कादंबरी
-
Sale! Add to cart' ...कारण आकर्षक वाटणारं जगातलं एक अदभुत सत्य आम्हाला सापडलं होतं. ते हातातून निसटू नये म्हणून आम्ही एकमेकांना सावध करत होतो...मानवी इतिहासातला नवा साक्षात्कार आम्हाला झाला होता आणि त्याच्या प्रकाशात आम्ही न्हाऊन निघालो होतो...नव्या युगाची सुरुवात आता नक्की होणार, अशी आम्हाला मनातून खात्री वाटू लागली होती. ...ऐन तारुण्यातली बंडखोरीची ऊर्मी, त्याला पुरोगामी जीवनपद्धतीची बैठक... आणि जोडीला समविचारी तरुण मित्रांचा गट...अशी सर्व पार्श्र्वभूमी असल्यामुळे आम्ही त्या काळात स्वतःला इतरांपेक्षा खूप वेगळे समजत होतो.
कादंबरी…Ke Har Khwaish Pe | … के हर ख्वाहिश पे
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartराजहंस ने आयोजित केलेल्या, कुमारवयीन वाचकांसाठी विज्ञानकादंबरी लिहिण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी ही कादंबरी केवळ कुमार वाचकांनाच नाही, तर प्रौढ वाचकांनाही रंजक वाटेल अशी आहे. कादंबरीचे कथासूत्र फार विलक्षण आहे. इसवी सन सोळाशे पंच्याण्णवमध्ये औरंगजेबाच्या मालकीच्या एका जहाजावर पडलेल्या दरोड्याचा शोध घ्यायचा प्रयत्न आज एक प्राध्यापक आणि त्याचा पंधरा वर्षांचा हुशार मुलगा करतात, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेतात, ही कल्पनाच मुळी अफलातून आहे. विज्ञान कादंबरी असली, तरी लेखकाने तिच्यात तांत्रिक माहितीचा भडिमार केलेला नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि यंत्रमानव याबद्दलची माहिती कादंबरीत अधूनमधून येते, पण ती जरूर तेवढीच आणि निवेदनाच्या ओघात येते. वाचकाचे कुतूहल जागृत व्हावे पण त्याला अडखळायला होऊ नये, अशा बेताने. कादंबरीतील व्यक्तिरेखा ठसठशीत उतरल्या आहेत. संवाद सहजसुंदर आहेत. विज्ञान अचूक आहे आणि रहस्य वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवते. त्यामुळे पुस्तक एकदा हातात घेतले, की संपूर्ण वाचून होईपर्यंत खाली ठेवता येत नाही. - सुबोध जावडेकर
All Books1695 Smart Robot, Ai Aani Aurangzeb | १६९५ स्मार्ट रोबो, ए आय आणि औरंगजेब
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cartविक्रम सेठ यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेली सुटेबल बॉय ही कादंबरी राजहंस नं शुभमंगल (अरुण साधू) या नावानं प्रकाशित केली. त्यानंतर गौरी डांगे या नव्या दमाच्या लेखिकेची 3, झाकिया मॅन्शन ही कादंबरी त्याच नावानं आता मराठीत येतीय. भारतीय लेखकांनी इंग्रजी साहित्यामध्ये आपला ठसा उमटवणं आता नवीन राहिलेलं नाही. आता मराठी वाचकांना नवीन काय असेल, तर आपल्या या अतिविशाल भारताची अठरापगड कॅलिडोस्कोपिक संस्कृती हा प्रत्येक भारतीय लेखक पकडतो कशी ? 3, झाकिया मॅन्शनमधल्या करीम अली कुटुंबाची आणि मानस खेरची ही गोष्ट, एक वेगळंच जग आपल्यापुढे मांडते आणि जिवाला वेढून टाकते, एवढं नक्की.
