला अशा विविध क्षेत्रांत लखलखीत कामगिरी केलेली वलयांकित व्यक्तिमत्त्वं. त्यांच्या जीवनप्रवासातले लक्षणीय टप्पे अन् अविस्मरणीय क्षण टिपणारी, वाचकाला एका संपन्न बहारदार मैफिलीत सामील करून घेणारी वेधक शब्दचित्रं : राग दरबारी
All BooksRag Darbaree | राग दरबारी
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
संगीत
Ragrachnanjali Bhag 1 | रागरचनांजलि भाग-१
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Read more -
संगीत
Ragrachnanjali Bhag 2 | रागरचनांजलि भाग-२
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Read more
">
Skip to content