कादंबरी
-
Out of stock
Out of stock
Sale! Read more'एम.जे. अकबर या प्रसिद्ध पत्रकाराने आपल्या कुटुंबाचीच कादंबरीरूपाने सांगितलेली ही कथा. तेलिनीपाडा हे बंगालमधले एक साधे गाव. त्या गावात फाळणीपूर्व काळात घडलेली... परिस्थितीमुळे प्रयाग नावाचा एक हिंदू पोरगा एका मुसलमान टपरीवाल्याचा वारसदार कसा होतो आणि लग्नाच्या निमित्ताने रहमतउल्ला कसा बनतो, याची अगदी सहज उलगडत गेलेली ही कथा... ब्रिटिश अमदानीतले औद्योगिक वातावरण, गांधीयुगाचे ग्रामीण भागात उमटणारे पडसाद, धार्मिक राजकारणामुळे गढूळ होत गेलेले वातावरण, नात्यानात्यांमध्ये त्यामुळे निर्माण होणारे ताणतणाव... या आणि अशाच इतरही अनेक घटकांचे प्रत्ययकारी चित्रण असल्यामुळे ही कादंबरी अत्यंत उत्कंठावर्धक ठरली आहे आणि केवळ एका कुटुंबाची कहाणी न राहता त्या कालखंडाची प्रादेशिक कहाणी म्हणून नावाजलीही गेली आहे. त्या कादंबरीचा हा तितकाच सुरस भावानुवाद. '
कादंबरीBlood Brothers | ब्लड ब्रदर्स
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Sale! Add to cart'ब्र उच्चारणं सोपं नसतंच कधीही. ब्र म्हणजे अवाक्षर. गप्प बस... नाहीतर... या धमकीला न भिता धाडसानं उच्चारलेला शब्द म्हणजे ब्र! स्वत:बाहेर पडणं, हा अशा भीतीवरचा उत्तम उपाय. मग एक साधारण गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती अशा एकीचा सुरू झालेला प्रवास. बाईच्या नजरेनं निरागसपणानं पाहिलेलं जग. एक प्रकारे आदिवासी भागातल्या अनुभवांचा अहवाल. त्यासोबत स्वयंसेवी संस्थांमधलं राजकारण आणि स्त्री-पुरुष संबंधांमधलं राजकारणदेखील! हे लेखन महानगर, शहर, खेडेगाव आणि आदिवासी वाड्यापाडे अशा सगळयांना सामावून घेतं.'
कादंबरीBra (Lok Aavruti) | ब्र (लोकआवृत्ती)
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartएक प्रतिभावान शास्त्रज्ञ. त्याने पाहिले एक स्वप्न- सर्व विश्वाच्या कल्याणाचे, मानवजातीच्या मंगलाचे. जगातील दुरिताच्या नाशाचे. या स्वप्नपूर्तीसाठी त्याने विज्ञानाची मदत घेतली आणि एक अद्भुत शोध लावला- विचारलहरींवरील नियंत्रणाचा ! पण हा शोध ताब्यात घेतला एका महत्त्वाकांक्षी, स्वार्थी, पाताळयंत्री व्यक्तीने. आणि मग काय घडले ? विज्ञानाच्या सामर्थ्याच्या वापराबद्दल विचार करायला प्रवृत्त करणारी कादंबरी- ब्रेनवेव्ह्ज
कादंबरीBrainwaves | ब्रेनवेव्ह्ज
₹75.00Original price was: ₹75.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹19 Add to cart -
Sale! Add to cartआज भारतात अनेक चॉकलेट उत्पादक दाखल झाले आहेत, परंतु कॅडबरीचं स्थान मात्र भारतीय मार्केटमध्ये आणि भारतीयांच्या मनात अढळ आहे. चहाच्या व्यापारातून सुरू झालेल्या एका छोट्या दुकानाचं एका मोठ्या उद्योगाच्या साम्राज्यात रूपांतर होण्याच्या पाठीमागे होते अथक प्रयत्न, सहनशीलता, चातुर्य, प्रत्येक पिढीनं दिलेलं योगदान, कर्मचाऱ्यांनी दिलेली प्रामाणिक साथ आणि ग्राहकांचा विश्वास.
कादंबरीCadbury | कॅडबरी
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart -
Sale! Add to cartस्वतःच्या मूळ खेडेगावातच दवाखाना थाटणारा तरुण डॉक्टर. आपल्या ज्ञानाच्या मर्यादा जाणणारा. अडचणींवर मात करून बस्तान बसवतो. स्वतःचं गाव त्याला वेगवेगळ्या रंगाढंगात सामोरं येत जातं. शेतीतली परवड ऐकू येते आणि प्रयोगही दिसतात. कोपऱ्याकोपऱ्यातलं पुराणं दारिद्र्य जाणवतं, तशीच नवश्रीमंतीही दिसते. दबा धरून बसलेली पारंपरिक सावकारी आणि चकचकणारी आधुनिक दुकानदारी ! रिकामटेकड्या तरुणांचं टोळकं, ज्येष्ठ लष्करी अधिकारी, आजारग्रस्त म्हातारी माणसं ! सणवार, लग्न, देवदेवस्की, तीर्थयात्रा, मर्तिकं ! या सगळ्या गुंतागुंतीच्या ग्रामीण प्रवाहातून वाट शोधत पुढे पुढे जाणारं डॉक्टरचं जीवन !