कादंबरी3 Zakiya Manssion | ३ झाकिया मॅन्शन
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cartअल्पसंख्य या नावामुळे मनात उभ्या राहणा-या त्याच न् त्याच प्रश्नांना पूर्ण छेद देणारी... बँक उद्योगाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्य आणि बहुसंख्य या दोन्ही प्रकारच्या तुमच्या-आमच्यासारख्या माणसांचे जगण्याचे, लढण्याचे, हरण्याचे संदर्भ शोधणारी... कोणताही अभिनिवेश नसलेली सुंदर कादंबरी
कादंबरीAlpasankhya | अल्पसंख्य
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartया कहाणीचा नायक आहे - विनायक महादेव कुलकर्णी. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला. परिस्थितीशी झगडत शिकला सवरलेला. मोठ्या उमेदीनं तो बांधकामव्यवसायात शिरला. मात्र खाजगीकरण, उदारीकरण अन् जागतिकीकरण यांचे सुसाट वारे वाहू लागले. बघता बघता वादळाचं रूप घेतलेल्या या परिस्थितीनं विनायकच्या आयुष्यातही उलथापालथ घडवली. चांगल्या-वाइटाचा विचार न करता भौतिक सुखांमागे धावणारी आसक्ती, त्यातून मानसिक अस्वस्थता, भ्रष्ट आचरण, गुन्हेगारी वृत्ती, नैतिकतेचा ऱ्हास या चक्रव्यूहात सापडून विनायकची होलपट झाली. चक्रव्यूह भेदण्यात तो यशस्वी ठरला की धारातीर्थी पडला? मनावर चढणारी व्यावहारिक काजळी तो साफ करू शकला का? एकीकडे ऐहिक उपलब्धी, तर दुसरीकडे हरवलेले मन:स्वास्थ्य. एकीकडे भ्रष्टाचाराच्या गाळात रुतत जाणारी सामाजिक परिस्थिती, तर दुसरीकडे मनाची मशागत करणाऱ्या मूल्यांबद्दलची ओढ. एका संवेदनशील माणसाच्या आयुष्याची वेधक कहाणी.
All BooksAlwar Manachi Hurhur | अलवार मनाची हुरहुर
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartलोकमान्य टिळकांच्या कानी त्याचा स्वर पडला आणि 'नारायण राजहंस'चा 'बालगंधर्व' झाला. त्याच्या गात्या गळयानं महाराष्ट्रातल्या दोन-तीन पिढयांना रिझवलं, खुलवलं, फुलवलं. संगीत नाटक हा त्याच्या जीवनाचा ध्यास झाला, आणि त्याचं जीवन म्हणजे शोकांत संगीत नाटक झालं. हे सारं कसं घडत गेलं, ते सांगणारी चरित्र कादंबरी
कादंबरीAsa Balgandharva | असा बालगंधर्व
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cart'छोटा पडदा भारतात येऊन सुमारे पन्नास वर्षं लोटली. बघता बघता त्याची व्याप्ती किती मोठी झाली ! त्यावरून शेकडो मालिका वाहू लागल्या. त्या मालिकांतली माणसं प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटू लागली... ती लोकांची दैनंदिन गरज झाली... रोजच्या चहासारखं व्यसनच... आणि मग... जाहिरातदारांनी छोटया पडद्याचा ताबाच घेतला. छोटया पडद्याभोवती मोठं अर्थकारण खेळू लागलं. राजकारणाचे डावपेच सुरू झाले. कला-साहित्य आणि माणूस सगळयांचंच खपाऊ असणं गरजेचं होऊन बसलं. या डावपेचांचं लक्ष्य ठरला - धनंजय चांदणे ! खेडयातला एक सामान्य तरुण... छोटया पडद्याचं लक्ष त्याच्याकडे वळलं आणि पाहता पाहता काय घडलं ? कला-साहित्य आणि समाज यांच्या मूल्य-व्यवस्थांमध्ये प्रचंड उलथापालथ करून टाकणाऱ्या छोटया पडद्यामागच्या भयाण वादळाला चित्रित करणारी ही कादंबरी. नाटक-चित्रपट-मालिका या दुनियेत वावरणारे संवेदनशील रंगकर्मी अभिराम भडकमकर यांच्या लेखणीतून साकार झालेली अ ॅट एनी कॉस्ट
