करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)
-
Sale! Add to cart'इंजिनियरींगची बदलती क्षितिजे शैक्षणिक पात्रतेची गरज व कुवत पालकांसाठी शिक्षणखर्चाचा अंदाज इंजिनियरींगचा अभ्यासक्रम इंजिनियरींगची विविध क्षेत्रे पुढ्च्या आयुष्याबद्दलची माहिती व त्याचे स्वरूप उत्तम करियरसाठी अधिक काय शिकाल? वाढणारे व्यवसाय, बदलती क्षेत्रे यशस्वी इंजिनियर होण्यासाठीचा मूलमंत्र यशस्वी करीयरसाठी मानसिक जडणघडण सरकारी इंजिनियरींग महाविद्यालये, खासगी अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांचे पत्ते '
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Engineerch Vhaychay ! | इंजिनियरच व्हायचंय!
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cart'स्पर्धा-परीक्षा आता आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग बनल्या आहेत मग त्या एनटीएस/सीईटी असोत किंवा एमपीएससी/यूपीएससीच्या असोत! विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिन्ही समाजघटकांशी संबंधित असणा-या या स्पर्धा-परीक्षांचं महत्त्व ओळखून, यशाचं रहस्य उलगडून सांगणारं हे पुस्तक... वेळापत्रक आखण्यापासून इंग्रजीची भीती घालवण्यापर्यंत, टिपणं काढण्यापासून उत्तरं लिहिण्यापर्यंत, अक्षर सुधारण्यापासून मुलाखतीची पूर्वतयारी करण्यापर्यंत सर्व बाबतींत अत्यंत व्यावहारिक सल्ला देणारं हे पुस्तक... आधी केले, मग सांगितले या उक्तीला अनुसरून स्पर्धा-परीक्षांमध्ये यशस्वी होऊन उच्चपदावर आरूढ झालेल्या एका तडफदार तरुणानं वडीलभावाच्या भूमिकेतून लिहिलेलं हे पुस्तक... केवळ मार्गदर्शनच करणारं नव्हे, तर यशाबद्दल प्रचंड आत्मविश्वास मनामनात जागवणारं हे पुस्तक आजच्या तरुणाईसाठी नवं क्रांतिगीत घेऊन आलं आहे. त्या क्रांतिगीताचेच शब्द आहेत - हम होंगे कामयाब! '
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Ham Honge Kamyab | हम होंगे कामयाब!
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartआय.टी. म्हणजे भारतीय उद्योग-व्यवसायाला सापडलेला एक समृद्ध खजिना. अब्जावधी रूपयांच्या या खजिन्याच्या गुहेची किल्ली शोधण्याचे सुरू होते एक स्वप्नरंजन - सर्वांचेच ! आय.टी. म्हणजे काय ? त्यासाठीचे अभ्यासक्रम कोणते ? प्रवेशपरिक्षा कशा असतात ? इंजिनीअर झाले, तरी कोणत्या चाचण्या व मुलाखतींना सामोरे जावे लागते ? आय.टी.तली मंडळी करतात तरी काय ? त्यातल्या संधी कोणकोणत्या ? अगदी सर्वसाधारण व्यक्तिला आय.टी.त जाता येते काय ? इथे अपयश का येते ? अशा सा-या प्रश्नांची नेमकी उत्तरे तीन तज्ज्ञ लेखकांनी त्यांच्या समृद्ध अनुभवांतून येथे दिली आहेत. जागतिक स्तरावरच्या आयफ्लेक्स व ओरॅकल या कंपन्यांचे बिग बॉस दिपक घैसास यांच्या नेटक्या प्रस्तावनेची त्याला जोड लाभली आहे.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)I.T. Tach Jaychay | आय.टी.तच जायचंय
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartआयुष्याचे ध्येय ठरवताना... कधी कधी स्वतःची आवडच ठाऊक नसते. नव्या संधी कुठे उपलब्ध आहेत, हेही ठाऊक नसते. त्यामुळे आपले ध्येय काय आहे, हेही स्वतःला ठरवता येत नसते. या उलट... कधी कधी स्वतःची आवड स्वतःला पक्की ठाऊक असते. नव्या संधी कुठे खुणावत आहेत, हेही ठाऊक असते. आपले ध्येय काय आहे हेही मनाशी पक्के ठरलेले असते. पण ध्येयप्राप्तीचा नेमका मार्ग मात्र ठाउक नसतो. अशा वेळी गरज असते अनुभवी मार्गदर्शकाची. अशा वेळी गरज असते या पुस्तकाची. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करणारे हे पुस्तक त्यांच्या पालकांनाही नव्या वाटा दाखवील.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Kariyar Kase Nivdave? | करिअर कसं निवडावं?