कादंबरीChakravyuha | चक्रव्यूह
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cart"सम्राट अशोकांना कलिंग रंगभूमीवर येऊ द्या," हरदेव म्हणाले, 'त्यांनी काय उध्दवस्त केलं, हे त्यांना त्यांच्या डोळ्यांनी पाहू द्या. कुटिलतेचा अर्क असलेल्या चाणक्यांनी काय सर्वनाश घडवून आणला, ते सम्राटांना समजू द्या. माझी कन्या देवी ही त्यांची खरी प्रेमिका होती. रक्तानं माखलेल्या जमिनीवर निश्चल पडून राहिलेला तिचा मृतदेह अशोकानं पाहावा. स्वत:च्या हजारो सैनिकांचेही मृतदेह अवश्य पाहावेत. आणि मगच आपण कलिंगाची शरणागती सम्राटांना सादर करावी...' तक्षशिलेत उगम पावलेली कथाधारा पाटलीपुत्र, विदिशा, उज्जयिनी, जुनागढ, दंतपुरा असे कित्येक टप्पे घेत अखेर विसावते ती कलिंगाच्या महा संहारापाशी .. तेव्हा हिशेब मांडला जातो न्याय-अन्यायाचा : मानवी अन दैवी ! दोन हजार तीनशे वर्षांपूर्वीच्या विलक्षण सामर्थ्याच्या माणसांची, त्यांच्या संघर्षांची आणि त्या अद्भूत काळाची कहाणी.
कादंबरीChanakya Chandragupta Ashok – Tridhara – Kalingasanharacha Nyay | चाणक्य चंद्रगुप्त अशोक – त्रिधारा – कलिंगसंहाराचा न्याय
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cartही भारतभूमी आहे तेवीसशे वर्षांपूर्वीची. आर्या चाणक्यांचं बुद्धिसामर्थ्य अन सम्राट चंद्रगुप्ताचं बाहुबल यांनी साकारलं मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्तपुत्र बिंदुसारानंही केला राज्यविस्तार, परंतु व्यसनीपणामुळे आज तो आहे मृत्युशय्येवर. त्याच्या पश्चात हे साम्राज्य कोसळून पडेल का ? ते कोसळू नये, यासाठी प्रयत्न करणा-या व्यक्ती आणि शक्ती आहेत का कुणी ? बिंदुसारानं आर्य चाणक्याला हद्दपार का केलं होतं ? निर्वासित चाणक्य, 'कौटिल्य' हे नाव आणि नवा वेश घेऊन पाटलीपुत्रात चक्क एक वेश्यागृह चालवतो आहे ! का ? त्याला गुरू मानणारा मंत्री राधागुप्त, त्याच्या पाऊलखुणांवर चालायला खरंच तयार आहे का ? पाटलीपुत्राच्या जमिनीखालच्या भूयारांत वावरणारी एक गुप्त संघटना 'चिरंतन वैदिक कृतिदल' आज काय अवस्थेत आहे ? या आणि अशा कित्येक चक्रावून टाकणा-या प्रश्नांची थरारक उत्तरं देईल : दोन हजार तीनशे वर्षांपूर्वीच्या विलक्षण सामर्थ्याच्या माणसांची, त्यांच्या संघर्षांची आणि त्या अद्भूत काळाची ही कहाणी.
All BooksChanakya Chandragupta Ashok – Tridhara – Pataliputrache Rajaputra | चाणक्य चंद्रगुप्त अशोक – त्रिधारा – पाटलीपुत्राचे राजपुत्र
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cartतो ध्येयधुरंधर राजकारणी, ती तमाशातली शुक्राची चांदणी. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतवळीची ही रशीली कहाणी
कादंबरीChandramukhi | चंद्रमुखी
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreइस्रायल... अभागी ज्यू लोकांचा छोटासा देश... अरब देशांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या या पराक्रमी देशाबद्दल आपल्याकडे प्रचंड कौतुकमिश्रित कुतूहल आढळतं. त्या देशातील साहित्याची प्रातिनिधिक म्हणता येईल, अशी ही कादंबरी. त्यातही विशेष म्हणजे काही अंशी आपल्या भारतात घडणारी, भारतीय तत्त्वज्ञानाशी अप्रत्यक्षपणे संबंधित असणारी... मानवी नात्यांमधली अकल्पित गुंतागुंत, निखळ प्रेमाचे फुलोरे आणि बेभान वासनेचे काटेरी कंगोरे, जन्म-मृत्यू-पुनर्जन्म या संकल्पनांची मोहक वेटोळी, महत्त्वाकांक्षा आणि इच्छापूर्ती यांच्यात उभी असणारी नियती व तिच्या लहरी स्वभावानुसार माणसांच्या आयुष्याला मिळत जाणारी अर्तक्य वळणं... या सा-याचं वेधक चित्रण करणारी ही मूळ हिब्रू कादंबरी इंग्रजीवरून मराठीत...
कादंबरीChedita Hriday He… | छेदिता हृदय हे…
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreएकविसाव्या शतकात जगाला जिंकून घेण्याची तयारी चीनमधे केली जात होती. पण त्या आधी कॉम्रेड बनवण्याच्या मशीननं माणसांचे साचेबंद कॉम्रेड्स घडवून टाकले होते. माणूसपण हरवलेले... ठोकळे सदृश...
कादंबरीChinmadhla Doc Jinduo | चीनमधला डॉ. जिंदुओ
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Read more
">
Skip to content