कादंबरीAt Any Cost | अॅट एनी कॉस्ट
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartबाईचं संघर्षमय जगणं चित्रित करणं मराठी कादंबरीला नवं नाही... पण बायकांचा समूह मात्र क्वचितच कोणी रंगवला ... बाय गं... या कादंबरीत लहानशा खेड्यातला बायकांचा समूह आपल्याला भेटतो. त्यांचं एकमेकींशी जोडलेपण कळतं, त्यांचे नित्य नवे प्रश्न उमगतात आणि त्यांचं त्या प्रश्नांना भिडणंदेखील.... लहानसं खेडं ते मुंबई.... डोईवरचा पदर ते जीन्स... कुरडया - शेवया ते नूडल्स... निरक्षर आयाबाया ते वकील, डॉक्टर, इंजिनीअर मुली.. एकत्र कुटुंबाचा सांभाळ ते मोठ्या हॉस्पिटलचं व्यवस्थापन... हा लांब पल्ल्याचा प्रवास.... आणि मुख्य म्हणजे हा सारा प्रवास सजगपणे पाहणारी, विचार करणारी नायिका.... अत्यंत ओघवत्या भाषेतली आणि चित्रमय शैलीतली ही कादंबरी आवर्जून वाचायला हवी..... बाय गं...
All BooksBai Ga… | बाय गं…
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartनजरकैदेत जन्म. बिनखिडकीच्या छोट्याशा खोलीत वावर. छतावरच्या काचेच्या कौलातून दिसणारा आकाशाचा तुकडा - एवढेच बाह्यजगताचे दर्शन. पळवून, अज्ञातवासात ठेवलेली तरुण आई - एवढीच काय ती साथ-संगत. टी.व्ही.वर दिसणाऱ्या वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी ह्या केवळ पडद्यावरच्या काल्पनिक गोष्टी - हीच दृढ समजूत. ...पण एक दिवस अचानक, आपल्या वापरातल्या वस्तू टी.व्ही.वरपण दिसतात, हे या पाच वर्षांच्या बंदिवानाला कळते आणि... त्याचे भावविश्व उलटे-पालटे होते. त्याची बंदिवान आई हादरते आणि निर्धार करते... आता काहीही करून येथून निसटायचेच... त्यांच्या नजरकैदेची व्यथा आणि सुटकेची वास्तवकथा म्हणजे बंदिवान पण पाच वर्षांच्या मुलाच्या नजरेतून उलगडणारी!
All BooksBandiwan | बंदिवान
₹525.00Original price was: ₹525.00.₹394.00Current price is: ₹394.00. Save ₹131 Add to cart -
Sale! Add to cartमाणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग भेद आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित असणा-यांतले भेद... किती तऱ्हांनी विभागून डोकी भिन्न करतात. पण एका क्षणी आमचं हे वेगळेपणच आमची शक्ती, ऊर्जा, चेतना बनतं. आमच्या प्रत्येक तुकड्यात जीव ओतून एकसंध बनवतं. खरं आहे की,आयुष्याच्या एका टप्प्यावर जगणं निरर्थक वाटू लागतं; त्याच प्रमाणे मरणंही निरर्थक आहे, हे ही पाठोपाठ कळतं. मग आपल्या वाट्याला येणा-या प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा, असं वाटतं. जगावं वाटतं. नुसतं जगावं नव्हे, तर चांगलं जगावं असं वाटतं. तेव्हा मात्र या शकलित बुध्दिच्या माणसांपेक्षा आम्ही खरोखरच सर्वार्थानं भिन्न बनतो...
कादंबरीBhinna | भिन्न
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart
">
Skip to content