कलाविचार
-
Sale! Add to cartकोणत्याही रंगभूमीला ऐतिहासिकतेचे भान असले पाहिजे. त्याने दिशा स्पष्ट होतात. पुढचा मार्ग सुकर होऊ शकतो. हे पुस्तक तसे परिप्रेक्ष्य देऊ पाहते. साठोत्तर प्रायोगिक-समांतर मराठी रंगभूमीचे केवळ साक्षी नव्हे, तर निरनिराळ्या नात्याने प्रत्यक्ष सहभागी असलेले प्रतिभावान रंगकर्मी माधव वझे या विस्तृत परिप्रेक्ष्याचे दर्शन घडवत आहेत. त्यांनी अनेक संदर्भबिंदूंच्या मदतीने पल्याड (एकोणीस-विसाव्या शतकातील युरोप, अमेरिका व रशिया) अन् अल्याड (वीस-एकविसाव्या शतकातील प्रायोगिक- समांतर मराठी रंगभूमी) यांचा घेतलेला अभ्यासपूर्ण वेध.
All BooksSamantar Rangabhumi : Palyad-Alyad | समांतर रंगभूमी
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cartस्त्रीत्व कसं असेल, तिच्या अलवार मनाला काय भावत असेल, तिचं हळुवार व्यक्त होणं कसं असेल, तर सुमनताईंसारखं..!प्रेमळ, समजूतदार, हळवं, शांत, समर्पित... शांतपणे तेवणारा नंदादीपच जणू. कोवळ्या नाजूक फुलांचा मंद सुगंध, पावसाची हलकीशी सर, झाडाची कोवळी पालवी, पानांवरील निर्मळ दवबिंदू किती उपमा द्याव्यात या आवाजाच्या व्यक्तिमत्त्वाला ? त्यानं आपलं असं एक स्थान निर्माण केलं. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याला जर स्वतःचा आवाज मिळाला तर किती मधुर असेल तो? तरल, सुरेल, वत्सल, शुद्ध उच्चारांचं लेणं लाभलेला, उत्तम पल्ला नि फिरत असणारा, तरी अत्यंत भावपूर्ण... सुमन कल्याणपूर यांच्या मराठी व हिंदी गाण्यातल्या सांगीतिक वैशिष्ट्यांचा स्मरणीय आढावा आणि त्यांच्या निकोपआवाजातल्या निवडक २५ गाण्यांचं रसग्रहण, प्रसिद्ध गायिका अपर्णा संत यांच्या शब्दात...
All BooksSuman Kalyanpur | सुमन कल्याणपूर
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartसुंदर ती दुसरी दुनिया सिनेमा खोटा असतो, परंतु आयुष्य किती किती त-हेनं खरं असतं ते
दाखवण्याची कुवत कॅमे-यात असते. हे लक्षात ठेवून सिनेमे निघत होते,
तो हिंदी चित्रसृष्टीचा सुवर्णकाळ.
सिनेमा हा लोकांचा असतो. लोकांनी, लोकांसाठी केलेला. परंतु मनोरंजनाची
सबब पुढे करून सिनेमा झुंडीच्या हाती जाता नये. सिनेमावाल्यांनी कला आणि
करमणूक यातला समतोल छान साधला. 1930 ते 1960 या तीन दशकांत
हे घडलं. म्हणून हा हिंदी सिनेमाचा वैभवकाळ.
'पाहता पाहता' सिनेमा मोठा झाला. त्याची ही गोष्ट.
सिनेमाला बरकत यावी म्हणून अनेक थोर कलावंत, दिग्दर्शक, लेखक,
संगीतकार आणि तंत्रज्ञ झिजले. 'निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा' होऊन जगले.
त्यांची ही गोष्ट.
प्रत्येकाच्या मनात सिनेमाची एक सुंदर दुनिया वसत असतेच.