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartग्लोबलायझेशनचा सुसाट वारा वाहतोय. कालच्या तटबंद्या तोडून ज्ञानाचा ओघ वाहतोय. या ओघाचा वाटाड्या आहे आता तुमच्या हातात- परदेशात शिकण्याची इच्छा आहे ना ? कोणत्या ठिकाणी कोणती संधी आहे ? स्कॉलरशिप किंवा फेलोशिप मिळेल का ? अमूक शिक्षणसंस्थेचा पत्ता काय ? तमक्या अभ्यासक्रमाची वेबसाईट कोणती ? प्रवेशपरीक्षेच्या अर्जाची तारीख काय आहे ? तुमच्या या आणि अशा प्रश्नांचे हमखास उत्तर देणारे-
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Pardeshat Shikaychay | परदेशात शिकायचंय
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartचाकोरीबाहेरच्या असंख्य अभ्यासक्रमांची, ते शिकवणा-या संस्थांची, प्रवेशपात्रतेची, परीक्षापध्दतीची माहिती संकलित स्वरूपात उपलब्ध करून देणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. अलीकडे देशातील काही विद्यापीठांनी बारावीनंतरचे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ते अभ्यासक्रम कोणते आहेत ? या नव्या पध्दतीची वैशिष्टये कोणती आणि फायदे कोणते ? त्या संदर्भातील सोयीसुविधा कोणत्या ? यासारख्या विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे आता या पुस्तकात नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे ही नवी सुधारित आवृत्ती उपयुक्ततेत आणखी भर टाकणारी ठरली आहे.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Samruddhichya Dishene Career | समृध्दीच्या दिशेने करियर
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartव्यक्ती तितक्या प्रकृती आणि देश तितक्या संस्कृती. देशोदेशींच्या संस्कृतींचे रंग किती आगळेवेगळे ! आजच्या जागतिकिकरणाच्या जमान्यात देशादेशांमधील चलनवलन वाढतंय. आज इथे तर उद्या तिथे, या वेगानं जगाला कवेत घेऊ पाहणा-या ग्लोबल नोमॅड्स ची- जागतिक भटक्याविमुक्तांची- संख्या दिवसेंदिवस वाढतेय. वेगवेगळ्या देशांशी संपर्क ठेवताना साहजिकच तिथल्या स्थानिक संस्कृतीशी संबंध येतोय. हा संबंध परस्परांना टोचणारा-बोचणारा ठरू नये, उभयपक्षी लाभदायक अन् सुखकारक ठरावा म्हणून आंतरसांस्कृतिक साक्षरतेची गरज जाणवतेय. अशी साक्षरता मिळवायची म्हणजे अनोळखी परक्याला समजून घ्यायला शिकायचं, एक दोन वैयक्तिक अनुभवांवरून सार्वत्रिक निष्कर्ष काढण्याची घाई न करता थोडा समजूतदारपणा दाखवायचा, परक्या संस्कृतीचा तसा स्वभावरंग का तयार झाला, हे जाणून घ्यायचं .... अ शी आंतरसांस्कतिक साक्षरता पसरवण्याचं काम करणारी विद्याशाखा म्हणजे इंटरकल्चरल कम्युनिकेशन . या विद्याशाखेत मनापासून रमलेल्या वैशाली करमरकर यांनी या वेगळ्या क्षेत्राची करून दिलेला ही ओळख... एका नव्या जगाची कवाडं खोलणारी... विश्वबंधुत्वाचं मूल्य मनामनात जागवणारी...
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Sanskrutirang | संस्कृतीरंग
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartखूप शिकायचंय, चांगल्या शिक्षणसंस्थेत प्रवेश घ्यायचाय, पुढे संशोधन करायचंय, पण या संस्थेत प्रवेश मिळेल काय ? प्रवेश मिळाला, तर खर्च झेपेल काय ? असे प्रश्न गुणवंत मुलांना आणि पालकांना पडत असतात. पण आता विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांनी महत्त्वाकांक्षी तरुण- तरुणींना त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अशा अनेक शिष्यवृत्ती योजनांची माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Shishyavrutti Havi Aahe | शिष्यवृत्ती हवी आहे?
₹110.00Original price was: ₹110.00.₹83.00Current price is: ₹83.00. Save ₹27 Add to cart -
Sale! Add to cart'शिक्षणाचे क्षेत्र आता पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही. शाखा-उपशाखांचा विस्तार होत होत आता अक्षरश: असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला ! कॉर्पोरेट प्रशासनाचे सूत्रधार स्पा : उत्साह आणि ऊर्जा नौदल : उत्कृष्ट जीवन, वैश्विक अनुभव स्मार्ट घराचे शिल्काकार कम्युनिकेशन डिझाइन आणि इतर अनेक... '
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Smart Career, Ujwal Bhavishay (Part-1) | स्मार्ट करिअर,उज्ज्वल भविष्य (भाग-१)
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'शिक्षणाचे क्षेत्र आता पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही. शाखा-उपशाखांचा विस्तार होत होत आता अक्षरश: असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला ! कोट्रोलियम आणि कोट्रोकेमिकल क्षेत्र पशुवैद्यक - अनोखी सेवा, अनोखी संधी नेव्हल आर्किटेक्चर आणि ओशन इंजिनिअरिंग नर्सिंग - सेवा आणि समाधान चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटयूट आणि इतर अनेक...
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Smart Career, Ujwal Bhavishay (Part-2) | स्मार्ट करिअर,उज्ज्वल भविष्य (भाग-२)
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart
">
Skip to content