मनाला हुरहूर लावणारं ते जग या पुस्तकात वस्तीला आलंय.कलाविचारSundar Tee Dusari Duniya | सुंदर ती दुसरी दुनिया
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartलताचा आवाज पल्याडच्या' दुनियेशी आपलं नातं जोडील अशा विलक्षण मधुर ताकदीचा होता. संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी. पायांखाली सतरंजी असायचीसुद्धा ऐपत नसणार् यांच्या पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, तिच्या सुरांनी. एकेका स्वराचा, लयीचा, तालाचा आनंद घेत आणि मुक्तहस्तांनी आनंद वाटून देत आली लताची गाणी.. राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप, वात्सल्य, हर्ष, खेद... अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं मूर्तरूप दिलं. या दैवी आवाजाची ना कुणाला व्याख्या करता आली, ना तो संगीताच्या कुठल्या गणिती मोजपट्टीत किंवा व्याकरणात बसवता आला. त्या अपूर्व स्वरलेण्याला ही विनम्र आदरांजली, लताबाईंच्याच निवडक पंचवीस गीतांच्या शब्द-सूर-अर्थ-आस्वादाच्या साथीने... -
All BooksSuranchi Samaradnee – Lata Mangeshkar | सुरांची सम्राज्ञी लता मंगेशकर
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Sale! Add to cartटीव्हीविषयी माझ्या मनात प्रचंड कृतज्ञता आहे. ह्या क्षेत्रानं असंख्य कलावंत मित्रमैत्रिणींना सन्मान आणि सुबत्ता मिळवून दिलीय. अहोरात्र चालणारी ही करमणुकीची यंत्रणा मुग्धा या पुस्तकातून आपल्याला समजावून सांगते. ती आरोपीचा वकील अजिबात होत नाही. ह्या क्षेत्राला कमी लेखणा-यांना ती दूषणं देत नाही. प्रत्येक लेखातून उलगडत जाते मालिका-खिंड लढवणा-या कित्येकांच्या मेहनतीची गोष्ट. मुग्धाच्या पुस्तकाची सफर अत्यावश्यक आहे. कारण ९० घरांमध्ये टीव्ही आहे. कॉलेजमध्ये असताना एकांकिका विश्वात कुतुहलानं वावरत असल्यापासून मी मुग्धाला ओळखते. तिचं मोहक व्यक्तिमत्त्व बघता ती अभिनयक्षेत्रात रमणार, ही अटकळ मनाशी बांधणं सोपं होतं. पण पुढे मुंबईत स्थिरावताना तिनं मालिकांचं लेखन सुरू केलं आणि आज ती त्यातही यशस्वी आहे. मुग्धा तिच्या प्रवासात सजगपणे चालत राहिली. स्वत:च्या प्रवासाकडे ती प्रांजळपणे पाहू शकतेय. आता त्यातले बारकावे ती आपल्यासाठी खुले करतेय. अभ्यासू तरी रंजक अशी ही शोधकथा मनोरंजनासाठी आसुसलेल्या असंख्य प्रेक्षकांसाठी मोलाची ठरणार आहे. सोनाली कुलकर्णी
All BooksTv Malika Ani Barach Kahi…! | टीव्ही मालिका आणि बरंच काही
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartहॅम्लेट - "बोलण्यात नेमस्तपणा ठेवला म्हणजे भाषण चित्तवेधक होते. पुष्कळदा कर्कश नट क्यें करून जेव्हां ओरडतात, तेव्हां माझ्या पायाची आग मस्तकात चढते. असल्या मूर्खपणाने रस उत्पन्न न होता भाषणाच्या चिंधडयान् चिंधडया होतात. "पण, त्राटिकेचा सूर काढू नको असे म्हटले म्हणून आपला तोंडतल्या तोंडात मुळमुळ करीत बसशील. पण तेही उपयोगाचे नाही. या कामात ज्याची त्याने अक्कल खर्चिली पाहिजे; पढवून किती येणार ? भाषण आणि अभिनय ही एकमेकांना जुळून चालली पाहिजेत. "हजारो अरसिक प्रेक्षकांनी टाळी दिली, पण सहृदय प्रेक्षकांपैकी एकाने जरी नाक मुरडले, तरी सर्व खेळावर पाणी पडले असे तुम्ही मानले पाहिजे. असे कित्येक नाटकवाले आहेत की, ज्यांची अरसिक व मूर्ख लोक पराकाष्ठेची वाखाणणी करीत असतात, पण त्यांच्यात गुण म्हणाल तर काडीचा देखील नसतो. हे बेटे मनुष्यस्वभावाची इतकी खराब बतावणी करतात की, त्यामुळे मला कधी कधी वाटते की, या लोकांना आमच्या नेहमीच्या ब्रह्मदेवाने घडविलेले नसावे, तर त्यांच्याकरिता कोणी तरी भाडोत्री ब्रह्मदेव धरून आणला असावा." - शेक्स्पिअर (भाषांतर : गोपाळ गणेश आगरकर) इ. स. १८८३
कलाविचारVachik Abhinay | वाचिक अभिनय
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreअन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. कुतूहल ही नैसर्गिक प्रेरणा आणि बुद्धिमत्तेची नैसर्गिक देणगी यांच्या बळावर माणसाने अनेक गोष्टींमागच्या शास्त्राचा शोध घेतला अन् कलात्मक सौंदर्याविष्कार घडवले. कापसासारख्या वनस्पतिज अन् रेशमासारख्या प्राणिज पदार्थांच्या तंतूंच्या धाग्यांपासून मागावर वस्त्र विणणे; त्याला सोन्यासारख्या धातूच्या तारेची जरतारी जोड देणे या साऱ्यांतून साकारलेला वस्त्राविष्कार म्हणजे शास्त्र-कलेचा अनोखा संगम ! कित्येक शतकांची परंपरा, अनेक ज्ञात-अज्ञात विणकरांची प्रतिभा आणि निरीक्षण-अभ्यास-प्रयोगातून जन्मलेली नानाविध तंत्रे यांतून जगभरात विविध रूपांमध्ये वस्त्रनिर्मिती अन् वस्त्रसंस्कृतीचा विकास झाला. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम भागात अशीच एक देखणी वस्त्रसंस्कृती आकाराला आली. जनजीवनाशी अतूटपणे एकरूप झालेल्या या वस्त्रधाग्यांच्या मोहक प्रतिमा साहित्याच्या कथाकाव्यातून, चित्र-शिल्पांच्या रंगरेषांमधूनही उमटल्या. एका हुन्नरी कलाकाराने, व्यासंगी अभ्यासकाने आणि जाणकार तज्ज्ञाने विविधांगांनी घेतलेला या वस्त्रसंस्कृतीचा वेध.
All BooksVastragatha | वस्त्रगाथा
₹900.00Original price was: ₹900.00.₹675.00Current price is: ₹675.00. Save ₹225 Read more -
Sale! Add to cartभारतीय रंगभूमीवर महत्त्वाचे योगदान केलेल्या पंधरा स्त्री-रंगकर्मींना वीस प्रश्नांची एक प्रश्नावली पाठवण्यात आली. दिशादर्शनाच्या हेतूने प्रतिभावंत नाटककार महेश एलकुंचवार यांनी पाठवलेल्या या वीस प्रश्नांची उत्तरे देताना या सर्जनशील रंगकर्मींनी विविध मुद्द्यांवर सुस्पष्ट मते मांडली. या सगळ्या प्रश्नोत्तरांमधून रसिक वाचकालाही या साऱ्या रंगकर्मींच्या व्यक्तिमत्त्वाची अन् कर्तृत्वाची अनोखी ओळख होते. पंधरा कर्तबगार स्त्री-कलावतांच्या तीनशे वेगवेगळ्या उत्तरांचा मागोवा घेणारे... वीस प्रश्न !
All BooksVees Prashna | वीस प्रश्न
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart
">
Skip to content